'रामायण' सिनेमात तरुणपणीचा रावण साकारलेला अभिनेता कोण? वडील मोठे निर्माते, चित्रपटाशी थेट संबंध
रामायण सिनेमात तरुण रावणाची भूमिका साकारणारा कलाकार कोण? बॉलिवूडसोबत आहे थेट संबंध
रामायण सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटगृहात खूप चांगली कमाई करत आहे. रणबीर कपूरने साकारलेली प्रभू श्रीराम यांची भूमिका लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. तर, यशने साकारलेला रावण संपूर्ण चित्रपट पाहताना लक्षात राहतो. मात्र चित्रपटात आणखी एक चेहरा आहे ज्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. हे पात्र म्हणजे तरुणपणीचा रावणाची भूमिका करणारा अभिनेता. कोण आहे हा अभिनेता? जाणून घेऊयात.
चित्रपट सुरू झाल्यानंतर मोठ्या पडद्यावर तरुणपणीचा रावण झळकतो. रावणाची कठिण तपश्चर्या आणि संघर्ष या अभिनेत्याने उत्तम पद्धतीने साकारला आहे. त्यामुळं हा अभिनेता कोण, हा प्रश्न अनेकांना पडला होता. या अभिनेत्याचे नाव राघव मल्होत्रा असं आहे. विशेष म्हणजे, राघव हा रामायणचे निर्माते नमित मल्होत्रा यांचा मुलगा आहे.
राघव मल्होत्रा हा निर्माते नमित मल्होत्रा यांचा मोठा मुलगा आहे. रामायणाची स्टारकास्ट चर्चेत असताना राघव मात्र लाइमलाइटपासून दूर होते. त्यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकीर्दीबाबात अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाहीये. मात्र त्याने साकारलेला रावणाची भूमिकामुळं त्याचे कौतुक होतंय.
राघवचे इन्स्टाग्राम अकाउंटदेखील प्रायव्हेट असून तो सोशल मीडियावर फार सक्रीय नाहीये. एक-दोनदा राघवला त्याच्या वडिलांसोबत काही इव्हेंटमध्ये पाहिलं गेलं आहे. नमित मल्होत्रा यांना दोन मुलं आहे. राघव आणि राघवीर मल्होत्रा.
चित्रपटात तरुण रावणाच्या भूमिकेसाठी राघवच्या निवडीमागे त्याची शरीरयष्टी हे कारण आहे. त्याची शरीरयष्टी आणि रूप साधारण यशसारखेच मिळतेजुळते आहे. यामुळेच तो पडद्यावर यशच्या तरुणपणीच्या रूपात दिसतो. राघवची शरीरयष्टीयशशी इतकी मिळती जुळती आहे की तो अनेकदा त्याचा बॉडी डबल म्हणून दिसतो. निर्मात्यांनी मात्र राघवची निवड कशी झाली हे मात्र स्पष्ट केलं नाहीये. यशशी असलेले त्याचे साम्य हेच त्याच्या निवडीचे कारण म्हणून सांगितले जात आहे.
रिपोर्टनुसार, राघवने रामायणसाठी परफोर्मेस ट्रेनिंगदेखील घेतली होती. त्याने भूमिकेसाठी बॉडी लँग्वेज, एक्शन मुवमेंट्स आणि चेहऱ्यावरील एक्सप्रेशनवर काम केले. चित्रपटात तरुण रावणाच्या भूमिकेसाठी फक्त रावणासारखं दिसणे महत्त्वाचं नव्हतं तर रावणाची ताकद, महत्त्वकांक्षा आणि चेहऱ्यावरील गंभीर भाव मोठ्या पडद्यावर साकारणेही तितकेच गरजेचं आहे.