• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /विश्व
  • /Explainer: 28 वर्ष 58,000 KM पायी चालत 29 देशांची सफर करणारा जगातील एकमेव पर्यटक; संपूर्ण प्रवासातील एक सर्वात थरारक क्षण

Explainer: 28 वर्ष 58,000 KM पायी चालत 29 देशांची सफर करणारा जगातील एकमेव पर्यटक; संपूर्ण प्रवासातील एक सर्वात थरारक क्षण

एका सोलो ट्रॅव्हलरने तब्बल 29 देशांची सफर केले आहे. हे सर्व 29 देश त्याने पायी चालत फिरले आहेत. 28 वर्ष पायी चालत त्याने 58,000 KM अंतर कापले आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Oct 19, 2026, 11:53 PM IST|Updated: Oct 19, 2026, 11:58 PM IST
joinshare
Explainer: 28 वर्ष 58,000 KM पायी चालत  29 देशांची सफर करणारा जगातील एकमेव पर्यटक; संपूर्ण प्रवासातील एक सर्वात थरारक क्षण

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

कार्ल बुशबी  :  मनात आणलं तर अशक्य गोष्ट देखील सहज शक्य होते हे कार्ल बुशबी नावाच्या एका पर्यटकाने सिद्ध करुन दाखवले आहे.  कार्ल बुशबी यांनी 28 वर्ष 58,000 KM पायी चालत  29 देशांची सफर केली आहे. 1998 मध्ये त्यांनी पायी जगप्रदक्षिणेला सुरुवात केली. आता जवळपास तीन दशकांनंतर ते मायदेशी परतले आहेत. यावेळी त्यांनी त्यांच्या संपूर्ण प्रवासातील एक सर्वात थरारक क्षण सांगितला आहे. शेवटचा थांबा त्याच्या आईचे घर आहे.

57 वर्षांचे कार्ल बुशबी हे ब्रिटिश रहिवासी आहेत. 5 ऑक्टोबर रोजी त्यांनी इंग्लिश चॅनल पोहून पार केले. हाच त्यांच्या रोमांचक प्रवासातील सर्वात आव्हानात्मक अंतिम टप्प्यांपैकी एक होता. इंग्लिश चॅनल पार केल्यानंतर, ते  फ्रान्सहून इंग्लंडला परतले.  डोव्हरमध्ये थोडा वेळ विश्रांती घेतली. जवळपास 28 वर्षांनंतर त्यांनी आपल्या मायभूमीवर  पाऊल ठेवले.  हा त्यांच्यासाठी एक अत्यंत भावनिक क्षण होता.

कार्ल बुशबी यांना पायी जगभ्रमंती करण्याची प्रेरणा कुणामुळे मिळाली?

कार्ल बुशबी यांच्या पायी जगभ्रमंती करण्याच्या  अनोख्या प्रवासामागे एक रंजक कहाणी आहे. 1990 च्या दशकात, त्यांच्या वडिलांनी त्यांना वाढदिवसाचे एक कार्ड दिले होते. या कार्डवर बेरिंग सामुद्रधुनी ओलांडून लंडनहून न्यूयॉर्कला पायी जाण्याच्या प्रवासावरून वाद घालणारे दोन सैनिक चित्रित करण्यात आले होते. हे चित्र त्यांनी फक्त पाहिले नाही तर त्याचा खोलवर विचार केला. यातून त्यांना पायी जगभ्रमंती करण्याचे धाडस सुचले.  एक नकाशा उचलून जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्याचा मार्ग काढला. स्वत:लाच त्यांनी हे आव्हान दिले आणि आयुष्यात हे आव्हान पूर्ण करण्याचा धाडसी निर्णय घेतला. कार्ल बुशबी यांनीच त्यांच्या या धाडसी प्रवासाचा अनुभव सांगितला आहे.  

कार्ल बुशबी यांनी 12 वर्षात घरी येण्याचे टार्गेट ठेवले होते पण...

