• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /मनोरंजन
  • /'निरक्षर, मूर्ख...' वीरेंद्र सेहवाग 'या' अभिनेत्रींवर भडकला! म्हणाला 'मी तुम्हाला आधीच'

'निरक्षर, मूर्ख...' वीरेंद्र सेहवाग 'या' अभिनेत्रींवर भडकला! म्हणाला 'मी तुम्हाला आधीच'

'राईज अँड फॉल' या शोचा नवा प्रोमो समोर आला आहे, या शोमध्ये वीरेंद्र सेहवागला पहिल्यांदाच रागाचा भडका उडवताना पाहून चाहते थक्क झाले. नवा प्रोमो सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Oct 18, 2026, 05:04 PM IST|Updated: Oct 18, 2026, 05:19 PM IST
joinshare
'निरक्षर, मूर्ख...' वीरेंद्र सेहवाग 'या' अभिनेत्रींवर भडकला! म्हणाला 'मी तुम्हाला आधीच'

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

होस्टचा वीरेंद्र सेहवाग 'राईज अँड फॉल' या रिॲलिटी शो पाहायला मिळतो. क्रिकेटच्या मैदानावर दिग्गजाने धूमाकुळ घातल्यानंतर तो आता पडद्यावरही सर्वांना प्रभावित करत आहे. आता या शोचा नवा प्रोमो समोर आला आहे. सेहवाग सहसा शांत आणि आनंदी दिसतो, पण शोमध्ये त्याला पहिल्यांदाच रागाचा भडका उडवताना पाहून चाहते थक्क झाले. वीरेंद्र सेहवागला अनेकदा त्याच्या मजेशीर त्याचबरोबर त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखला जातो. ' राईज अँड फॉल'मधील एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये क्रिकेट खेळाडू शोमध्ये स्पर्धकांवर प्रचंड संतापलेला पाहायला मिळाला आहे.

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सेहवाग 'टीव्हीची नागिन' प्रियांका चहर चौधरी आणि गायिका-अभिनेत्री सारा गुरपाल यांना रागावताना दिसत आहे. शोमध्ये मागील दोन दिवसांपासून प्रियांका चहर चौधरी आणि गायिका-अभिनेत्री सारा गुरपाल यांचे मागील काही काळापासून प्रचंड भांडण शोमध्ये सुरु आहेत. या दोघींमध्ये शोमध्ये अनेक शिवीगाळ झाला होता, या भांडणाच्या संदर्भात सेहवागने शोमध्ये काही स्पर्धकांवर भडकलेला पाहायला मिळाला. जेव्हा सारा आणि प्रियांका भांडल्या, तेव्हा सेहवागने त्यांना विचारले, "तुम्ही इतकं वैयक्तिक का बोलत आहात?".

हे ही वाचा

Exclusive : 'अशी ही बनवाबनवी' ते 'शोले'! सचिन पिळगावकरांनी 60 वर्षातील सिनेमा सृष्टीतील सांगितल्या खास आठवणी

या भांडणाच्या संदर्भात सांगताना सारा म्हणाली, "बेसमेंटमध्ये काही दिवसांपासून हेच चाललंय." त्यावर सेहवाग रागाने म्हणाला, "मी तुम्हाला आधीच गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण माझ्या लक्षात यायला हवं होतं की तुम्ही हुशार नाही, मूर्ख आहात. तुम्ही निरक्षर आणि असंस्कृत आहात. मी तुम्हाला शिवीगाळ करून समजावून सांगितलं असतं, तरी कदाचित तुम्हाला समजलं असतं." यावर सारा गुरपालला वीरेंद्र सेहवागने समजवण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर सेहवाग सारा गुरपालला म्हणाला, एखाद्याला पॅनिक अटॅक येत असेल तर तुम्ही त्यांची खिल्ली कशी काय उडवू शकता. जर ते तुमच्यासोबत झाले तर तो आघात असतो आणि दुसऱ्यांसोबत झाले तर ते नाटक असते. यावेळी सेहवाग प्रचंड रागामध्ये पाहायला मिळाला, त्याने प्रियंका चहर चौधरीला देखील खडसावले होते. होस्टने प्रियंकाला रागाने विचारले की, साराने गायलं तर माझ्या कानांतून रक्त येईल असं तू का म्हणालीस?" प्रियांका म्हणाली की तिने साराला असं काहीही म्हटलेलं नाही. पण सेहवागचा राग आणखीनच वाढला. तो ओरडला, "तुम्ही लोक इतक्या उघडपणे खोटं कसं बोलू शकता हेच मला कळत नाही." 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Entertainment News
Sports News