SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

248 कोटींच्या संपत्तीचा मालक असलेल्या टायगर श्रॉफचे खरं नाव जाणून आश्चर्यचकित व्हाल!

248 कोटींच्या संपत्तीचा मालक असलेल्या टायगर श्रॉफचे खरं नाव जाणून आश्चर्यचकित व्हाल!

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 19, 2026, 12:19 AM IST | Updated: Oct 19, 2026, 12:20 AM IST
Join

Tiger Shroff Net Worth : दिग्गज अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्याप्रमाणेच, त्यांचा मुलगा टायगर श्रॉफ देखील बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एक बनला आहे. स्टाईल, अॅक्शन आणि डान्स मूव्ह्समुळे टायगरने चाहत्यांची मंन जिंकली आहेत. टायगर 248 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. 

टायगरचे खरे नाव  जय हेमंत श्रॉफ आहे. मात्र,  त्याने आपल्या चित्रपट पदार्पणासाठी आपले नाव बदलून टायगर ठेवले. टायगरने लहानपणापासूनच मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेतले आहे. स्टाईल आणि डान्स देखील प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. टायगर श्रॉफ खूप आलिशान आयुष्य जगतो. त्याच्या कार कलेक्शनमध्ये अत्यंत महागड्या कार आहेत. 

टायगर श्रॉफने आतापर्यंत फक्त सहा सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याची कमाई आणि गुंतवणुकीची जाण खूपच उत्तम आहे. अभिनयासोबतच तो रिअल इस्टेट क्षेत्रातही काम करत आहे. येथूनही तो बंपर कमाई करत आहे. 2025 मध्ये मुंबईतील खार परिसरातील आपले आलिशान अपार्टमेंट 15.60 कोटींना विकले.

फोर्ब्स इंडियानुसार, टायगर श्रॉफची एकूण संपत्ती अंदाजे 248 कोटी रुपये आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, त्याची स्वतःची एक डान्स अकादमी आणि एक मिश्र मार्शल आर्ट्स संघटना देखील आहे. यातूनही तो चांगली कमाई करतो. मुंबईतील अमेरिकन स्कूलमध्ये टायगरने शिक्षण घेतले.  तो भगवान शिवाचा भक्त असून प्रत्येक सोमवारी आणि महाशिवरात्रीच्या वेळी उपवास करतो.

टायगर एक  अनुभवी मार्शल आर्टिस्ट असून तो कलाकारांना प्रशिक्षणही देतो. 2014  मध्ये त्याला तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळाला आहे.  2012 मध्ये सलमान खानच्या मदतीने टायगर श्रॉफने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.  सुपरस्टारने साजिद नाडियाडवाला यांना त्याला लाँच करण्यास सांगितले. टायगर एका चित्रपटासाठी सुमारे 8 कोटी रुपये मानधन घेतो. ब्रँड एंडोर्समेंटसाठी तो 2 ते 3 कोटी रुपये घेतो.  टायगरचे  वार्षिक उत्पन्न 12 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. 

अलिशान कारचा ताफा

टायगरकडे जगातील काही सर्वात महागड्या आणि आलिशान कारचा ताफा आहे.  रेंज रोव्हर, मर्सिडीज-बेंझ, ऑडी आणि बीएमडब्ल्यू अशा महागड्या कारचा समावेश त्याच्या कार कलेक्शनमध्ये आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES