2026 ठरणार इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष, एल निनोबरोबर, ती मानवी चूक ठरणार कारणीभूत
2026 या वर्षात उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच, हे वर्ष सर्वाधिक उष्ण राहणार असल्याचाही इशारा देण्यात आला आहे.
एल निनोचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पृथ्वीवरील तापमान वाढत चालले आहे. मानवी हस्तक्षेप हे तापमानवाढीचे एक मोठे कारण आहे. यावर्षात शक्तिशाली एल निनोची स्थिती आहेय त्यामुळं देशभरात त्याचा परिणाम दिसून येत आहे. काही देशांत उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होत आहेत. तर काही ठिकाणी पुराची स्थिती आहे. जगभरातील हवामान बदलत असतनाच शास्त्रज्ञांनी महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. 2026 हे आतापर्यंतच्या नोंदीनुसार दुसरे सर्वात उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता आहे. जागतिक तापमान 1.5°C या धोक्याच्या पातळीच्या वर स्थिर असताना हा इशारा देण्यात आला आहे, ज्यामुळे हवामान बदलाच्या गतीबद्दल नवीन चिंता निर्माण झाली आहे.
युरोपियन युनियनच्या कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसनुसार, 2026 हे वर्ष आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष म्हणून 2024 ची बरोबरी करण्याची किंवा त्याहून अधिक उष्ण ठरण्याची 20 टक्के शक्यता आहे, तर या वर्षी जागतिक तापमान 1.5°C ने वाढू शकतं.
2023 ते 2026 या चार वर्षातील सरासरी जागतिक तापमान 1.5 अंशाने वाढण्याची शक्यता आहे. कोपर्निकसच्या मते, ऑक्टोबर 2026 हा आत्तापर्यंतचा सर्वात उष्ण ऑक्टोबर महिना होता. ज्यामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हवेचे जागतिक तापमान 1.75 अंशाने जास्त होते. तसंच, जागतिक तापमान 1.5 अंशाने वाढलं आहे.
शास्त्रज्ञांनी असा इशारा दिला आहे की तापमानाची ही मर्यादा ओलांडल्यास उष्णतेची लाट, दुष्काळ, पूर आणि समुद्राची वाढती पातळी यांसारख्या तीव्र हवामान घटनांमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते.
जागतिक हवामान संघटनेने दिलेल्या इशारानुसार, सध्या सुरू असलेली एन निनोची स्थिती आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. तो आत्तापर्यंत नोंदवले सर्वात शक्ताशाली घटनांपैकी एक ठरू शकते. ही घटना 2026 च्या अखेरीस सर्वोच्च पातळीवर पोहोचेल आणि तिचे परिणाम 2027च्या सुरुवातीपर्यंत टिकून राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज आहे.
जागतिक हवामान संघटनेनुसार (WMO), मध्य आणि पूर्व उष्णकटिबंधीय पॅसिफिक महासागराच्या तापमानवाढीमुळे समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान अभूतपूर्व पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे, ज्यामुळे जगाच्या अनेक भागांमध्ये तीव्र उष्णतेची शक्यता वाढेल आणि पावसाच्या पद्धती विस्कळीत होतील.