SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

अमेरिकेतील मियामी विमानतळावर मोठी दुर्घटना! धावपट्टीवर दोन विमानांची धडक

मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर युपीएस (UPS) बोईंग 767 आणि कोपा एअरलाईन्सचे बोईंग 737 यांनी एकमेकांना धडक दिली. या दुर्घटनेत दोन व्यक्तींना किरकोळ दुखापत झाली आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 15, 2026, 12:21 PM IST | Updated: Nov 15, 2026, 12:32 PM IST
Image Credit: मियामी विमानतळावर धावपट्टीवर दोन विमानांची धडक
Join

अमेरिकेतील मियामी विमातळावर मोठी दुर्घटना घडली आहे. मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन विमानांची एकमेकांशी धडक झाली. महत्त्वाचं म्हणजे, दुर्घटनेच्या आदल्या दिवशी, संपूर्ण अमेरिकेत विमान उड्डाणं थांबवण्यात आल्यामुळे मोठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती आणि लाखो प्रवासी विविध विमानतळांवर अडकून पडले होते. रात्री 9.15 च्या सुमारास ही दुर्घटना घडली.

पनामा सिटीहून 166 प्रवासी आणि सहा कर्मचारी घेऊन येणाऱ्या 'कोपा एअरलाईन्स'च्या बोईंग 737 विमानाच्या पंखांचे टोक, टॅक्सीवेवरून जात असलेल्या 'युपीएस' (UPS) कंपनीच्या बोईंग 767 मालवाहू विमानाच्या पुढच्या भागावर आदळले. या दुर्घटनेत दोन व्यक्ती जखमी झाल्याची माहिती 'कोपा एअरलाईन्स'ने दिली आहे.

हे ही वाचा - पुणे विमानतळावर 'फुल इमर्जन्सी'; 192 प्रवाशांसह उड्डाण केल्यानंतर इंडिगो विमानाची चाकं बाहेरच, एकच धावपळ अन् अखेर...

कोपा एअरलाईन्सने दिलेल्या माहितीनुसार, "विमान टर्मिनलवर पोहोचले असून सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले आहे. त्यापैकी दोन प्रवाशांना विमानतळावरील वैद्यकीय पथकाकडून उपचार देण्यात आले; प्राथमिक माहितीनुसार त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे." इतर सर्व प्रवासी आणि सहा कर्मचारी सुरक्षित असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचेही विमान कंपनीने सांगितले आहे.

कोपा एअरलाईन्सच्या प्रवाशाने काय सांगितले?

कोपा एअरलाईन्सचे प्रवासी सीझर फरेरा यांनी सीएनएनला सांगितले, "आम्ही लँडिंगनंतर सामान्य वेगाने टॅक्सी करत होतो, तेव्हा अचानक मला माझ्या आजूबाजूच्या लोकांचे आवाज वाढल्याचे ऐकू आले. त्यानंतर, सर्वजण एकदम ओरडले आणि त्याच क्षणी दुसरे एक विमान आमच्या विमानावर आदळले."

विमानातील केबिनमध्ये आम्हाला जाणवले की, विमान अचानक एका बाजूला जोरात झुकले. काही प्रवासी सुरुवातीला घाबरले होते, परंतु कर्मचाऱ्यांनी आम्हाला आपापल्या जागेवर बसून राहण्याच्या सूचना दिल्या. एफएए (FAA) ने सांगितले की, एअर ट्रॅफिक कंट्रोलर्सनी यूपीएस (UPS) च्या कर्मचाऱ्यांना कोपा एअरलाईन्सच्या विमानाला मार्ग मोकळा करून देण्यास सांगितले होते. सध्या ही संस्था या धडकेची चौकशी करत आहे.

कोपा एअरलाईन्सचे निवेदन

यूपीएसने म्हटले आहे की, नेमके काय घडले हे शोधण्यासाठी ते संबंधित अधिकाऱ्यांसोबत काम करत आहेत. कोपा एअरलाईन्सने आपल्या निवेदनात म्हटले आहे, "या घटनेमुळे आमच्या प्रवाशांना जो त्रास झाला, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आमच्या प्रवाशांची आणि कर्मचारी वर्गाची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि आम्ही तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य देऊ." ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा देशभरातील विमानतळ पुन्हा एकदा सामान्य विमान सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ZEENEWS TRENDING STORIES