कार्ल बुशबी  पूर्वी ब्रिटिश सैन्यात पॅराट्रूपर म्हणून कार्यरत होते. सैन्यातून निवृत्त झाल्यावर त्यांनी 1 नोव्हेंबर 1998 रोजी चिलीमधून आपल्या प्रवासाला सुरुवात केली.  खिशात फक्त काहीशे डॉलर्स होते. प्रवास सुरू केला, तेव्हा त्यांना वाटले होते की तो सुमारे12  वर्षांत घरी परत येतील.  परंतु नंतरच्या परिस्थितीने त्यांचे प्रवासाचे संपूर्ण नियोजन बदलून गेले आणि जवळपास 12 वर्षांच्या दुप्पट वेळ लागला. 

कार्ल बुशबी यांना प्रवासात कोणत्या अडचणी आल्या?

चिली सोडल्यानंतर, कार्ल उत्तरेकडे अमेरिकेकडे निघाले. त्यानंतर, अलास्काहून रशियामध्ये जाण्यापूर्वी त्यांनी बेरिंग सामुद्रधुनी गोठण्याची वाट पाहिली. एप्रिल 2012 मध्ये, रशियाने त्यांचा दुसरा व्हिसा नाकारला. त्यानंतर कार्ल वॉशिंग्टन डी.सी. येथील रशियन दूतावासापर्यंत चालत गेले. नंतर, बंदी उठल्यावर त्यांनी आपला प्रवास पुढे सुरु ठेवला.

रशियातून निघून ते मंगोलिया आणि चीनमध्ये पोहोचले, त्यानंतर त्यांनी कझाकस्तानपासून अझरबैजानपर्यंत कॅस्पियन समुद्र पोहून पार केला. यानंतर मग त्यांनी युरोपच्या दिशेने आपला प्रवास सुरू ठेवला.
संपूर्ण प्रवासा दरम्यान आर्थिक संकट, व्हिसा निर्बंध, युद्ध, देशांमधील राजकीय तणाव आणि कोविड-19 महामारी यांसारख्या परिस्थितींमुळे त्याच्या प्रवासात वारंवार व्यत्यय आला. सरकारी प्रक्रिया आणि प्रवासबंदीमुळेही त्याचा बराच वेळ वाया गेला. आपल्या नियोजित मार्गावरुन कोणत्याही अडथळ्यांशिवाय प्रवास झाला असता तर 12 वर्षांत पूर्ण झाला असता. आता मात्र, अडथळ्यांमुळे या प्रवासाला 28 वर्षे लागली असे कार्ल बुशबी यांनी सांगितले.

जीवाला धोका

कार्ल बुशबी यांच्या सोबत प्रवासादरम्यान अशा काही घटन घडल्या की ज्यामुळे थेट त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. त्यांना अनेकदा जीवघेण्या परिस्थितींचा सामना करावा लागला. अनेक ठिकाणी  बंदुकीचा धाक दाखवून थांबवण्यात आले.  अनेक ठिकाणी त्यांना देशाबाहेरही काढण्यात आले. अनेक वेळा तो बुडून किंवा तहान लागून मरण्याच्या अगदी जवळ पोहोचला होते.  जंगली प्राण्यांकडूनही धोका होता. वाटेत भेटलेल्या अनोळखी लोकांनी त्याला पुढे जात राहण्याची शक्ती दिली. माणसे अनेकदा स्वतःच्या सामर्थ्याला कमी लेखतात आणि हे जग दुरून दिसते तितके भीतीदायक नसते असं कार्ल बुशबी म्हणाले. 

कार्ल बुशबी  यांनी जवळपास 36,000 मैलांचा प्रवास करत 29 देश फिरले आहेत. कार्ल बुशबी आता त्यांच्या प्रवासाच्या अंतिम टप्प्यावर आले आहत. युकेमधील हल येथे असलेल्या त्याच्या आईच्या घरी पोहोचण्यासाठी त्याला अजून 240 मैल, म्हणजेच सुमारे 386 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. 1 नोव्हेंबर 1998 रोजी चिलीमधून त्यांनी आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती.  त्यामुळे 1 नोव्हेंबर 2026 पर्यंत घरी पोहोचण्याचे त्यांचे ध्येय आहे. इतकी वर्षे पायी चालल्याने गुडघे आणि घोटे दुखू लागल्याचे कार्ल बुशबी यांनी सांगितले. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra Tourism
Marathi News