• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /विश्व
  • /14 व्या वर्षी स्थापन केला स्वत:चा देश, 21 व्या वर्षी UN कडून पुरस्कार! हा तरुण कोण? त्याने स्थापन केलेला देश आहे कुठे? A To Z माहिती

14 व्या वर्षी स्थापन केला स्वत:चा देश, 21 व्या वर्षी UN कडून पुरस्कार! हा तरुण कोण? त्याने स्थापन केलेला देश आहे कुठे? A To Z माहिती

लहानपणापासून असलेली भुगोलाची आवडत त्याला जगभरात प्रसिद्धी मिळवून देणारी ठरली आहे. हा तरुण आहे कोण? त्याने स्थापन केलेला देश आहे कुठे? त्याला का पुरस्कार देण्यात आलाय? जाणून घ्या सविस्तर माहिती...

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 27, 2026, 02:01 PM IST|Updated: Oct 27, 2026, 03:17 PM IST
joinshare
14 व्या वर्षी स्थापन केला स्वत:चा देश, 21 व्या वर्षी UN कडून पुरस्कार! हा तरुण कोण? त्याने स्थापन केलेला देश आहे कुठे? A To Z माहिती
Image Credit: त्याला 21 व्या वर्षी मिळालाय पुरस्कार (फोटो सोशल मीडियावरुन साभार)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

दोन देशांमध्ये जमिनीच्या तुकड्यावरुन वाद झाल्याचं यापूर्वी तुम्ही अनेकदा ऐकलं, वाचलं असेल. पण ही जमीन आमची नाही म्हणत दोन्ही देशांनी एकाच भूभागावरील दावा सोडला तर? बरं मग अशा जागेचं करायचं काय यावरुन तिसऱ्याच व्यक्तीने आणि ते ही अगदी 14 वर्षीय व्यक्तीने येऊन या जागी नवीन देश वसवला तर? आता ही जर तरची गोष्ट तुम्हाला काल्पनिक वाटेल पण खरंच असं झालं असून मागील काही वर्षांपासून हा एक चिमुकला देश म्हणजेच मायक्रोनेशन जगभरात चर्चेत आहे. अर्थात या देशाला असून अधिकृत मान्यता मिळालेली नसून आधी ज्या देशाने या भूभागावरील दावा सोडलेला त्यापैकीच एका देशाने या नव्या देशाचा विरोध केला असून या भूभागात बॅरिगेटींग केलं आहे. हा देश कोणता? तो कोणी वसवलाय? त्याचं स्टेटस काय? याबद्दल जाणून घेऊयात सविस्तरपणे...

या देशाचं नाव काय?

तर ज्या देशाबद्दल आपण बोलतोय त्याचं नाव आहे वर्दिस! तर अधिकृत नाव आहे, 'द फ्री रिपब्लिक ऑफ वर्दिस'! क्रोएशिया आणि सर्बिया या दोन देशांच्या सीमेजवळ जमिनीचा एक असा तुकडा आहे, ज्यावर यापैकी कोणत्याही देशाचा दावा नाही. याच दोन्ही देशांनी नाकारलेल्या तुकड्यावर  लहानपणापासून भूगोलाची आवड असलेल्या डॅनियल जॅक्सन ब्रिटीश-ऑस्ट्रेलियन तरुणाने वर्दिस हा देश स्थापन केला आहे. वयाच्या 14 वर्षी डॅनियलने ही घोषणा केली. या देशाची घोषणा 30 मे 2019 रोजी करण्यात आली. चार वर्षांनंतर म्हणजेच 2023 मध्ये ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या डॅनियलने आपल्या काही मित्र मिळून, व्हॅटिकन सिटीपेक्षा थोड्या मोठ्या असलेल्या या जागेवर एका नवीन राष्ट्राची घोषणा करत प्रत्यक्षात इथे पोहोचले. वर्दिस हे नाव लॅटिन भाषेतील 'हिरवा' या शब्दावरून ठेवण्यात आले आहे. या नावाच्या माध्यमातून या भूभागावर असलेल्या झाडांनाच दर्शवण्याबरोबरच एक पर्यावरणाबाबत जागरूक राष्ट्र घडवण्याची संस्थापकांची इच्छा असल्याचं सांगितलं जात आहे.

