• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /विश्व
  • /बॅगमध्ये फ्री पॅलेस्टाईनच्या चिठ्ठ्या...कॅप्टन स्मिथवर हल्ला करणाऱ्या सह-वैमानिकाचे नाव उघड! हल्लेखोराची हादरवणारी माहिती समोर

बॅगमध्ये फ्री पॅलेस्टाईनच्या चिठ्ठ्या...कॅप्टन स्मिथवर हल्ला करणाऱ्या सह-वैमानिकाचे नाव उघड! हल्लेखोराची हादरवणारी माहिती समोर

कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करणाऱ्या सहवैमानिकाची ओळख पटली असून त्याबद्दल हादरवणारी माहिती समोर आली आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Oct 03, 2026, 10:22 AM IST|Updated: Oct 03, 2026, 10:27 AM IST
joinshare
बॅगमध्ये फ्री पॅलेस्टाईनच्या चिठ्ठ्या...कॅप्टन स्मिथवर हल्ला करणाऱ्या सह-वैमानिकाचे नाव उघड! हल्लेखोराची हादरवणारी माहिती समोर
Image Credit: कॅप्टन स्मिथवर हल्ला करणाऱ्या सह-वैमानिकाचे नाव उघड

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

'फ्लायदुबई'च्या FZ1073 या विमानात कॉकपिटमध्ये  कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करणाऱ्या ओमानच्या सह-पायलटबद्दल अनेक धक्कादायक आणि हादरवणारी माहिती समोर आली आहे.  मुख्य वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर कॉकपिटमध्येच प्राणघातक चाकूहल्ला करणाऱ्या संशयित सहवैमानिकाची अधिकृत ओळख आता समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणा आणि माध्यमांच्या माहितीनुसार, त्या सह पायलटचे नाव हमाल अल हमामी आहे. धक्कादायक म्हणजे एअर ओमानने त्याच्यावर बंदी घातली होती. धक्कादायक म्हणजे तिला अटक केल्यानंतर त्याच्या बॅगेतून फ्री पॅलेस्टाइनच्या पत्रकांसह विविध वस्तू सापडल्या आहेत.

कोण आहे आरोपी हमाम अल-हमामी?

संशयित हमाम अल-हमामी हा ओमानचा रहिवासी असून सुमारे वर्षभरापूर्वीच तो 'फ्लायदुबई' कंपनीत सहवैमानिक म्हणून रुजू झाला होता.

विमान आकाशात असताना हमामीने अचानक सोबत आणलेल्या मुख्य वैमानिक कॅप्टन स्मित यांच्यावर धारदार चाकूने सपासप वार केले. त्याचा उद्देश कॅप्टनना पूर्णपणे निष्प्रभ करून १८० प्रवाशांसह असलेल्या 'बोईंग ७३७ मॅक्स ८' विमानाचा ताबा मिळवणे आणि ते क्रॅश करणे हा होता, असा संशय त्यांना आहे.

शरीरावर गंभीर वार झाले असतानाही मुंबईकर कॅप्टन स्मित मच्छार यांनी स्वतःचा तोल सावरला, कॉकपिटचा दरवाजा उघडून केबिन क्रू आणि प्रवाशांची मदत घेतली आणि अल-हमामीला रोखून धरले. त्यानंतर विमानाचे सौदी अरेबियातील ताबूक विमानतळावर सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग केलं.

आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांकडून कसून चौकशी


इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या तीव्र तणावाच्या काळात एका इस्रायली प्रवाशांनी भरलेल्या विमानाला लक्ष्य करण्याचा हा प्रयत्न पूर्वनियोजित होता का, तसंच अल-हमामीचे कोणत्याही दहशतवादी वा कट्टरतावादी विचारसरणीशी संबंध आहेत का, याचा कसून तपास करण्यात येत आहे.

An unforgettable conversation with Captain Smit, filled with pride and emotions. pic.twitter.com/CCf46PKOWR

— Narendra Modi (@narendramodi) October 2, 2026

 विमानाचे लँडिंग झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी आरोपी हमाम अल-हमामीला तत्काळ ताब्यात घेतले असून, त्याच्यावर विमानाचे अपहरण करण्याचा प्रयत्न, हत्येचा कट आणि दहशतवादी कलमांन्वये कारवाई सुरू आहे.

 

 

कॅप्टन स्मित मच्छार यांच्या अतुलनीय शौर्यामुळे ९/११ सारखा भीषण कट टळला असून, आरोपी हमाम अल-हमामीच्या संपूर्ण पार्श्वभूमीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर तपास केला जातोय. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Breaking News
Latest News