मोठी बातमी! अमेरिकेत 'एयर लॉकडाउन'! देशभरातील विमानतळांवर एकाच वेळी 13,000 विमानं रद्द, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिकेत 11 सप्टेंबर 2001 रोजी झालेल्या हल्ल्यांनंतर पहिल्यांदाच देशभरातील सर्व विमानसेवा ठप्प झाली आहे. नेमकं काय घडलं?
अमेरिकेतून मोठी बातमी समोर आली आहे. 11 सप्टेंबर 2001 रोजी झालेल्या हल्ल्यांनंतर पहिल्यांदाच देशभरातील सर्व विमानसेवा ठप्प झाल्यामुळे खळबळ माजली आहे. फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने (FAA) सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याच सांगण्यात येत आहे. दरम्यान आताच हाती आलेल्या माहितीनुसार अमेरिकेत विमानांच्या उड्डाणांची तात्पुरती स्थगिती मागे घेण्यात आली आहे. अमेरिकेतील हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे देशभरातील विमानांच्या उड्डाणांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती, अशी माहिती अमेरिकेचे टेलिकॉम्मुनिकेशन सेक्रेटरी सीन डफी यांनी दिली.
न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, ईस्टर्न टाईमनुसार संध्याकाळी 4:45 वाजेपर्यंत, 7,800 विमान टेक ऑफ करण्यासाठी उशिर झाला तर अंदाजे 350 विमानसेवा रद्द झालीत. धक्कादायक म्हणजे 4 हजारापेक्षा जास्त विमान हवेत असताना अचानक विमानतळावर एअर लॉकडाऊन करण्यात आले.
संपूर्ण अमेरिकेबद्दल बोलायचं झालं तर 13,000 हून अधिक विमान रद्द करण्यात आली.
अमेरिकेत 'एयर लॉकडाउन'मागे काय आहे कारण?
मिळालेल्या माहितीनुसार , प्रादेशिक एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) केंद्रांच्या कम्युनिकेशन यंत्रणेत गंभीर तांत्रिक बिघाड झाला आहे.
त्यामुळे एफएएने (FAA) देशभरातील विमानसेवा रद्द झाल्यानंतर अमेरिकेतील सर्व प्रमुख विमानतळांवर विमानांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झालाय.
या प्रकरणी, गृह सुरक्षा विभागाने स्पष्ट केलं आहे, या एअर लॉकडाऊनमागे सायबर हल्ल्या नाही हे स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान, गृह सुरक्षा सचिव मार्कवेन मुलीन यांनी सांगितलं की, "हा आमच्यावर झालेला धोकादायक हल्ला आहे, असं कोणतेही संकेत मिळालेले नाही. सध्या तरी, हा केवळ दूरसंचार सेवेतील व्यत्यय आहे. तर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना याची माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेत अचानक सर्व विमानसेवा बंद झाल्या नाहीतर याची सुरुवात शिकागोच्या ओ'हेअर आणि मिडवे विमानतळांपासून झाली होती. सगळ्यात पहिल्यांदा इथल्या कम्युनिकेशन सिस्टिममध्ये तांत्रिक अडचण आली. ज्यामुळे शिकागोच्या ओ'हेअर आणि मिडवे विमानतळावरील एकाच वेळी सगळ्या विमानसेवा रद्द करण्यात आल्यात. त्यानंतल ही तांत्रिक अडचण देशातील इतर हवाई वाहतूक नियंत्रण केंद्रांपर्यंत पोहोचल्यावर संपूर्ण अमेरिकेत ग्राउंड स्टॉप लागू केला गेला, अशी माहिती देण्यात आली. FAA च्या सूचनेनुसार, पुढील आदेश मिळेपर्यंत विमानसेवेवरील बंदी कायम राहणार असून विमानसेवा कधी सुरू होईल, याची सध्या कोणतीही खात्री देण्यात आलेली नाही. याचा परिणाम भारतातील असंख्य विमानसेवरही झाला आहे.