...तर ठरेल जगातील दुसरा सर्वात लहान देश

क्रोएशिया आणि सर्बिया यांच्यातील सीमावादामुळे डॅन्यूब नदीकाठच्या सुमारे 0.5 चौरस किलोमीटरच्या पॉकेट-थ्री नावाने ओळखल्या जाणाऱ्या जमिनीच्या तुकड्यावर हा देश वसवण्यात आला आहे. या भागावर दोन्ही देशांपैकी कोणाचाच दावा नसल्याने तिसऱ्यानेच येऊन त्यावर दावा सांगितला आहे. यापूर्वी ही जमीन दोन्ही देशांकडून कोणाचीही मालकी नसलेली म्हणजेच नो मॅन्स लँड म्हणून ओळखली जात होती. या ठिकाणी डॅनियल आणि त्याच्या मित्रांनी आपल्या कल्पनेतील वर्दीस देशाची घोषणा करुन 2023 मध्ये स्वत: केलेला ध्वज फडकवला. या देशाचं अगदी क्षेत्रफळ मोजून 0.501 चौरस किलोमीटर इतकं आहे. साधारण 123.8 एकर म्हणता येईल एवढा हा एरिया आहे. भविष्यात खरोखरच या देशाला अधिकृत मान्यता मिळाली, तर हा व्हॅटिकन सिटीनंतर जगातील दुसरा सर्वात लहान देश ठरू शकतो.

Verdis is a new, small country in Europe created by a group of young people. The country issues its own passports, citizens and has representative offices. #verdis #news #travel https://t.co/mrDE5c24oa

— Verdis (@verdisgov) October 21, 2026

अधिकृत भाषा कोणती आणि राज्यव्यवस्था कशी चालते?

वर्दिसने 'युरो' हे आपले अधिकृत चलन म्हणून स्वीकारले असून देशाला तीन अधिकृत भाषा असल्याचं सांगण्यात आलं आहे. इंग्लिश, क्रोएशियन आणि सर्बियन भाषेला वर्दिसने राष्ट्रीय अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली आहे. संस्थापकांनी केलेल्या दाव्यानुसार, वर्दिसमध्ये येथे घटनात्मक प्रजासत्ताक आणि थेट लोकशाही पद्धतीचे सरकार चालवले जाते. संस्थापक डॅनियल जॅक्सन हेच देशाचे अध्यक्ष आहेत.

नागरिक म्हणून आलेल्यांना हाकललं

वर्दिसने स्वतःचा पासपोर्ट, राष्ट्रध्वज आणि ई-रेसिडेन्सी सेवा सुरू केली आहे. जगभरातून सुमारे 15 हजारांहून अधिक लोकांनी या देशाच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. त्यापैकी केवळ 400 जणांना वर्दिसकडून अधिकृत नागरिकत्व देण्यात आले आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये जेव्हा वर्दिसच्या संस्थापकासहीत नागरिकत्व मिळालेल्यांनी या जमिनीवर कायमस्वरूपी वस्ती उभारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा क्रोएशियाने त्यांना विरोध केला. क्रोएशियाच्या सुरक्षा दलांनी या कथित देशाच्या नागरिकांना तिथून हाकलून लावले आणि तिथे नाकेबंदी केली. सध्या क्रोएशियाच्या विरोधामुळे वर्दिसचे सरकार या मूळ भूमीवरून म्हणजेच या वादग्रस्त जमिनीवरुन काम करत नाहीये. या ठिकाणचं सरकार 'निर्वासित सरकार' म्हणून ब्रिटनमधील डोव्हर आणि सर्बियाची राजधानी बेलग्रेड येथून आपले कामकाज चालवते.

संस्थापकाचा झाला सत्कार

याच महिन्यात म्हणजेच, ऑक्टोबर 2026 मध्ये वर्दिसचा संस्थापक डॅनियल जॅक्सनला एका पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. वयाच्या 14 व्या वर्षी देशाची घोषणा करुन वयाच्या 21 व्या वर्षी वर्दिस या मायक्रोनेशन दर्जाच्या देशाने मानवी हक्क आणि पर्यावरण संरक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या (UN) एका कार्यक्रमात एका संस्थेकडून डॅनियलला आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
International News