SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

टायगर श्रॉफच्या कारवर फायरिंग त्याच्या मागच्याच गाडीत होता 'हा' अभिनेता, म्हणाला 'सगळीकडे रक्तच रक्त...'

Tiger Shroff Car Firing : अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर रविवारी मुंबईत गोळीबार करण्यात आला. यावेळी मनोरंजनसृष्टीतील अजून एका अभिनेत्याची गाडी हे त्याच्या मागे होती. या अभिनेत्याने रविवारच्या रात्री नेमकं काय घडलं याविषयी सांगितलं.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Oct 19, 2026, 12:17 PM IST | Updated: Oct 19, 2026, 01:16 PM IST
Image Credit: टायगर श्रॉफच्या कारवर फायरिंग; त्याच्या मागच्याच गाडीत होता 'हा' अभिनेता, म्हणाला 'सगळीकडे रक्तच रक्त...'
Join

Tiger Shroff Car Firing Karan Veer Mehra : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर 18 ऑक्टोबर रोजी रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेने सर्वांनाच धक्का दिला आहे. बाईकवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी टायगरच्या गाडीवर गोळ्या झाडल्या. या घटनेत टायगर श्रॉफच्या कार चालकाला गंभीर दुखापत झाली तर टायगरच्या शरीरावर सुद्धा किरकोळ जखमा झाल्या. ही संपूर्ण थरारक घटना घडली तेव्हा टीव्ही अभिनेता आणि बिग बॉस 18 चा विजेता करणवीर मेहरा याची कार ही ठीक टायगरच्या गाडीच्या होती. टायगरच्या कारवर हल्ला झाल्यावर जवळपास एका तासाने करणवीर मेहराने घटनास्थळी नेमकं काय घडलं याचा खुलासा केला, जे पाहून तो  स्वतः सुद्धा खूप हैराण झालेला.

गाडी पोहोचली तेव्हा रक्ताचे ठसे :

टायगरच्या कारवर हल्ला झाला त्यावेळी त्याच्या मागच्या कारमध्ये असलेला अभिनेता करणवीर मेहराने घडलेल्या घटनेनंतरचा प्रसंग सांगताना म्हंटलं की, '
माझी गाडी टायगरच्या गाडीच्या अगदी मागे होती. आम्ही गेटमधून बाहेर पडून जेव्हा घटनास्थळी पोहोचलो, तेव्हा मला रक्ताचे डाग दिसले. मला समजले की, टायगरच्या ड्रायव्हरला गोळी लागली होती'.

करणवीरने पुढे म्हटलं की, या सगळ्या घटनेत टायगर श्रॉफ हा सुरक्षित आहे हे कळल्यावर मी सुटकेचा निश्वास सोडला. पण ड्रायव्हरची अवस्था पाहून त्यांना खूप वाईट वाटलं. त्याने आशा व्यक्त केली की चालक लवकर बरा होईल. अभिनेता करणवीरने सांगितले की, त्या ठिकाणी मुलेही उपस्थित होती, जी एका वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाली होती. अचानक झालेल्या गोळीबारामुळे गोंधळ निर्माण झाला आणि लोक आपला जीव वाचवण्यासाठी सर्व दिशांना धावू लागले. 


फटाक्यांच्या आवाजात गोळ्यांचा आवाज कळलाच नाही :

करणवीर मेहराने सांगितलं की मुंबईच्या जुहूमध्ये टायगर श्रॉफ सोबत तो फुटबॉल खेळतो. करणवीर टायगरला खूप काळापासून ओळखतो. हल्ल्याच्यावेळी त्याला हल्लेखोर दिसले नाहीत. त्याच्या सांगण्यानुसार तिथे अनेक लोक उपस्थित होते जे छायाचित्रे घेत होते. अचानक, बंदुकीच्या गोळ्या झाडल्यासारखे आवाज ऐकू आले आणि लोक ओरडू लागले की कोणीतरी गोळीबार केला आहे.

करणवीर मेहराने सांगितले की, ही घटना घडली तेव्हा परिसरात फटाके फोडले जात होते, त्यामुळे सुरुवातीला त्याला वाटले की कदाचित फटाक्यांचाच आवाज असावा. मात्र, जेव्हा प्रत्यक्ष गोळीबाराचा आवाज ऐकू आला आणि लोक आरडाओरडा करू लागले, तेव्हा सुरक्षा कर्मचाऱ्यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES