• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /मनोरंजन
  • /'झी'च्या क्रिएटिव्ह डायरेक्टरपदी कोमल नाहटा यांची नियुक्ती

'झी'च्या क्रिएटिव्ह डायरेक्टरपदी कोमल नाहटा यांची नियुक्ती

झी स्टुडिओ आणि चित्रपट अधिग्रहण विभागाला बळकट करून त्यांची पुनर्रचना केली आहे. या दृष्टिकोनाचा एक भाग म्हणून, कंपनीने चित्रपट मूल्य साखळीवर धोरणात्मक देखरेख ठेवण्यासाठी, चित्रपट व्यवसायासाठी उद्योग क्षेत्रातील अनुभवी कोमल नाहटा यांची क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून नियुक्ती केली आहे.

Reported ByPrashant JadhavEdited ByPrashant Jadhav
Published: Oct 26, 2026, 01:47 PM IST|Updated: Oct 26, 2026, 01:56 PM IST
joinshare
'झी'च्या क्रिएटिव्ह डायरेक्टरपदी कोमल नाहटा यांची नियुक्ती
Image Credit: झी स्टुडिओ आणि चित्रपट अधिग्रहण विभागाला बळकट करून त्यांची पुनर्रचना केली आहे. या दृष्टिकोनाचा एक भाग म्हणून, कंपनीने चित्रपट मूल्य साखळीवर धोरणात्मक देखरेख ठेवण्यासाठी, चित्रपट व्यवसायासाठी उद्योग क्षेत्रातील अनुभवी कोमल नाहटा यांची क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून नियुक्ती केली आहे.

About the Author

Prashant Jadhav

Prashant Jadhav

गेली २३ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून ऑनलाइन पत्रकारितेत १९ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. सामना, लोकमत या संस्थांमध्ये ४ वर्ष प्रिंट माध्यमात काम करण्याचा अनुभव आहे. तसेच एबीपी माझा, झी २४ तास, टाइम्स नाऊ मराठी, लोकशाही मराठी या संस्थांच्या ऑनलाइन पोर्टलमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. झी २४ तास ऑनलाइनमधील ही दुसरी इनिंग आहे. पहिल्या इनिंगमध्ये झी २४ तासची वेबसाईट 24taas.com ही सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका होती.  आता गेल्या वर्षभरापासून झी २४ तासच्या डिजीटल संपादकपदी रूजू होण्याची संधी मिळाली आहे.शैक्षणिक पात्रता प्रशांत जाधव यांनी मास्टर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पद्युत्तर पदवी पुणे विद्यापीठाच्या कम्युनिकेशन अँड जर्नालिझम विभागातून पूर्ण केली आहे. तसेच याच संस्थेतून बॅचलर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम पदवी पूर्ण केली आहे. यापूर्वी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून बी.कॉमची पदवी पूर्ण केली आहे. कोणत्या विषयात रुची प्रशांत जाधव यांना राजकारण, क्रीडा, बिझनेस या विषयात रस असून यात त्यांचे लिखाण आहे. तसेच लोकमतमध्ये असताना चित्रपट परीक्षणही केले आहेत. महाराष्ट्र टाइम्समध्ये कॉपी एडीटर असताना क्रीडा विषयक बातम्या करण्याचा हातखंड आहे. प्रशांत जाधव यांनी महाराष्ट्र टाइम्सकडून पहिल्यांदा आळंदी ते पंढरपूर ही पायी वारी पूर्ण केली आहे. या काळातील त्यांचे वैविध्यपूर्ण कव्हरेज हे प्रसिद्ध झाले होते.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

• सुव्यवस्थित चित्रपट व्यवसायाच्या रचनेचा उद्देश सर्जनशील देखरेख वाढवणे, निर्णयक्षमता मजबूत करणे आणि विविध माध्यमांवर अधिक समन्वय साधणे हा आहे.

मुंबई, २६ ऑक्टोबर २०२६: अधिक स्पर्धात्मक चित्रपट व्यवसाय उभारण्याच्या आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग म्हणून, झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस लिमिटेड ('झेड') ने विविध माध्यमांवर अधिक सर्जनशील आणि व्यावसायिक समन्वय साधण्यासाठी, तसेच अधिक पारदर्शक आणि न्याय्य प्रक्रिया रुजवण्यासाठी झी स्टुडिओ आणि चित्रपट अधिग्रहण विभागाला बळकट करून त्यांची पुनर्रचना केली आहे. या दृष्टिकोनाचा एक भाग म्हणून, कंपनीने चित्रपट मूल्य साखळीवर धोरणात्मक देखरेख ठेवण्यासाठी, चित्रपट व्यवसायासाठी उद्योग क्षेत्रातील अनुभवी कोमल नाहटा यांची क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून नियुक्ती केली आहे. या पुनर्रचनेचा उद्देश निर्णयक्षमता सुव्यवस्थित करून, गुंतवणुकीचे प्राधान्यक्रम अधिक स्पष्ट करून आणि निर्मिती, कमिशनिंग, अधिग्रहण व वितरण या कार्यांमध्ये अधिक मजबूत सहकार्याला प्रोत्साहन देऊन कंपनीच्या चित्रपट परिसंस्थेतील वाढीला गती देणे हा आहे.

