SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

भीषण विमान दुर्घटना! हवेत आग लागल्यानंतर कोसळून विमानाचा स्फोट, 17 जणांचा मृत्यू

विमान हवेत असतानाच अचानक त्यात आग लागली. त्यानंतर विमान वेगाने खाली आले आणि जमिनीवर कोसळताच त्याचा भीषण स्फोट झाला. विमानातील कोणीही वाचू शकलेलं नाही.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 17, 2026, 22:29 IST | Updated: Nov 17, 2026, 22:36 IST
Image Credit: रशियात हवेत आग लागल्यानंतर कोसळलं विमान (प्रातिनिधिक फोटो)
Join

रशियामध्ये भीषण विमान दुर्घटना घडली आहे. केमेरोवो (Kemerovo) क्षेत्रात ही दुर्घटना घडली असून 'An-12' प्रकारचे विमान आहे. या विमान दुर्घटनेत सर्व 17 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, विमानाने उड्डाण केल्यानंतर विमानात अचानक आग लागली. त्यानंतर विमान वेगाने खाली येऊ लागले आणि जमिनीवर कोसळताच स्फोट झाला. दुर्घटना इतकी भीषण होती की, विमानातील कोणीही वाचू शकलं नाही.

रशियन प्रसारमाध्यम 'रेन टीव्ही' (Ren TV) च्या वृत्तानुसार, केमेरोवो क्षेत्राचे गव्हर्नर इल्या सेरेड्युक यांनी स्थानिक वेळेनुसार रात्री 9.30 च्या सुमारास या घटनेबाबत माहिती दिली. विमानात आग लागल्यानंतर, वैमानिक आणि क्रू शेवटच्या क्षणापर्यंत जळते विमान निवासी भागापासून दूर नेण्याचा प्रयत्न करत होते, जेणेकरून जमिनीवरील जीवितहानी आणि नुकसान टाळता येईल. हे विमान सायबेरियातील नोवोसिबिर्स्क येथून क्रास्नोयार्स्क क्राय प्रदेशातील कान्स्क शहराकडे जात होते.

गव्हर्नर सेरेड्युक यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान दुर्घटनाग्रस्त झालं त्या ठिकाणी एक आपत्कालीन प्रतिसाद केंद्र स्थापन करण्यात आलं आहे. वैद्यकीय पथके, पोलीस, आपत्कालीन सेवा आणि नॅशनल गार्डचे जवान घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत. विमान अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

 

 

'अँटोनोव्ह एएन-12' (Antonov An-12) हे सोव्हिएत काळातील चार इंजिन असलेलं लष्करी मालवाहू विमान असून, त्याची रचना 1950 च्या दशकात करण्यात आली होती. याचा वापर प्रामुख्याने सैनिक, लष्करी उपकरणे आणि इतर साहित्याची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करण्यासाठी केला जातो.

अलीकडच्या काळात, रशियन लष्करी विमाने प्रशिक्षण सराव आणि प्रवासादरम्यान अनेकदा कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. याआधी, ऑक्टोबर महिन्यात, बाल्टिक समुद्राजवळील कालिनिनग्राद प्रदेशात नियमित प्रशिक्षण उड्डाणादरम्यान रशियाचे एक 'सु-30' (Su-30) लढाऊ विमानही कोसळले होते.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ZEENEWS TRENDING STORIES