पृथ्वी व्यतिरिक्त इतरही ग्रहावर मानवी वस्ती? शास्त्रज्ञांनी केलेले दावा खळबळजनक
पृथ्वी व्यतिरिक्त इतरही ग्रहावर जीवसृष्टी? संशोधक काय म्हणतात. सौरमंडळातील ग्रहाबाबत काय माहिती मिळाली.
पृथ्वी असा एकमात्र ग्रह आहे जिथे जीवसृष्टी आहे, हे तुम्ही आत्तापर्यंत ऐकलं असेलच. लहानपाणापासून प्रत्येकाला हेच माहिती आहे. मात्र वैज्ञानिकांनी एक खळबळजनक दावा केला आहे. दुसऱ्या ग्रहांवरही जीवसृष्टी आहे का याचं संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांनी म्हटलं आहे की, पृथ्वीपेक्षा अधिक सक्षम ग्रह या सौरमंडळात असू शकतात. जिथे मुबलक प्रमाणात पाणी, अनुकुल जलवायू आणि निरोगी जीवनासाठीचे सर्व घटक उपलब्ध असतील. अशा काल्पनिक ग्रहांना सुपरहॅबिटल वर्ल्ड्स असं म्हणतात.
सुपरहॅबिटल ग्रह हे पृथ्वीपेक्षा तुलनेने थोडे मोठे असू शकतात. साधारणतः 20-30 टक्के जास्त रुंद आणि पृथ्वीच्या व्यासापेक्षा दुप्पट द्रव्यमान असू शकते. या ग्रहाचे गरुत्वाकर्षण जास्त असल्याने वायुमंडळात टिकून राहणे सहज शक्य होते. तर एक शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र सजीवांना हानिकारक अवकाश किरणोत्सर्गापासून वाचवू शकते. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, समुद्र, सरोवर आणि बेट असलेले ग्रह विविध सजीवांना आधार देऊ शकतात. मात्र , या शक्यता अजूनही सैद्धांतिक आहेत आणि अशा कोणत्याही ग्रहांची पुष्टी झालेली नाही.
के-ड्वार्फ ताऱ्यांवर जीवसृष्टी टिकू शकते का?
शास्त्रज्ञांना के-ड्वार्फ ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या ग्रहांमध्ये विशेष रस आहे. हे तारे सूर्यापेक्षा लहान, थंड आणि अधिक नारंगी रंगाचे असतात. हे तारे त्यांचे इंधनाचे स्त्रोत जपून वापरतात आणि अब्जावधी वर्षे स्थिर राहू शकतात, ज्यामुळे जीवसृष्टीला विकसित होण्यासाठी खूप जास्त वेळ मिळतो.
खगोलजीवशास्त्रज्ञ इव्हा विलोविक यांनी या ताऱ्यांमधून उत्सर्जित होणाऱ्या सजीवासारख्या प्रकाशाला वनस्पती कशा प्रतिसाद देतात याचा अभ्यास केला. एका प्रयोगात, कृत्रिम सूर्यप्रकाशापेक्षा नारंगी ताऱ्यांच्या आभाळात गार्डन क्रेसची वाढ अधिक वेगाने आणि उंच झाली, यावरून असे लक्षात येते की अशा वातावरणात प्रकाशसंश्लेषण प्रभावीपणे कार्य करू शकते.
खगोलशास्त्रज्ञ रेने हेलर आणि जॉन आर्मस्ट्राँग यांनी 2014 च्या एका वैज्ञानिक शोधनिबंधात 'सुपरहॅबिटेबल प्लॅनेट' ही संकल्पना मांडली होती. त्यांनी असं म्हटलं होतं की, पृथ्वीसारख्या ग्रहांव्यतिरिक्त परग्रही जीवनाचा शोध घेतला पाहिजे. सूर्य हळूहळू अधिक तेजस्वी होत असल्यामुळे पृथ्वीवरील सजीवांना पोषक असणारे वातावरण टिकवून ठेवणे आव्हानात्म आहे. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, सुमारे ५० कोटी वर्षांच्या आत हा ग्रह राहणीमानासाठी अयोग्य होऊ शकतो. हळू-हळू उत्क्रांत होणाऱ्या के-ड्वार्फ ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या ग्रहांना जैविक उत्क्रांतीसाठी अधिक वेळ मिळू शकतो, तथापि त्यांच्यावर जीवसृष्टी तग धरून ठेवू शकते का हे वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून आहे.
युरोपियन स्पेस एजन्सीची 2027 मध्ये प्रक्षेपित होणारी 'प्लेटो' मोहीम संभाव्यतः जीवसृष्टीला आधार देऊ शकणाऱ्या ग्रहांना ओळखण्यास मदत करेल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर संशोधक त्यांच्या वातावरणातील हवामानाचे परीक्षण करू शकतील, ज्यांचा संबंध जैविक क्रियाकलपांशी असू शकतो.
जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप आणि भविष्यातील वेधशाळा, ज्यात चिलीमधील 'एक्स्ट्रीमली लार्ज टेलिस्कोप' आणि नासाची प्रस्तावित 'हॅबिटेबल वर्ल्ड्स ऑब्झर्व्हेटरी' यांचा समावेश आहे, या संशोधनात योगदान देऊ शकतात. सध्या तरी, जीवसृष्टीस योग्य ग्रह ही एक वैज्ञानिक शक्यता आहे, ती अद्याप निश्चित झालेला शोध नाही. भविष्यातील निरीक्षणांमुळे सौरमंडळाच पृथ्वीपेक्षा अधिक जीवसृष्टीस योग्य ग्रह अस्तित्वात आहेत की नाही, हे ठरविण्यात मदत होऊ शकते.