SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

गुगलपासून चॅटजीपीटीपर्यंत...प्राइम-टाइममध्ये 'झी टीव्ही' एक नंबरवर तर जाहिरातदारांसाठी सर्वात पसंतीचे चॅनेल

'Z' (झी) टेलिव्हिजन जागतिक आणि भारतीय ब्रँड्सना मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यास आणि अब्जावधी ग्राहकांशी जोडण्यासाठी सर्वात प्रभावशील माध्यम आहे. गुगल (Google) आणि चॅटजीपीटी (ChatGPT) सारखे जागतिक ब्रँड्ससह दरमहा 180 हून अधिक जाहिरातदार या वाहिनीशी जोडले गेले आहेत.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 17, 2026, 15:52 IST | Updated: Nov 17, 2026, 16:16 IST
Image Credit: Zee TV
Join

सध्याच्या डिजिटल युगात एकाच वेळी मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचू शकणारे एक शक्तिशाली माध्यम म्हणून टेलिव्हिजन आजही आहे. यात सर्वात मोठं वर्चस्व जर कोणाचं असेल तर ते 'झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड' ('Z'). हा एक असा ब्रँड आहे ज्यासोबत देशासह जागतिक पातळीवरीह जाहिरातदार काम करण्यासाठी कायम आपला विश्वास दाखवतात.

चॅनेलवरील उत्कृष्ट मनोरंजन, प्राइम-टाइममधील दमदार कामगिरी आणि घराघरांत निर्माण झालेला विश्वास, यामुळे विविध क्षेत्रांतील जाहिरातदारांना अर्थपूर्ण मूल्य मिळवून देणारे हे एक सर्वोत्तम व्यासपीठ मानलं जातं. त्यामुळे दरमहिना या चॅनेलसोबत विविध क्षेत्रांतील  180 हूनअधिक जाहिरातदार काम करतात.

प्राइम-टाइममध्ये 'झी टीव्ही' एक नंबरवर!

शहरी भागातील प्राइम-टाइममध्ये 'झी टीव्ही' नंबरवर आहे. तर संध्याकाळी 7:30 ते रात्री 10:30 या वेळेतील सर्व महत्त्वाच्या स्लॉट्सवर त्याचे वर्चस्व पाहिला मिळतं. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 'पे' (pay) हिंदी GEC श्रेणीतील सर्वाधिक लोकप्रिय तीन मालिका देखील 'झी टीव्ही'च्याच आहेत. ज्यांची नावं आहे, 'तुम से तुम तक', 'गंगा माई की बेटियाँ' आणि 'वसुधा', ज्या पैसे देवून घरोघरी पाहिल्या जातात.

'झी' टीव्हीला सर्वाधिक पसंती

ही दमदार कामगिरी चॅनेलचे ग्राहकांशी असलेले घट्ट नाते आणि त्याचे अग्रगण्य स्थान असल्याचे पदोपदी जाणीव करुन देतं. यामुळे, आपली दृश्यमानता वाढवू पाहणारे मुख्य प्रवाहातील ब्रँड्स आणि 'डिजिटल-फर्स्ट' ब्रँड्ससाठी 'झी टीव्हीला सर्वाधिक पसंती देतात. भारतात लिनियर टेलिव्हिजनबद्दल बोलायचं झालं तर आजही सुमारे 90 कोटी प्रेक्षकांपर्यंत पोहोचले आहेत. अशा परिस्थितीत, ब्रँड्स अशा विश्वासार्ह व्यासपीठांच्या शोधात कायम असतात आणि त्यात त्यांनी झी टीव्हीवर विश्वास आहे.

गुगल आणि चॅटजीपीटीची झी टीव्हीला पसंती!

झी टीव्ही केवळ जाहिरातींपुरते मर्यादित न राहता, ब्रँड्सना कथांमध्ये सहजपणे समाविष्ट करणाऱ्या कंटेंट इंटिग्रेशन पद्धतीचा यशस्वीपणे वापर करत आहे. पाककृती शोधणे आणि कौटुंबिक कार्यक्रमांचे नियोजन करणे यांसारख्या दैनंदिन गरजांसाठी गुगलच्या एआय-आधारित सेवा कशा मदत करू शकतात, हे दाखवण्यासाठी झी टीव्हीच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांचा वापर करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे, ओपनएआयचे चॅटजीपीटी (ChatGPT) बहुभाषिक मालिकेत समाविष्ट करण्यात आले होते, जे दैनंदिन निर्णय घेणे, घरगुती जबाबदाऱ्या आणि नवीन कल्पनांचा शोध घेणे यांमध्ये एआय कशी मदत करू शकते हे दर्शकांना सोप्या भाषेत समजावून सांगते.

