• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /5 महिन्यानंतर टॉय ट्रेन सुरु... जाणून घ्या Timetable अन् इतर तपशील; मुंबई, पुण्याहून लोकलनेही पोहचता येईल असा पिकनिक स्पॉट

5 महिन्यानंतर टॉय ट्रेन सुरु... जाणून घ्या Timetable अन् इतर तपशील; मुंबई, पुण्याहून लोकलनेही पोहचता येईल असा पिकनिक स्पॉट

हिवाळ्यामध्ये मुंबई, पुण्याहून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर हा स्पॉट तुमच्यासाठी अगदी उत्तम पर्याय ठरु शकतो. जाणून घ्या सविस्तर तपशील...

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 30, 2026, 03:03 PM IST|Updated: Oct 30, 2026, 03:13 PM IST
joinshare
5 महिन्यानंतर टॉय ट्रेन सुरु... जाणून घ्या Timetable अन् इतर तपशील; मुंबई, पुण्याहून लोकलनेही पोहचता येईल असा पिकनिक स्पॉट
Image Credit: जाणून घ्या सविस्तर टाइमटेबल आणि तपशील (फोटो सोशल मीडियावरुन साभार)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'टाळी एका हाताने वाजत नाही...'; आमने-सामने वादावर प्रशांत दामले स्पष्टचं बोलले, म्हणाले, 'दोघांचेही म्हणणं...'

'टाळी एका हाताने वाजत नाही...'; आमने-सामने वादावर प्रशांत दामले स्पष्टचं बोलले, म्हणाले, 'दोघांचेही म्हणणं...'

2

पाकिस्तानने भारताला 4 विकेट्सने केले पराभूत! टीम इंडियाच्या गोलदाजांना धू धू धुतलं...

3

भारतातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, दिवाळीआधीच बँक खात्यात ₹2000;मोबाईलवर असे तपासा

4

5 महिन्यानंतर टॉय ट्रेन सुरु... जाणून घ्या Timetable अन् इतर तपशील; मुंबई, पुण्याहून लोकलनेही पोहचता येईल असा पिकनिक स्पॉट

5

आंबा उत्पादनाचा अनोखा प्रयोग! ऐन हिवाळ्यात हापूस आंब्याची पहिली पेटी रवाना

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

दिवाळीच्या सुट्टीत किंवा हिवाळ्यामध्ये फिरायला जाण्याच्या विचारात असलेल्या मुंबई, पुण्यातील पर्यटकांसाठी एक गुड न्यूज आहे. आजपासून माथेरानमधील मिनी ट्रेन सुरु झाली आहे. अगदी मुंबईच्या लोकल ट्रेननेही पोहोचता येणाऱ्या या पर्यटनस्थळाचं मुख्य आकर्षण असलेल्या या मिनी ट्रेनचे टायमिंग आणि सेवा कशी असणार आहे जाणून घेऊयात...

रोज दोन गाड्यांसह

पावसाळ्याच्या काळात बंद ठेवण्यात आलेल्या नेरळ-माथेरान मिनी ट्रेनची सेवा आज म्हणजेच 30 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. नेरळ-माथेरानदरम्यान रोज दोन गाड्यांसह अमन लॉज-माथेरान शटल सेवाही सुरू होणार आहे. नेरळ स्थानकात उतरल्यावर ही टॉय ट्रेन पकडता येते.

ट्रेनचा टाइम काय?

पावसाळ्यात सुरक्षिततेच्या कारणास्तव जून ते ऑक्टोबर या कालावधीत नेरळ-माथेरान रेल्वेसेवा बंद ठेवली जाते. आता मात्र हिवाळ्याची चाहूल लागताच नेरळ ते माथेरान मिनी ट्रेन धावणार आहे. नेरळहून माथेरानकडे जाणारी गाडी क्रमांक 52103 सकाळी 8.50 वाजता सुटून 11.30 वाजता माथेरानला पोहोचेल. गाडी क्रमांक 52105 सकाळी 10.25 वाजता सुटून दुपारी 1.05 वाजता माथेरानला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी माथेरानहून गाडी क्रमांक 52104 दुपारी 2.45 वाजता सुटून सायंकाळी 5.30 वाजता नेरळला पोहोचेल. तर गाडी क्रमांक 52106 सायंकाळी 4 वाजता सुटून 6.40 वाजता नेरळला पोहोचेल.

एक विस्टाडोम डबा

नेरळ-माथेरान मार्गावरील मिनीट्रेनला सहा डबे असणार आहेत. यात तीन द्वितीय श्रेणीचे डबे, एक विस्टाडोम डबा आणि दोन द्वितीय श्रेणी-सह-सामान डबे यांचा समावेश असणार आहे. तर अन्य गाडीला तीन द्वितीय श्रेणीचे डबा, एक प्रथम श्रेणीचा डबा आणि दोन द्वितीय श्रेणी-सह-सामान डबे असतील. अमन लॉज-माथेरानदरम्यान रोज सहा शटल फेऱ्या चालवण्यात येतील. अमन लॉजहून सकाळी 8.45, 9.35, दुपारी 12, 2.25, 3.40 आणि सायंकाळी 5.45 वाजता गाड्या सुटतील.

दोन विशेष शटल फेऱ्या

माथेरानहून अमन लॉजसाठी सकाळी 8.20, 9.10, 11.35, दुपारी 2, 3.15 आणि सायंकाळी 5.20 वाजता गाड्या धावतील. शनिवार आणि रविवारी पर्यटकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन दोन्ही दिशांना आणखी दोन विशेष शटल फेऱ्या चालवण्यात येतील. या टॉय ट्रेनमुळे माथेरानला भेट देणाऱ्या पर्यटकांना निसर्गरम्य प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच स्थानिक व्यावसायिकांनाही फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

घोडे गायब

बच्चेकंपनीचे आकर्षण असणारी माथेरानची राणी (टॉयट्रेन) पावसाळ्याच्या सुट्टीनंतर आजपासून ऐटीत धावणार आहे. मात्र या पर्यटकांच्या व राणीच्या स्वागतासाठी घोडेच नसणार आहेत. कारण अश्वपाल संघटनेने आपले आंदोलन सुरूच ठेवले असून श्रीराम चौकात बेमुदत उपोषण चालू आहे. त्यामुळे माथेरानमधील 460 घोडे 'सायडिंग 'ला आहेत. या आंदोलनाचा फटका पर्यटनाला बसण्याची शक्यता आहे. अश्वपाल संघटनेच्या मागण्यांबाबत गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर घोडेस्वारी पूर्ववत करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. टॉयट्रेन व घोडेस्वारी हे माथेरानमधील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. आता दिवाळीचा हंगाम लवकरच सुरू होणार असून लहान मुले आपल्या पालकांसह घोडेस्वारीचा आनंद लुटण्यासाठी येणार आहेत. 26 ऑक्टोबरपासून अश्वपाल संघटनेने आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे पर्यटक घोडेस्वारीला मुकणार आहेत. माथेरानमधील अश्वपालांच्या दोन संघटना असून त्याचे एकूण 350 सदस्य आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले आहे. त्यामुळे पर्यटकांना घोडेस्वारीचा आनंद सध्यातरी घेता येणार नाही.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra Tourism
Maharashtra News