SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

चीनने 20 कोटी चिमण्या मारल्या अन्..., 4 कोटी लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेली घटना; नेमका हा प्रकार काय?

चीनची एक मोहिम आणि कोट्यवधी चिमण्यांची शिकार केली. त्यानंतर जे घडलं ते महाभयंकर आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Oct 30, 2026, 01:54 PM IST | Updated: Oct 30, 2026, 01:56 PM IST
Image Credit: Four Pests Campaign
Join

निसर्गाचा समतोल राखणे समाजासाठी व मानवजातीसाठी आवश्यक आहेत. कारण निसर्गावरच मनुष्यप्राण्याचं जीवन अवलंबून आहे. निसर्गचक्र, अन्नसाखळी याचा समतोल किती आवश्यक आहे हे चीनमध्ये 78 वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेमुळं दिसून येते. चीनच्या राज्यकर्त्यांनी चिमण्या मारण्याचे आदेश दिले अन् तिथेच चीनच्या पर्यावरणीय संकटाची सुरुवात झाली. काय आहे ही घटना याचा आढावा घेऊयात.

पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचे नेते माओ त्से तुंग यांनी देशातील सर्व चिमण्या मारण्याचे आदेश दिले. त्याचे कारण म्हणजे, चिमण्या शेतातील धान्य खातात. जर चिमण्यांनी धान्य खाल्ले नाहीतर देशात धान्याचा साठा अधिक वाढेल. त्यामुळं  माओ त्से तुंग यांनी  1958 ते 1960 च्या काळात  Great Sparrow Campaign किंवा Smash Sparrows Campaign राबवले. ही मोहिम त्यांच्या फोर पेस्ट्स कॅपेनचा भाग होती.

माओ त्से तुंग यांनी उंदीर, माशा, डास आणि चिमण्या यांना देशाचे शत्रू म्हणून घोषित केले होते. चीनने चिमण्यासारख्या पक्षांना उपद्रवी घोषित केले अन् सगळ्या चिमण्यांना मारण्याचे आदेश दिले. माओ यांनी देशभरात ही मोहिम राबवली. सर्वसामान्य नागरिकांना, शाळकरी मुलांना चिमण्या मारण्याचे आदेश दिले. जनतादेखील या विनाशकारी मोहिमेत सहभागी झाली.

लोक थाळी, भांडी, डब्बे वाजवून मोठा आवाज करत त्यामुळं चिमण्या घाबरून आकाशात उडतच राहात. चिमण्य उर फुटेस्तोवर उडत राहिल्या. अखेर अतिव थकव्याने त्या आकाशातून खाली कोसळत. त्यानंतर या चिमण्यांना अमानुषपणे मारले जाई. गोफशी, बंदुक व मिळेल त्या साधनाचा वापर करुन चिमण्यांची शिकार करण्यात आली. त्यांची घरटी उद्ध्व्स्त केली, अंडी फोडली गेली. चीनच्या या विनाशकारी मोहिमेत अंदाजे 600 मिलियन चिमण्या मारल्या गेल्या. काही जण हा आकडा 20 कोटी असल्याचंही सांगतात.

निसर्गावर विजय मिळवायला गेलेल्या चीनला मात्र अवघ्या दोन-तीन वर्षांतच निसर्गाने धडा शिकवला. चीनला निसर्गाच्या चक्राचा फटाका बसला. चिमण्या नाहिशा झाल्या. त्यामुळं पिकांवर येणाऱ्या टोळधाडींची संख्या वाढली. त्यांनी चीनमधील पिके फस्त केली. टोळधाड  एका दिवसात सुमारे35,000 लोकांच्या अन्नाइतकी पिके खाऊन टाकू शकतात. चिमण्या नाहीशा झाल्यामुळे कीटकांची (विशेषतः टोळधाडींची) संख्या प्रचंड वाढली. त्यांनी संपूर्ण चीनमधील पिके फस्त केली, कारण चिमण्या फक्त धान्य खात नव्हत्या, तर त्या शेतातील कीटक, आफ्रिकन टोळ आणि अळ्या खाऊन त्यांची संख्या नियंत्रणात ठेवत असत.

पिके नष्ट झाली आणि निसर्गाचा समतोड बिघडला. चीनमध्ये 1959 ते 1961 या काळात भयंकर दुष्काळ पडला. धान्य नसल्यामुळं लोक उपासमारीने बेजार झाले. अन्नासाठी हजारो लोकांच्या हत्या करण्यात आल्याचाही उल्लेख आढळतो. या उपासमारीमुळं चीनमध्ये सुमारे 1.5 ते 4.5 कोटी लोकांचा मृत्यू झाला.

जेव्हा चीनच्या लक्षात आपली ही मोठी चूक आली, तेव्हा त्यांनी चिमण्या मारण्याची मोहीम थांबवून सोव्हिएत युनियनकडून अडीच लाख चिमण्या मागवून निसर्गाचा समतोल पुन्हा साधण्याचा प्रयत्न केला. खरंतर धान्य वाचवण्यासाठी चीनने कोट्यवधी चिमण्यांची शिकार केली. मात्र निसर्गानेच चीनला धडा शिकवला. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES