सध्याच्या डिजिटल युगात एकाच वेळी मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचू शकणारे एक शक्तिशाली माध्यम म्हणून टेलिव्हिजन आजही आहे. यात सर्वात मोठं वर्चस्व जर कोणाचं असेल तर ते 'झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड' ('Z'). हा एक असा ब्रँड आहे ज्यासोबत देशासह जागतिक पातळीवरीह जाहिरातदार काम करण्यासाठी कायम आपला विश्वास दाखवतात.
चॅनेलवरील उत्कृष्ट मनोरंजन, प्राइम-टाइममधील दमदार कामगिरी आणि घराघरांत निर्माण झालेला विश्वास, यामुळे विविध क्षेत्रांतील जाहिरातदारांना अर्थपूर्ण मूल्य मिळवून देणारे हे एक सर्वोत्तम व्यासपीठ मानलं जातं. त्यामुळे दरमहिना या चॅनेलसोबत विविध क्षेत्रांतील 180 हूनअधिक जाहिरातदार काम करतात.
शहरी भागातील प्राइम-टाइममध्ये 'झी टीव्ही' नंबरवर आहे. तर संध्याकाळी 7:30 ते रात्री 10:30 या वेळेतील सर्व महत्त्वाच्या स्लॉट्सवर त्याचे वर्चस्व पाहिला मिळतं. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 'पे' (pay) हिंदी GEC श्रेणीतील सर्वाधिक लोकप्रिय तीन मालिका देखील 'झी टीव्ही'च्याच आहेत. ज्यांची नावं आहे, 'तुम से तुम तक', 'गंगा माई की बेटियाँ' आणि 'वसुधा', ज्या पैसे देवून घरोघरी पाहिल्या जातात.
ही दमदार कामगिरी चॅनेलचे ग्राहकांशी असलेले घट्ट नाते आणि त्याचे अग्रगण्य स्थान असल्याचे पदोपदी जाणीव करुन देतं. यामुळे, आपली दृश्यमानता वाढवू पाहणारे मुख्य प्रवाहातील ब्रँड्स आणि 'डिजिटल-फर्स्ट' ब्रँड्ससाठी 'झी टीव्हीला सर्वाधिक पसंती देतात. भारतात लिनियर टेलिव्हिजनबद्दल बोलायचं झालं तर आजही सुमारे 90 कोटी प्रेक्षकांपर्यंत पोहोचले आहेत. अशा परिस्थितीत, ब्रँड्स अशा विश्वासार्ह व्यासपीठांच्या शोधात कायम असतात आणि त्यात त्यांनी झी टीव्हीवर विश्वास आहे.
झी टीव्ही केवळ जाहिरातींपुरते मर्यादित न राहता, ब्रँड्सना कथांमध्ये सहजपणे समाविष्ट करणाऱ्या कंटेंट इंटिग्रेशन पद्धतीचा यशस्वीपणे वापर करत आहे. पाककृती शोधणे आणि कौटुंबिक कार्यक्रमांचे नियोजन करणे यांसारख्या दैनंदिन गरजांसाठी गुगलच्या एआय-आधारित सेवा कशा मदत करू शकतात, हे दाखवण्यासाठी झी टीव्हीच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांचा वापर करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे, ओपनएआयचे चॅटजीपीटी (ChatGPT) बहुभाषिक मालिकेत समाविष्ट करण्यात आले होते, जे दैनंदिन निर्णय घेणे, घरगुती जबाबदाऱ्या आणि नवीन कल्पनांचा शोध घेणे यांमध्ये एआय कशी मदत करू शकते हे दर्शकांना सोप्या भाषेत समजावून सांगते.
एवढंच नाहीतर झी टीव्हीवरील 'वसुधा' आणि 'जगधात्री', झी कन्नडवरील 'अन्नय्या' आणि 'लक्ष्मी निवासा', झी बांगलावरील 'परिणीता' आणि 'ज्वार भाटा', झी तेलगूवरील 'जगधात्री' आणि 'जयम', तसेच झी मराठीवरील 'वीन दोघातला ही तुटेना' आणि 'कमली' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये हा उपक्रम राबवण्यात जात आहे. याद्वारे, एआय ग्राहकांना दैनंदिन निर्णय घेण्यास, घरगुती जबाबदाऱ्या पार पाडण्यास, कार्यक्रम आयोजित करण्यास आणि नवीन कल्पना शोधण्यास कशी मदत करू शकते, हे दाखवून दिलं आहे.
कंपनीच्या विविध भाषांमधील प्रभावी कथा सांगण्याच्या क्षमतेचे आणखी एक उदाहरण म्हणजे 'सिट्रॉन' (Citroën) ब्रँडचे एक अनोखे एकत्रीकरण केलं आहे. जे आठ वेगवेगळ्या भाषांमधील मालिकांमध्ये आणि प्लॅटफॉर्म्सवर राबवण्यात आले. 'सिट्रॉन का कम्फर्ट ही अलग है'या संकल्पनेवर आधारित या मोहिमेत, कार खरेदीचा प्रवास अतिशय सहजपणे कौटुंबिक कथांमध्ये गुंफण्यात आला होता. याशिवाय 'सा रे ग म प' सारख्या प्रतिष्ठित कार्यक्रमांच्या माध्यमातून 'नॉन-फिक्शन'आशयाचा विस्तार करण्यावर झी टीव्हीचा विशेष भर आहे.
यामुळे, ब्रँड्ससाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी, ग्राहकांचा कल वाढवण्यासाठी आणि त्यांच्याशी दीर्घकालीन नाते निर्माण करण्यासाठी 'झी टीव्ही' एक पसंतीचा भागीदार ठरत आहे. कंपनीच्या विविध भाषांमधील वाहिन्यांवर जाहिरातदारांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये ग्राहक टिकाऊ वस्तू (consumer durables), ई-कॉमर्स, एफएमसीजी (consumer packaged goods), ऑटोमोबाईल, बँकिंग आणि वित्तीय सेवा यांसारख्या प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे. उदाहरणार्थ, 'सा रे ग म प' हा कार्यक्रम ब्रँड्ससाठी प्रेक्षकांशी प्रभावीपणे जोडले जाण्याचे एक उत्तम व्यासपीठ ठरला आहे.
झी चॅनेल्स केवळ टेलिव्हिजन प्रेक्षकांमध्येच नव्हे, तर सोशल मीडियावरही मोठा प्रतिसाद मिळवत आहेत. झी टीव्ही, झी मराठी, झी बांगला, झी तेलगू आणि झी तमिळ यांनी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर आपापल्या बाजारपेठांमध्ये आघाडीचा डिजिटल प्रतिसाद नोंदवला आहे.
व्हिडिओ व्ह्यूजच्या बाबतीत, झी टीव्हीने सुमारे 2.9 अब्ज व्ह्यूज मिळवले आहेत आणि झी कन्नडाने 2.3 अब्ज व्ह्यूजचा टप्पा ओलांडला आहे.
प्रेक्षकांचा विश्वास, उच्च प्रतिबद्धता आणि विविध भाषिक माध्यमांवरील व्यापक पोहोच यामुळे झी एंटरटेनमेंट जाहिरातदारांसाठी एक प्रमुख पर्याय बनले आहे.
काल्पनिक मालिका, रिॲलिटी शो आणि डिजिटल कंटेंट यांच्या एकत्रित शक्तीने कंपन्या आपले ब्रँड लाखो ग्राहकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवू शकतात.
झी टीव्हीसारखे सशक्त कंटेंट प्लॅटफॉर्म हे गुगल, चॅटजीपीटी, सिट्रोएन, मारुती सुझुकी आणि इतर आघाडीच्या कंपन्यांसाठी विश्वसनीय जाहिरात भागीदार म्हणून कायम आहेत.
पारंपरिक टेलिव्हिजन आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या सामर्थ्याचा उपयोग करून, झी एंटरटेनमेंट 'अटेंशन इकॉनॉमी' या आपल्या ध्येयाच्या दिशेने वेगाने वाटचाल करता दिसून येत आहे.