• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /विश्व
  • /Explaine : भारतापासून 12000 KM अंतरावर महाभयानक संकट! गुजरातच्या आकाराऐवढी जगातील सर्वात मोठी हिमनदी मेणासारखा वितळतोय

Explaine : भारतापासून 12000 KM अंतरावर महाभयानक संकट! गुजरातच्या आकाराऐवढी जगातील सर्वात मोठी हिमनदी मेणासारखा वितळतोय

गुजरातच्या आकाराऐवढी जगातील सर्वात मोठी हिमनदी मेणासारखा वितळत आहे. यामुळे भारताला मोठा धोका निर्माण झाला आहे. जगातील सर्वात मोठी हिमनदी भारतापासून 12000 KM अंतरावर आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Oct 18, 2026, 07:05 PM IST|Updated: Oct 18, 2026, 07:14 PM IST
joinshare
Explaine : भारतापासून 12000 KM अंतरावर महाभयानक संकट! गुजरातच्या आकाराऐवढी जगातील सर्वात मोठी हिमनदी मेणासारखा वितळतोय

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

World Largest Doomsday Glacier : भारतापासून 12000 KM अंतरावर महाभयानक संकट घोघावत आहे. ही संकट दुसरं तिसरं कोणत नसून जगातील सर्वात मोठा ग्लेशियर आहे.  'थ्वेट्स' नावाची हमनदी अर्थात ग्लेशियर  मेणासारखी वितळत आहे. हा  ग्लेशियर गुजरात किंवा कर्नाटकच्या दुप्पट आकाराचा आहे. हा ग्लेशियर वितळला तर येत्या शतकात जागतिक समुद्राच्या पातळीत लक्षणीय वाढ होऊ शकते. यामुळे लहान  बेट असलेल्या राष्ट्रांला तसेच  भारतालाही मोठा धोका निर्माण होऊ शकतो अशी भिती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. भारतातील समुद्र किनाऱ्यांवर शहरे पाण्याखाली जाऊ शकतात. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने निकोबार  तसेच लक्षद्वीप बेटांनाही मोठा निर्माण होऊ शकतो.

हिमनदीशास्त्रज्ञांच्या एका पथकाने केलेल्या नवीन संशोधनातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे जगभरातील संशोधक तसेच पर्यावरण तज्ञ चिंतेत आहेत.  पश्चिम अंटार्क्टिकामधील थ्वेट्स नावाची हिमनदी वेगाने घन अवस्थेतून द्रव अवस्थेत रूपांतरित होत आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे हे घडत असल्याचे संशोधकांचा दावा आहे. समुद्राचे गरम  पाणी थ्वेट्सच्या पृष्ठभागाखाली शिरत आहे. यामुळे याचा गाभा वितळत आहे. या संशोधनातील सर्वात धक्कादायाक बाब म्हणजे जागतिक तापमानवाढीचा वेग अपेक्षेप्रमाणे वाढला नसला तरीही या ग्लेशियरमुळे समुद्राच्या पातळीत 1.2 इंच म्हणजेच जवळपास 30 मिमी वाढ होऊ शकते.
 

'नेचर कम्युनिकेशन्स' या नियतकालिकात या संदर्भातील अहवाल प्रकाशित झाला आहे. अनेक दशकांपासून आकुंचन पावत असलेली ही हिमनदी आता शास्त्रज्ञांच्या पूर्वीच्या अंदाजापेक्षा अधिक वेगाने वितळत आहे. या संशोधनामुळे याबाबतच्या दाव्याला दुजोरा मिळाला आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीसोबत सहकार्याने याबाबतचे सखोल संशोधन केले. यासाठी या भागातील सॅटेलाईट मॅपिंग देखील करण्यात आले. या डेटाच्या मदतीने अनेक बाबींचे सखोल विश्लेषण करण्यात आले. 

थ्वेट्स हिमनदी पृथ्वीवरील सर्वात मोठी हिमनदी

थ्वेट्स हिमनदी पृथ्वीवरील सर्वात मोठी हिमनदी आहे. संशोधक या नदीला  'प्रलयकारी हिमनदी' असे संबोधतात.  थ्वेट्स ही पृथ्वीवरील सर्वात मोठी हिमनदी असून अंदाजे 1,92,000 चौरस किलोमीटर अर्थात 74,130 चौरस मैल क्षेत्रफळ व्यापते. याचे एकूण आकारमान हे साधारणपणे गुजरात राज्याच्या आकाराएवढे आहे. पश्चिम अंटार्क्टिकाच्या दुर्गम प्रदेशातील मेरी बर्ड लँडच्या वॉलग्रीन किनाऱ्यावर ही हिमनदी वसलेली आहे.

विशाल पश्चिम अंटार्क्टिक हिमस्तराचा एक भाग आहे. यात  थ्वेट्सपेक्षा 14 पट मोठ्या इतर हिमनद्यांचा समावेश आहे. या हिमनदीचा नकाशा सर्वप्रथम 1947 मध्ये तयार करण्यात आला. दिवंगत अमेरिकन हिमनदी तज्ञ फ्रेडरिक टी. थ्वेट्स यांच्या नावावरून याचे नाव ठेवण्यात आले आहे.  त्यांनी स्वतः कधीही या हिमनदीला भेट दिली नव्हती.

थ्वेट्स हिमनदी किती धोकादायक? 

सर्वप्रथम 1980  च्या दशकात,  संशोधनादरम्यान  थ्वेट्स हिमनदी वेगाने वितळत असल्याची माहिती शास्त्रज्ञांनी दिली. सातत्याने याचे याचे संशोधन सुरु होते. संशोधक सातत्याने या नदीच्या वितळण्याच्या प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तिच्या प्रचंड आकारामुळे, जर ही हिमनदी कोसळली, तर त्यामुळे जगभरात समुद्राची पातळी धोकादायक पातळीपर्यंत वाढू शकते. मात्र, अशा प्रकारची स्थिती निर्माण होण्यास अनेक दशके, कदाचित शतकेही लागू शकतात असा संशोधकांचा दावा आहे.

थ्वेट्स हिमनदी झपाट्याने का वितळत आहे?

थ्वेट्स हिमनदी झपाट्याने वितळण्यामागे वाढते तापमान हे प्रमुख कारण आहे. असे असले तरी यामागची अनेक कारणे संशोंधकांनी शोधून काढली आहेत. समुद्राच्या पाण्याची वाढती उष्णता हे देखील सर्वात चिंताजनक कारण मानले जात आहे.  थ्वेट्स हिमनदी खालून वितळत आहे. समुद्राच्या तापमानातील वाढ ही मानवनिर्मित हवामान बदलामुळे, विशेषतः प्रदूषणकारी जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे होत आहे. 
2019 च्या एका अभ्यासात, नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीने थ्वेट्स हिमनदीखाली एक मोठी पोकळी शोधून काढली. ही पोकळी 39.12 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेली आहे.  हिमनदी वितळण्यामागे हे देखील एक कारण असू शकते. युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) नुसार, वाढत्या तापमानामुळे 2000 सालापासून हिमनदीचा सुमारे पाच टक्के बर्फ वितळला आहे.
ब्रिटिश अंटार्क्टिक सर्वेच्या शास्त्रज्ञांनी एक वेगळाच निष्कर्ष काढला आहे. थ्वेट्समधील बर्फ किमान पुढील 150 वर्षे कमी होत राहील. समुद्राचे तापमान अत्यंत थंड झाले तरीही ही परिस्थिती कायम राहील असा या संशोधकांचा दावा आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
india