• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /मनोरंजन
  • /'मुलाला बजरंगबलीने...', टायगर श्रॉफवर थरारक गोळीबारानंतर आई आयशा श्रॉफ यांची पोस्ट चर्चेत

'मुलाला बजरंगबलीने...', टायगर श्रॉफवर थरारक गोळीबारानंतर आई आयशा श्रॉफ यांची पोस्ट चर्चेत

टायगर श्रॉफवरील थरारक गोळीबार हल्ल्यानंतर आई आयशा श्रॉफ यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे. आपला मुलगा का वाचला याचं कारण त्यांनी सांगितलं आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Oct 22, 2026, 04:19 PM IST|Updated: Oct 22, 2026, 04:30 PM IST
joinshare
'मुलाला बजरंगबलीने...', टायगर श्रॉफवर थरारक गोळीबारानंतर आई आयशा श्रॉफ यांची पोस्ट चर्चेत
Image Credit: tiger shroff

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

रविवारी 18 ऑक्टोबरला बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार झाला. यात अभिनेता अगदी थोडक्यात बचावला आहे. दोन हल्लेखोऱ्यांनी टायगर श्रॉफच्या कारवर अगदी जवळून पाच ते सहा राऊंड फायरिंग केली. या थरारक हल्ल्यामध्ये टायगरचा ड्रायव्हर आणि एक चाहता गंभीर जखमी झाला. त्यानंतर चर्चा सुरु झाली की टायगर श्रॉफला एकही गोळी कशी लागली नाही. याबद्दल खुद्द अभिनेत्यानेही त्या दिवसाच्या थरारक अनुभव पोलिसांना सांगताना खुलासा केलाय. पण आता टायगर श्रॉफची आई आयशा श्रॉफ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या मुलाला कोणी वाचवलं याबद्दल सांगितलं आहे. 

आयशा श्रॉफ यांनी काय पोस्ट केली?tiger shroff

टायगर श्रॉफची आई आयशा श्रॉफ यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला. ज्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. या फोटोमध्ये त्यांनी टायगरच्या कारच्या डॅशबोर्डवर हनुमान चालीसा आहे, असं दिसतंय. या फोटोसोबत त्यांनी लिहिलंय की, हनुमानजींनी त्यांच्या मुलाचे रक्षण केलं आहे. हनुमान चालीसामध्ये अपार शक्ती आहे. या फोटमधून त्यांची हनुमान यांच्यावरील श्रद्धा दिसून येतं आहे. 

पण आयशा यांच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहे. अनेक यूजर्सने अभिनेत्याला धार्मिक श्रद्धेशी जोडलं आहे. आयशा यांची ही पोस्ट त्यांची वैयक्तिक विश्वास आणि श्रद्धेवर आधारीत आहे. 

 

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यासोबतही टायगरचा फोटो 

आयशा श्रॉफ यांच्या पोस्टमधील आणखी एका फोटोची जोरदार चर्चा सुरू आहे. तो फोटो म्हणजे टायगर श्रॉफ आणि कथावाचक धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यासोबतचा आहे. या फोटोमध्येही हनुमान चालीसाचे पुस्तक दिसत आहे. यातूनही अभिनेत्याची श्रद्धेचा दिसून येत आहे. 

या पोस्टमधून या घटनेबाबत लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू झाली आहे. टायगरच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर हनुमान चालीसा आणि धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यासोबतचे फोटो आणि आयशा श्रॉफ यांची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Tiger Shroff
Entertainment News