अनेक भाषांमधील ब्रँड्ससाठी मोठी संधी

एवढंच नाहीतर झी टीव्हीवरील 'वसुधा' आणि 'जगधात्री', झी कन्नडवरील 'अन्नय्या' आणि 'लक्ष्मी निवासा', झी बांगलावरील 'परिणीता' आणि 'ज्वार भाटा', झी तेलगूवरील 'जगधात्री' आणि 'जयम', तसेच झी मराठीवरील 'वीन दोघातला ही तुटेना' आणि 'कमली' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये हा उपक्रम राबवण्यात जात आहे. याद्वारे, एआय ग्राहकांना दैनंदिन निर्णय घेण्यास, घरगुती जबाबदाऱ्या पार पाडण्यास, कार्यक्रम आयोजित करण्यास आणि नवीन कल्पना शोधण्यास कशी मदत करू शकते, हे दाखवून दिलं आहे.  

सिट्रोएन मोहिमेने नवीन विक्रम

कंपनीच्या विविध भाषांमधील प्रभावी कथा सांगण्याच्या क्षमतेचे आणखी एक उदाहरण म्हणजे 'सिट्रॉन' (Citroën) ब्रँडचे एक अनोखे एकत्रीकरण केलं आहे. जे आठ वेगवेगळ्या भाषांमधील मालिकांमध्ये आणि प्लॅटफॉर्म्सवर राबवण्यात आले. 'सिट्रॉन का कम्फर्ट ही अलग है'या संकल्पनेवर आधारित या मोहिमेत, कार खरेदीचा प्रवास अतिशय सहजपणे कौटुंबिक कथांमध्ये गुंफण्यात आला होता. याशिवाय 'सा रे ग म प' सारख्या प्रतिष्ठित कार्यक्रमांच्या माध्यमातून 'नॉन-फिक्शन'आशयाचा विस्तार करण्यावर झी टीव्हीचा विशेष भर आहे.

यामुळे, ब्रँड्ससाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी, ग्राहकांचा कल वाढवण्यासाठी आणि त्यांच्याशी दीर्घकालीन नाते निर्माण करण्यासाठी 'झी टीव्ही' एक पसंतीचा भागीदार ठरत आहे. कंपनीच्या विविध भाषांमधील वाहिन्यांवर जाहिरातदारांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये ग्राहक टिकाऊ वस्तू (consumer durables), ई-कॉमर्स, एफएमसीजी (consumer packaged goods), ऑटोमोबाईल, बँकिंग आणि वित्तीय सेवा यांसारख्या प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे. उदाहरणार्थ, 'सा रे ग म प' हा कार्यक्रम ब्रँड्ससाठी प्रेक्षकांशी प्रभावीपणे जोडले जाण्याचे एक उत्तम व्यासपीठ ठरला आहे.

झी चॅनेल्सचे डिजिटल प्लॅटफॉर्मवरही वर्चस्व

झी चॅनेल्स केवळ टेलिव्हिजन प्रेक्षकांमध्येच नव्हे, तर सोशल मीडियावरही मोठा प्रतिसाद मिळवत आहेत. झी टीव्ही, झी मराठी, झी बांगला, झी तेलगू आणि झी तमिळ यांनी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर आपापल्या बाजारपेठांमध्ये आघाडीचा डिजिटल प्रतिसाद नोंदवला आहे.

व्हिडिओ व्ह्यूजच्या बाबतीत, झी टीव्हीने सुमारे 2.9 अब्ज व्ह्यूज मिळवले आहेत आणि झी कन्नडाने 2.3 अब्ज व्ह्यूजचा टप्पा ओलांडला आहे.

झी जाहिरातदारांना मिळते...

प्रेक्षकांचा विश्वास, उच्च प्रतिबद्धता आणि विविध भाषिक माध्यमांवरील व्यापक पोहोच यामुळे झी एंटरटेनमेंट जाहिरातदारांसाठी एक प्रमुख पर्याय बनले आहे.

काल्पनिक मालिका, रिॲलिटी शो आणि डिजिटल कंटेंट यांच्या एकत्रित शक्तीने कंपन्या आपले ब्रँड लाखो ग्राहकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवू शकतात.

झी टीव्हीची यशोगाथा

झी टीव्हीसारखे सशक्त कंटेंट प्लॅटफॉर्म हे गुगल, चॅटजीपीटी, सिट्रोएन, मारुती सुझुकी आणि इतर आघाडीच्या कंपन्यांसाठी विश्वसनीय जाहिरात भागीदार म्हणून कायम आहेत.

पारंपरिक टेलिव्हिजन आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या सामर्थ्याचा उपयोग करून, झी एंटरटेनमेंट 'अटेंशन इकॉनॉमी' या आपल्या ध्येयाच्या दिशेने वेगाने वाटचाल करता दिसून येत आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES