SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

इस्रायलमध्ये रेजिम चेंज! मोदींच्या मित्राचं सरकार पडलं; लोकशाही मार्गाने माजी लष्करप्रमुख होणार पंतप्रधान

इस्रायलमधील सर्वोच्च कायदेमंडळ अशी ओळख असलेल्या वनेसेटसाठी 27 ऑक्टोबर रोजी झालेल्या निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. मात्र आकड्यांची जुळवाजुळव करण्यात नेतन्याहू मागे पडल्याचं दिसत आहे.

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 06, 2026, 07:38 AM IST | Updated: Nov 06, 2026, 07:55 AM IST
Image Credit: विरोधक स्थापन करणार सत्ता (फोटो रॉयटर्स आणि एएफपीवरुन साभार)
Join

इस्रायलचे विद्यमान पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांना पायउतार व्हावं लागणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. 120 सदस्यांच्या संसदेत अरबांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन पक्षांनी यशर पक्षाचे नेते गादी आयसेनकोट यांना पाठिंबा जाहीर केला आहे. इस्रायलमधील प्रमुख अरब राजकीय पक्षांची आघाडी असलेल्या ‘जॉइंट लिस्ट’ने आयसेनकोट यांना पाठिंबा जाहीर केल्याने नेतान्याहू यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. आता नेतान्याहू यांना पंतप्रधानपद सोडावं लागणार आहे.

कोणाला किती जागा मिळाल्या?

इस्रायलमधील सर्वोच्च कायदेमंडळ अशी ओळख असलेल्या वनेसेटसाठी 27 ऑक्टोबर रोजी झालेल्या निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. 120 जागा असलेल्या वनेसेटमध्ये बहुमताचा आकडा हा 61 इतका आहे. मात्र नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या लिकुड आणि चार ज्यू पक्षांच्या आघाडीला 53 जागा मिळाल्यात. तर यशर पक्षाच्या आघाडीला 48 जागांवर विजय मिळाला. या निवडणुकीमध्ये अरबांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पक्षांना 19 जागा मिळवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. 

अति-उजव्या पक्षानेही दिला धक्का

नेतान्याहू यांना अजून एक धक्का दिला तो 'युनायटेड तोराह ज्युडाइझम' या अति-उजव्या पक्षाने. नेतान्याहू यांच्या लिकुडला हा अति-उजवा पक्ष पाठिंबा देईल असं वाटत होतं. मात्र त्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे नेतन्याहू यांच्या निरोपावर शिक्कामोर्तब झालं आहे. इस्रायलमध्ये सरकार स्थापन करण्याची जबाबदारी राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग यांच्यावर आहे. 11 नोव्हेंबरपर्यंत इस्रायलमध्ये नवीन सरकार स्थापन करावं लागणार आहे. तोपर्यंत सरकार स्थापन झालं नाही तर पुन्हा निवडणुकीची घोषणा करावी लागेल.

इस्रायलच्या राजकारणाला नवं वळण

सध्याची आकड्यांची स्थिती पाहता अध्यक्ष आयझॅक हरझॉग लवकरच गादी आयसेनकोट यांना सरकार स्थापनेचे आमंत्रण देण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. खरोखरच गादी आयसेनकोट पंतप्रधान झाले तर या माध्यमातून इस्रायलच्या राजकारणाला नवं वळण मिळेल. पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्या हातातून सत्ता जाणार हे स्पष्ट झाल्याने प्रमुख विरोधक आणि माजी लष्करप्रमुख गादी आयसेनकोट यांच्या पंतप्रधान होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.  रविवारी हरझॉग हे पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करणार असल्याचे समजते.

विरोधकांच्या सरकारला किती पाठिंबा?

‘जॉइंट लिस्ट’ने दिलेल्या पाठिंब्यामुळे गादी आयसेनकोट यांच्या नेतृत्वाखाली यशर पक्षासोबत निवडणूक लढलेल्या विरोधी आघाडीचं सरकार इस्रायलमध्ये सत्तेत येणार आहे. विरोधकांनी सरकार स्थापनेसाठी आवश्यक बहुमताचा 61 जागांचा टप्पा पार करत 67 सदस्यांचं समर्थन मिळणार असल्याची माहिती आहे. ‘एएफपी’ या वृत्तसंस्थेनं ही बातमी दिली आहे. 'जॉइंट लिस्ट'नं अधिकृत निवेदन जारी करत अध्यक्ष आयझॅक हरझॉग यांच्याकडं सरकार स्थापनेसाठी आम्ही यशर पक्षाचे नेते गादी आयसेनकोट यांना पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES