• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /विश्व
  • /ट्रम्प तात्यांना मोठा धक्का! कट्टर विरोधक 40 लाख+ मतांनी जिंकला; मोदींनीही लगेच केलं अभिनंदन, संपूर्ण दक्षिण अमेरिका खंडावर होणार परिणाम

ट्रम्प तात्यांना मोठा धक्का! कट्टर विरोधक 40 लाख+ मतांनी जिंकला; मोदींनीही लगेच केलं अभिनंदन, संपूर्ण दक्षिण अमेरिका खंडावर होणार परिणाम

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का देणारा निकाल दक्षिण अमेरिका खंडातील एका मोठ्या देशात लागला आहे. याचा दिर्घकालीन परिणाम अमेरिकेच्या राजकारणात होईल असं सांगितलं जातंय. नेमकं घडलंय काय जाणून घ्या...

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 27, 2026, 12:27 PM IST|Updated: Oct 27, 2026, 12:46 PM IST
joinshare
ट्रम्प तात्यांना मोठा धक्का! कट्टर विरोधक 40 लाख+ मतांनी जिंकला; मोदींनीही लगेच केलं अभिनंदन, संपूर्ण दक्षिण अमेरिका खंडावर होणार परिणाम
Image Credit: 40 लाखांहून अधिक मतांनी जिंकला ट्रम्प यांचा विरोधक (प्रातिनिधिक फोटो सौजन्य रॉयटर्सवरुन)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

ब्राझीलमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अगदीच अनपेक्षित निर्णय लागला आहे. येथे डाव्या विचारसरणीचे आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचे कठोर टीकाकार लुईझ इनाशिओ लुला डि'सिल्वा यांचा पुन्हा विजय झाला आहे. विशेष म्हणजे या निकालाचा परिणाम केवळ ब्राझीलपुरता मर्यादीत राहणार नसून दक्षिण अमेरिका खंडातील राजकारणावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लुला यांच्या विजयामुळे दक्षिण अमेरिका खंडात उजव्या विचारसरणीच्या पक्षांची घोडदौड थांबली असून हा विजय म्हणजे ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय.

असे पहिलेच राष्ट्रध्यक्ष ज्यांनी...

लुला यांचे प्रतिस्पर्धी सेनेटर फ्लाव्हिओ बोल्सोनारो यांच्याविरुद्ध लुला यांना 51.8 टक्के मते मिळाली. बोल्सोनारी यांनी निकालामध्ये प्राथमिक फेऱ्यांत आघाडी घेतली. मात्र, नंतर ते पिछाडीवर पडले. त्यांचा जवळपास 40 लाख मतांनी पराभ झाला. विशेष म्हणजे ब्राझीलमध्ये पुन्हा लोकशाही अस्तित्वात आल्यापासून अशाप्रकारे पहिल्या फेरीमध्ये पिछाडीवर राहून निवडणूक जिंकणारे लुला हे पहिलेच राष्ट्राध्यक्ष ठरे आहेत.

विरोधी उमेदवाराने तेच केलं जे त्याच्या वडिलांनी केलेलं

मात्र, बोल्सोनारो यांनी पराभव मान्य करण्यास नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने रविवारी मतदानाला दोन तास वेळ वाढवून देण्याच्या निर्णयाला त्यांनी विरोध केला होता. हा निकाल रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. बोल्सोनारो यांच्या पराभवामुळे ब्राझीलचा शेअर बाजार गडगडला. फ्लाव्हिओ यांच्या वडिलांनी, जैर बोल्सोनारो यांनी 2022 मध्ये लुला यांच्याविरोधातच निवडणूक लढली होती. तेव्हाही त्यांनी पराभव स्वीकारण्यास नकार दिला होता. सत्तेत राहण्यासाठी बंड पुकारण्याच्या आरोपाखाली त्यांना सर्वोच्च न्यायालयाने 27 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लुला यांचे अभिनंदन केले आहे. लुला यांच्या बरोबर काम करायला आवडेल, असे मोदी यांनी 'एक्स' वरील पोस्टमध्ये नमूद केले. भारत आणि ब्राझीलमधील बहुआयामी धोरणात्मक भागीदारी अधिक सखोल आणि विस्तारित करण्यासाठी लुला यांच्यासोबत मिळून काम करण्यास उत्सुक असल्याचे मोदींनी म्हटले आहे. 

Meus mais sinceros parabéns ao meu caro amigo, presidente Lula, por sua notável vitória na reeleição. Espero trabalhar em estreita colaboração com ele para aprofundar e ampliar ainda mais a multifacetada Parceria Estratégica entre a Índia e o Brasil. Juntos, continuaremos a fortalecer nossa cooperação em diversos setores, promover as prioridades compartilhadas do Sul Global e trabalhar em prol de um mundo mais inclusivo, equitativo e sustentável. @LulaOficial

— Narendra Modi (@narendramodi) October 26, 2026

ट्रम्प यांना हा मोठा धक्का कसा?

दक्षिण अमेरिका एकेकाळी डाव्या विचारसरणीचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जात असे. मात्र, गेल्या दोन वर्षांमध्ये येथील सात देशांमध्ये उजव्या विचारसरणीला यश मिळाले. त्यामुळेच हा केवळ ब्राझीलपुरता किंवा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या लुला यांच्या वर्कर्स पार्टी पक्षासाठी महत्त्वाची घडामोड नाही. तर या विजयामुळे संपूर्ण दक्षिण अमेरिका आपल्या अधिपत्याखाली आणण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. लुला हे ट्रम्प यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या या विजयामुळे दक्षिण अमेरिकेतील उजव्यांच्या घोडदौडीला खीळ बसली आहे, असे सांगितले जात आहे.  लुला यांच्या विजयाने दक्षिण अमेरिका खंडात सर्वत्र उजव्यांची सत्ता येण्यास आडकाठी तयार झाली आहे. अमेरिकेला अनुकूल असेल सरकार या ठिकाणी न आल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनाही हा धक्का मानला जात आहे. अमेरिकेची संपूर्ण दक्षिण अमेरिकेवर पकड बसणे आता तितकेसे सोपे राहणार नाही.

तेलाचे साठे असलेला देश अमेरिकेने नुकताच घेतलाय ताब्यात...

दक्षिण अमेरिका खंडातील व्हेनेझुएला या तेलाचे साठे असलेल्या देशावर अमेरिकेने आपली पकड मजबूत केली आहे. इतकी की, तेथील तेलाचा व्यापार आता अमेरिकेच्या मर्जीने केला जात आहे. या घडामोडींच्या पाश्र्श्वभूमीवर ब्राझीलमध्ये लुला यांना पुन्हा विजय मिळणे लक्षणीय आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Donald Trump
International News