या सुव्यवस्थित रचनेअंतर्गत, श्री. सूरज सिंग आणि झी स्टुडिओजमधील त्यांची टीम, श्री. नाहटा यांना रिपोर्ट करतील. ते विविध प्लॅटफॉर्मवरील व्यावसायिक आणि चित्रपट अधिग्रहणाच्या निर्णयांवर देखरेख ठेवतील, ज्यात हिंदी आणि इतर भाषेतील चित्रपटांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. चित्रपट क्षेत्रातील गुंतवणुकीचे इष्टतमीकरण करण्यासाठी आणि विविध बाजारपेठांमधील प्रेक्षकांना आकर्षित करणारी वैविध्यपूर्ण पेशकश तयार करण्यासाठी ते टीम्ससोबत मिळून काम करतील. या भूमिकेत, श्री. नाहटा हे चित्रपटांच्या एकूण मूल्य साखळीवर धोरणात्मक मार्गदर्शन घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, पुनीत गोएंका यांना रिपोर्ट करतील.

चित्रपट व्यवसायाची ही सुव्यवस्थित रचना, 'अटेंशन इकॉनॉमी'मध्ये (लक्ष वेधून घेणाऱ्या अर्थव्यवस्थेत) जास्तीत जास्त वाटा मिळवणे, चित्रपट क्षेत्रात केलेल्या गुंतवणुकीतून अधिक मूल्य प्राप्त करणे आणि अधिक विस्तारक्षम व भविष्यासाठी सज्ज अशी चौकट तयार करणे, या कंपनीच्या आकांक्षांमधून उदयास आली आहे. संपूर्ण व्यवसायात राबविण्यात आलेल्या या प्रयत्नांमुळे कंपनीला चित्रपटगृहे, दूरदर्शन आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या चित्रपटांच्या पोर्टफोलिओचे धोरण अधिक मजबूत करता येईल, ज्यामुळे भांडवली वाटपासाठी अधिक शिस्तबद्ध दृष्टिकोन अवलंबला जाईल.

या नियुक्तीवर भाष्य करताना, 'झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड'चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पुनीत गोयंका म्हणाले, "आम्ही आमच्या विकासाच्या उद्दिष्टांच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असताना, आमच्या व्यावसायिक परिसंस्थेचे मुख्य आधारस्तंभ अधिक बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. हे पाऊल एक अधिक प्रभावी आणि कामगिरीवर आधारित कार्यप्रणाली निर्माण करण्याच्या आमच्या दीर्घकालीन वचनबद्धतेचे प्रतीक आहे. विविध प्लॅटफॉर्मवरील चित्रपटांमधील आमच्या गुंतवणुकीचे मूल्य जास्तीत जास्त वाढवण्यासाठी आम्ही सर्जनशील दृष्टीकोन आणि व्यावसायिक शिस्त यांचा मेळ घालत आहोत. मला खात्री आहे की, चित्रपट क्षेत्रातील सखोल समज आणि उद्योगातील भक्कम संबंधांमुळे, श्री. नाहटा आमच्या विकासाच्या पुढील टप्प्यात टीमचे मार्गदर्शन करण्यासाठी अत्यंत योग्य व्यक्ती आहेत."

'झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड'चे 'क्रिएटीव्ह डायरेक्टर – मूव्हीज बिझनेस' कोमल नाहटा म्हणाले, "मी दशकाभरापासून 'झी'च्या 'ईटीसी' (ETC) चॅनेलवर अत्यंत लोकप्रिय असलेल्या 'बॉलिवूड बिझनेस' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. त्यामुळे, ही नियुक्ती माझ्यासाठी एका अर्थाने 'घरवापसी'सारखीच आहे. कंपनीचे संस्थापक श्री. सुभाष चंद्रा जी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत जी यांनी माझ्यावर जी मोठी जबाबदारी सोपवली आहे आणि जो विश्वास दाखवला आहे, त्याला मी नक्कीच सार्थ ठरेन अशी आशा करतो; कारण मी त्यांचा अत्यंत आदर करतो आणि त्यांच्याबद्दल मला खूप जिव्हाळा आहे."

भारतीय चित्रपट उद्योगातील चार दशकांहून अधिक अनुभवासह, श्री. नाहटा यांना या क्षेत्रातील अत्यंत आदरणीय व्यक्तींपैकी एक मानले जाते. आशयाचे मूल्यमापन (content evaluation), प्रेक्षकांची आवड, बॉक्स-ऑफिसचे कल आणि बदलती मनोरंजन परिसंस्था यांसारख्या विषयांत त्यांना सखोल अनुभव आहे. त्यांनी चित्रपट व्यापार विश्लेषक, समीक्षक, प्रकाशक आणि दूरदर्शन सूत्रसंचालक अशा विविध भूमिका निभावल्या आहेत. ते दीर्घकाळ सुरू असलेल्या 'फिल्म इन्फॉर्मेशन' (Film Information) या चित्रपट व्यापार मासिकाचे प्रकाशक आहेत आणि त्यांनी 'ईटीसी'वर १० वर्षे 'बॉलिवूड बिझनेस' या व्यापारविषयक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आहे. याव्यतिरिक्त, ते 'सिनेमा कॅपिटल'च्या सल्लागार मंडळावरही कार्यरत आहेत.

कंपनी आपल्या दीर्घकालीन विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी, चित्रपट क्षेत्रात एक आकर्षक आणि व्यावसायिकदृष्ट्या सक्षम पर्याय सादर करून आपली स्पर्धात्मक स्थिती अधिक बळकट करत आहे. श्री. नाहटा यांची नियुक्ती याच दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे. यामुळे कंपनीला आपल्या चित्रपट व्यवसायाचा विस्तार करण्यास, सर्जनशील खोली वाढवण्यास आणि संपूर्ण मूल्य साखळीमध्ये (value chain) कमाईच्या संधी अधिक सक्षम करण्यास मदत होईल.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Zee Network
Entertainment News