• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /विश्व
  • /उष्णतेच्या लाटा, मुसळधार पाऊस आणि महाभयानक हवामान! ॲमेझॉनच्या जंगलापासून ते अटलांटिक महासागराला मोठा धोका

उष्णतेच्या लाटा, मुसळधार पाऊस आणि महाभयानक हवामान! ॲमेझॉनच्या जंगलापासून ते अटलांटिक महासागराला मोठा धोका

वाढत्या तापमानामुळे मेझॉनच्या जंगलापासून ते अटलांटिक महासागराला मोठा धोका निर्माण झाला आहे. 1.5 डिग्री तापमान झाले तर याचे गंभीर परिणा होऊ शकतात. उष्णतेच्या लाटा, मुसळधार पाऊस आणि महाभयानक हवामान स्थिती निर्माण होऊ शकते.

Reported ByVanita Kamble
Published: Oct 21, 2026, 10:08 PM IST|Updated: Oct 21, 2026, 10:14 PM IST
joinshare
उष्णतेच्या लाटा, मुसळधार पाऊस आणि महाभयानक हवामान!  ॲमेझॉनच्या जंगलापासून ते अटलांटिक महासागराला मोठा धोका

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

जागतिक तापमान : अल निनो सक्रिय झाल्यामुळे जगभरात हवामानात चित्र विचित्र बदल झाले आहेत. अशातच आता आणखी एक धोका निर्माण झाला आहे. पृथ्वीच्या तापमानातील वाढ धोकादायक टप्प्यावर पोहचली आहे.  जगभरात तापमान वेगाने वाढत आहे. जागतिक तापमानान 1.5 अंश सेल्सियसचा टप्पा ओलांडू शकते. वाढत्या तापमानामुळे   ॲमेझॉनच्या जंगलापासून ते अटलांटिक महासागराला मोठा धोका निर्माण झाला आहे. 

कोळसा, पेट्रोल आणि डिझेल यांसारखी इंधने जाळल्याने उत्सर्जित होणारे वायू पृथ्वीच्या वाढत्या तापमानाला कारणीभूत ठरत आहेत. यामुळे फक्त  हवामान बदल होत नाही तर  याचा परिणाम जंगले, महासागर देखील होत आहे. जर्मनीतील पॉट्सडॅम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट इम्पॅक्ट रिसर्चचे संचालक योहान रॉकस्ट्रॉम यांनी वाढत्या तापमानाबाबत चिंता व्यक्त केली असून अत्यंत धोकादायक इशारा दिला आहे. येत्या काही वर्षांत पृथ्वीचे सरासरी तापमान औद्योगिक क्रांतीपूर्व पातळीच्या तुलनेत 1.5°C चा टप्पा ओलांडू शकते. यामुळे जागतित हवामानात महाभयानक बदल होऊ शकतो.  उष्णतेच्या लाटा, मुसळधार पाऊस तसेच इतर तीव्र हवामान घटना  वारंवार घडू शकतात असा इशारा त्यांनी दिला आहे.

रॉकस्ट्रॉम यांनी एका परिषदेत तापमान वाढीच्या धोक्याबाबत भाष्य केले आहे.  ॲमेझॉनचे वर्षावन आणि प्रवाळ बेटे या मोठा धोका निर्माण झाला आहे. वाढत्या तापमानाचा यावर गंभीर परिणाम होत आहे. अटलांटिक महासागराच्या जल परिसंचरण प्रणालीला  धोका निर्माण झाला आहे. जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी प्रदूषण कमी करण्याबरोबरच निसर्गाचे संरक्षण करणे आवश्यक आहे.

जागतिक तापमानवाढीमुळे फक्त उष्णता निर्माण होत नाही तर इतक अनेक गंभीर समस्या निर्माण करत आहे. त्यामुळे  पर्जन्यवृष्टी, दुष्काळ आणि महासागराशी संबंधित नैसर्गिक प्रणालींमध्येही बदल होऊ शकतो. वाढत्या तापमानामुळे उष्णतेच्या लाटा आणि अतिवृष्टीच्या घटनांचा धोका वाढू शकतो. फक्त मानवांवरच नाही, तर वनस्पती आणि प्राण्यांवरही याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.

अमेझॉन जंगलाचे अस्तित्व धोक्यात

येत्या काही वर्षांत जग 1.5°C तापमानाचा टप्पा ओलांडू शकते. तापमान 1.5°C ने वाढेल, तर जगभरातील सरासरी तापमान इतक्या प्रमाणात वाढेल. अमेझॉन वर्षावन हे जगातील सर्वात मोठ्या उष्णकटिबंधीय जंगलांपैकी एक आहे.  हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेण्यास मदत करते.  पृथ्वीचे तापमान नियंत्रित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.  वाढते तापमान, वणवे आणि जंगलतोड यामुळे या जंगलाला हानी पोहोचत आहे. जर जंगलाचा मोठा भाग नष्ट झाला, तर हवामान बदलाचा धोका वाढू शकतो.

अटलांटिक महासागराला धोका

समुद्राचे पाणी  खूप गरम होते, तेव्हा प्रवाळांचा नैसर्गिक रंग बदलतो. या प्रक्रियेला प्रवाळ विरंजन (कोरल ब्लीचिंग) म्हणतात. जर पाण्याचे तापमान दीर्घकाळ वाढलेले राहिले, तर प्रवाळ मरू शकतात. यामुळे इतर सागरी जीवांनाही हानी पोहोचू शकते.

अटलांटिक महासागरातील पाण्याचा प्रवाह जगाच्या हवामानावर परिणाम करतो. या प्रणालीचा एक भाग कॅरिबियनमधून पश्चिम युरोपपर्यंत उष्ण पाणी वाहून नेतो, ज्यामुळे युरोपच्या हवामानावर परिणाम होण्यास मदत होते. या प्रणालीच्या काही भागांना वाढत्या धोक्यांचाही सामना करावा लागत आहे. वाढती उष्णता आणि वितळणाऱ्या बर्फामुळे महासागरातील गोड्या पाण्याचे प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे पाण्याच्या प्रवाहात बदल होऊ शकतो. असे झाल्यास, अनेक भागांतील हवामानावर त्याचा परिणाम होऊ शकतो असं रॉकस्ट्रॉम म्हणाले.

वाढते प्रदूषण तातडीने नियंत्रणात आणणे गरजेचे

भविष्यातील धोका टाळण्यासाठी वाढते प्रदूषण तातडीने नियंत्रणात आणणे गरजेचे आहे.  प्रदूषण कमी करण्याबरोबरच निसर्गाचे रक्षण करणेही महत्त्वाचे आहे. कंपन्यांनी हवामान बदल आणि नैसर्गिक ऱ्हास या दोन्ही गोष्टी एकाच वेळी समजून घेतल्या पाहिजेत.  जंगले, वनस्पती, प्राणी आणि जलस्रोतांचे संरक्षण करण्याबरोबरच कोळसा, पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करणे अत्यावश्यक आहे असे रॉकस्ट्रॉम म्हणाले. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
india