कंटेटच्या नादात प्रायव्हसीच विसरला, गोव्यात पत्नीचा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने काढला, लोकप्रिय युट्यूबर ट्रोल
कोट्यवधींची कमाई करणारा युट्यूबर सौरव दास पुन्हा एकदा टीकेच्या क्रेंद्रस्थानी आला आहे. काय घडलं नेमकं? जाणून घ्या.
युट्यूबर सौरव जोशी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. युट्यूबरवर बनवेलल्या एका व्लॉगमुळं तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अलीकडेच तो त्याची पत्नी अवंतिका भट्टसोबत गोव्यात सुट्टीसाठी रवाना झाला आहे. तेथील एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यानंतर यावरुन तो सोशल मीडियावर ट्रोलदेखील झाला आहे. व्हिडिओत सौरव जोशीच्या पत्नीसंदर्भातील दृश्य पाहून युजर्स भडकले आहेत.
सौरव जोशीच्या लेटेस्ट व्लॉगमध्ये तो पत्नी अवंतिकासोबत हॉटेलच्या रूमची टूर देत होता. त्याचवेळी तो रूममधून बाहेर येऊन प्रायव्हेट पूल दाखवण्यासाठी जात असतो तेव्हा कॅमेराची लाइट अवंतिकाच्या ड्रेसवर पडते. पण तिचा ड्रेस ट्रान्सपरंट असल्याने नेटकऱ्यांना हे आक्षेपार्ह वाटलं. सौरवने चुकून पत्नीचा चुकीच्या अँगेलने व्हिडिओ घेतला. त्यानंतर हा व्हिडिओ व्लॉगमध्येही अपलोड झाला. त्याच्या या निष्काळजीपणावरुन सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात येत आहे.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी त्यावर सवाल उपस्थित केले आहेत. अनेक युजर्सचं म्हणणं आहे की, जेव्हा व्हिडिओ शूट केला, मग तो एडिटदेखील केला त्यानंतर अपलोड केला. मग या सगळ्यात त्या दृश्यावर लक्ष कसं गेलं नाही. एका युजरने व्हिडिओ शेअर करताना म्हटलं की, खरं तर व्हिडिओ शूट केला, एडिट केला आणि तरीही पब्लिक करण्यात आला, हे खरखोर चक्रावून टाकणारं आहे.
तर, एका युजरने म्हटलं आहे की, सौरव जोशीने जाणूबुजून अशाप्रकारचा कंटेट व्हिडिओ पोस्ट केला आहे का? किंवा अपलोड करण्यआधी पुन्हा चेक केला नाही? कॅमेऱ्याचा तो अँगल काय आहे? तर, एका अन्य युजरने म्हटलं आहे की, सौरवला व्हिडिओ अपलोड करण्याआधी एकदा बघायला हवं होतं. तर काहींना व्हिडिओ खूपच चुकीचा असल्याचंही म्हटलं आहे.
सौरभ त्याच्या व्हिडिओमुळे ट्रोल होण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही त्याला अनेक वेळा टीकेला सामोरे जावे लागले आहे. काही दिवसांपूर्वी, त्याने एक व्लॉग पोस्ट केला होता, ज्यामध्ये त्याने 'ट्रुथ ऑर डेअर' या खेळादरम्यान त्याची पत्नी अवंतिकाला त्यांचा पाळीव कुत्रा ओरिओच्या भांड्यातून पाणी पिण्याचे डेअर दिले होते. सुरुवातीला अवंतिका थोडी कचरत होती, पण नंतर तिने ती डेअर पूर्ण केली. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर, अनेक लोकांनी सौरभवर टीका केली आणि त्याने आपल्या पत्नीला असे करण्यास का भाग पाडले, असा सवाल केला होता.