• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /विश्व
  • /समुद्र म्हातारा होतोय? प्रशांत महासागरातील 'या' बदलांना वाढवलं जगाचं टेन्शन, खोल पाण्याचे वय...

समुद्र म्हातारा होतोय? प्रशांत महासागरातील 'या' बदलांना वाढवलं जगाचं टेन्शन, खोल पाण्याचे वय...

पॅसिफिक महासागर उष्ण होत असल्यामुळे, त्यातील पाण्याचे 'वय' बदलत आहे. म्हणजे नक्की काय होतंय जाणून घ्या.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Sep 30, 2026, 10:53 AM IST|Updated: Sep 30, 2026, 10:56 AM IST
joinshare
समुद्र म्हातारा होतोय? प्रशांत महासागरातील 'या' बदलांना वाढवलं जगाचं टेन्शन, खोल पाण्याचे वय...
Image Credit: climate change effect on pacific ocean water become aging

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

प्रशांत महासागराचे तापमान वाढत आहे. त्याचबरोबर आणखी एक बदल तज्ज्ञांनी नोंदवला आहे. समुद्राच्या पाण्याचे वयदेखील बदलत आहे. तुम्हालाही हे ऐकून आश्चर्य वाटलं ना, पण अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफॉर्नियातील सॅन डिएगोच्या संशोधकांनी पुढील 100 वर्षात होणाऱ्या बदलांबाबत माहिती दिली आहे. संशोधनातून समोर आले की, प्रशांत महासागरातील काही भागात पाणी जुने होणार आहे. तर, काही भागातील पाण्याना नवे स्वरुप येणार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे महासागर उष्ण होत असल्यामुळे पाण्याच्या विविध थरांमधील हालचाल कमी होते.

हा बदल समुद्राच्या 200 ते 1000 मीटर खोल असलेल्या 'थर्मोक्लाइन' नावाच्या थरात विशेषतः दिसून येतो. हा थर समुद्राच्या वरच्या उबदार थराच्या आणि खालच्या थंड पाण्याच्या मध्ये असतो. समुद्र जसजसा गरम होतो, तसतसे हे थर पूर्वीसारखे सहजपणे मिसळत नाहीत. यामुळे पाण्याची हालचाल मंदावते. वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याचे वय आणि ऑक्सिजनचे प्रमाण वेगवेगळे असते.

पाण्याचे वय म्हणजे काय?

पाण्याचे वय म्हणजे पाणी किती जुने आहे हे नव्हे. तर शास्त्रज्ञ हे पाहतात की पाणी समुद्राच्या पृष्ठभागावर आल्यापासून किती काळ लोटला आहे. जेव्हा पाणी समुद्राच्या पृष्ठभागावर असते, तेव्हा ते हवेतून ऑक्सिजन घेत असते. मग, जेव्हा पाणी खाली जाते, तेव्हा सागरी जीव आणि जीवाणू तो ऑक्सिजन वापरतात. त्यामुळे, जे पाणी दीर्घकाळ समुद्रात राहते, ज्या पाण्यातून ऑक्सिजन निघून जातो त्याला "जुने पाणी" असं म्हटले जाते.

पृष्ठभागाखाली नुकत्याच स्थिरावलेल्या पाण्याला 'नवीन पाणी' मानले जाते आणि त्यात सामान्यतः जास्त ऑक्सिजन असतो. गरम पाणी थंड पाण्यापेक्षा हलके असते. त्यामुळे, महासागरात वरच्या बाजूला गरम पाणी आणि खालच्या बाजूला थंड पाणी असे स्पष्ट थर आढळतात. जसजसा महासागर अधिक उष्ण होतो, तसतसा या दोन थरांमधील फरक वाढत जातो. यामुळे वरचे पाणी खाली जाते आणि खालच्या पाण्याची हालचाल कमी होते. म्हणजेच, महासागरातील पाण्याची हालचाल मंदावते. शास्त्रज्ञांनी हा बदल पाहिला. पॅसिफिक महासागराच्या सर्व भागांमध्ये हा परिणाम एकसारखा नसेल, असेही शास्त्रज्ञांना आढळले आहे.

संशोधकांच्या मते, पाण्यातील बदलाचा थेट परिणाम समुद्री जीवांवर होऊ शकतो. कारण त्यांना जिवंत राहण्यासाठी पाण्यात असलेल्या ऑक्सिजनची गरज असते. प्रशांत महासागराच्या उष्णकटिबंधीय भागात खालून वर येणारे पाणी हे अधिक जुने आणि कमी ऑक्सिजन असलेले असचे. जशी तापमानात वाढ होईल तसं तळापासून वर येणाऱ्या पाण्याची हालचाल मंदावू शकते. यामुळं पृष्णभागावर कमी जुने पाणी येईल. त्याचाच परिणाम म्हणून वरच्या थरातील पाण्याचे वय हे कमी होऊ शकते. उष्ण पाण्यात कमी ऑक्सिजन असू शकतो. पाण्याच्या मंद प्रवाहामुळं खोल समुद्रापर्यंत ऑक्सिजन पोहोचण्याच्या पद्धतीत बदल होऊ शकतो. या संशोधनात सागरी जीवांवरील परिणामाचा पूर्णपणे अभ्यास केला गेला नाहीय. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Weather
International News