एल निनो हे नाव तुम्ही आत्तापर्यंत कित्येकदा ऐकलं असेल. जगात हवामानात सातत्याने बदल होत आहेत. 2026मध्ये वाढलेले तापमान, वितळणाऱ्या हिमनद्या आणि वाढणारी समुद्राची पातळी ही संकटे एकामागून एक सुरूच आहेत. सुपर एल निनोमुळं हे संकट 2027पर्यंत राहू शकते. याकाळात उष्णतेच्या लाटा, वादळे आणि अतिवृष्टीची तीव्रता वाढू शकते. जागतिक हवामान संघटनेच्या अहवालानुसार, पृथ्वीच्या वाढत्या तापमानामुळं जैवविविधता, अर्थव्यवस्था आणि उपजिविकेच्या साधनांचा धोका वाढत आहे.
World Meteorological Organization (WMO)च्या स्टेट ऑफ द क्लायमेट अपडेट 2026 नुसार मागील 12 वर्षे ही आत्तापर्यंतची सर्वाधिक उष्ण वर्षे ठरली आहेत. त्यातील शेवटची चार वर्षे अत्यंत उष्ण शहरे ठरली. जानेवारी-सप्टेंबर 2026 या कालावधीत जागतिक सरासरी पृष्ठभागाचे तापमान औद्योगिक क्रांतीपूर्व सरासरीपेक्षा अंदाजे 1.47 अंशाने जास्त होते. एल निनोमुळं वर्षाच्या अखेरीस यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
2026 मध्ये, समुद्राची पातळी आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली आणि समुद्राच्या पृष्ठभागाच्या मासिक तापमानाचे विक्रम नोंदवले गेले. हिमनद्यांचे वितळणे सुरूच आहे. 2025 मधील बर्फाच्या वार्षिक वस्तुमानाच्या घटीमुळे वर्षातील प्रत्येक सेकंदाला पाच ऑलिम्पिक जलतरण तलाव भरता आले असते. 2014 पासून गोड्या पाण्याचा साठा कमी होत आहे.
सध्याचा एल निनो आरोग्यासाठी अनेक पटींनी धोकादायक ठरू शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. वाढती उष्णता, दुष्काळ आणि मुसळधार पावसामुळे उष्णतेमुळे होणारे आजार, वणव्याचा धूर आणि हवेची खालावलेली गुणवत्ता, कुपोषण आणि अन्नसुरक्षेचा अभाव, दुखापती, तसेच पाण्याद्वारे आणि कीटकांद्वारे पसरणाऱ्या रोगांचे बदलणारे धोके वाढू शकतात.
एल निनो 2027 च्या सुरुवातीपर्यंत टिकण्याची शक्यता आहे. एल निनोमुळे साधारणपणे वार्षिक जागतिक सरासरी तापमानात 0.1°C ते 0.2°C ची वाढ होते आणि 2026 मधील जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीतील अंतिम तफावत सरासरीपेक्षा जास्त असण्याचा अंदाज आहे, असे अहवालात म्हटले आहे.