वयाच्या 51 व्या वर्षी राहुल महाजन चौथ्यांदा लग्न करणार? म्हणाला 'मी रोमँटिक आहे आणि...'
तीन अयशस्वी लग्नांनंतरही राहुल महाजनचा विश्वास डगमगलेला नाही. त्याचा आजही प्रेमावर विश्वास आहे. त्याने आता पुन्हा एकदा एका मुलाखतीमध्ये लग्नाबद्दल उघडपणे सांगितले आहे.
रिॲलिटी शो स्टार राहुल महाजनच्या प्रेमजीवनात अनेक चढ-उतार आले आहेत. तो अनेकदा त्यांच्या मजेशीर अंदाजामुळे ओळखला जातो पण दुसरीकडे त्यांचे वैयक्तिक आयुष्य तेवढेच वादग्रस्त पाहायला मिळाले आहे. राहुल महाजन हा त्यांच्या लग्नामुळे अनेकदा चर्चेत पाहायला मिळाला आहे, त्याने आतापर्यत तीनदा लग्न केले. पण त्याने केलेली तीनही लग्न प्रत्येक वेळी त्याचे नाते घटस्फोटात संपले. त्याची तीनही लग्न सोशल मिडियावर उघडपणे सार्वजानिक केले होते. पण तुम्हाला माहित आहे का, की तीन अयशस्वी लग्नांनंतरही राहुलचा विश्वास डगमगलेला नाही. त्याचा आजही प्रेमावर विश्वास आहे. त्याने आता पुन्हा एकदा एका मुलाखतीमध्ये लग्नाबद्दल उघडपणे सांगितले आहे.
सुभोजीत घोष यांच्या पॉडकास्टमध्ये नुकताच राहुल महाजन यांची उपस्थिती पाहायला मिळाली. या पॉडकास्टमध्ये त्याने अनेक धक्कादायक विधाने केली आहेत. सुभोजीत घोष यांच्या पॉडकास्टवर राहुलला त्याच्या चौथ्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्याचे उत्तर चाहत्यांसाठी कदाचित अनपेक्षित होते. तो म्हणाला, "मला चौथ्यांदा लग्न करायचं आहे. जगात फक्त माझाच लग्नावर विश्वास आहे." आजच्या पिढीतील बऱ्याच लोकांना लग्न करायचे नसते. पण मी तशी नाही. जर मला अजूनही कोणी आवडत असेल, तर मी त्याबद्दल विचार करेन. मी त्या व्यक्तीला जाणून घेईन आणि त्यांच्यासोबत सहा महिने ते एक वर्ष राहीन. मी चौथ्यांदा लग्न का करू नये? मी हार का मानावी?
हे ही वाचा
टी-20 क्रिकेटमध्ये तिलक वर्माचा नवा विक्रम; एका वर्षात सर्वाधिक झेल घेणारा फील्डर
मी चौथ्यांदा लग्न करणार नाही असं म्हटलं, तर त्याचा अर्थ असा होतो की माझी सगळी दुःखं कचरापेटीत टाकली आहेत. माणसाने कधीही आशा सोडू नये. मला प्रेमकथा नक्कीच आवडतात. राहुलचे पहिले लग्न 2006 मध्ये श्वेता सिंगसोबत झाले होते. त्याने दुसऱ्यांदा टीव्हीवर डिम्पी महाजनशी लग्न केले, पण हे नाते पाच वर्षांनंतर संपुष्टात आले. राहुलने 2018 मध्ये कझाकस्तानी मॉडेल नतालिया इलिनासोबत तिसरे लग्न केले. त्यांचे नाते 2023 मध्ये संपुष्टात आले. तेव्हापासून तो अविवाहित आहे.
राहुलने सुभोजीत घोष यांना दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले, "तुम्हाला माहित आहे काय होतं? आपल्या जवळच्या व्यक्तीचं निधन झाल्यावर लगेचच आपण सुन्न होऊन जातो. काय होत आहे किंवा काय करावं हे आपल्याला कळत नाही. माझ्या वडिलांना जाऊन जवळपास 20 वर्षे झाली आहेत, त्यामुळे मी इथे त्याबद्दल बोलू शकत आहे. पण त्यांना गमावण्याचं दुःख आजही तसंच आहे. सुख-दुःखाच्या क्षणी ते माझ्यासोबत नसतात. आज मी जे काही करत असेन, ते पाहण्यासाठी ते इथे नसतात."