• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /ठाणे
  • /'माझ्या खुर्चीवर बसू नकोस,' रामदास कदम तटकरेंच्या मेहुण्यावर संतापले; स्टेजवरच खडाजंगी 'माझ्यावर मेहरबानी करतो का...'

'माझ्या खुर्चीवर बसू नकोस,' रामदास कदम तटकरेंच्या मेहुण्यावर संतापले; स्टेजवरच खडाजंगी 'माझ्यावर मेहरबानी करतो का...'

शिवसेना नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरेंच्या मेहुण्याला खुर्चीवरून झापलं. पोयनार धरण कार्यक्रमात ही खडाजंगी पहायला मिळाली.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 06, 2026, 08:37 AM IST|Updated: Nov 06, 2026, 08:40 AM IST
joinshare
'माझ्या खुर्चीवर बसू नकोस,' रामदास कदम तटकरेंच्या मेहुण्यावर संतापले; स्टेजवरच खडाजंगी 'माझ्यावर मेहरबानी करतो का...'
Image Credit: रामदास कदम तटकरेंच्या मेहुण्यावर संतापले

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'माझ्या खुर्चीवर बसू नकोस,' रामदास कदम तटकरेंच्या मेहुण्यावर संतापले; स्टेजवरच खडाजंगी 'माझ्यावर मेहरबानी करतो का...'

'माझ्या खुर्चीवर बसू नकोस,' रामदास कदम तटकरेंच्या मेहुण्यावर संतापले; स्टेजवरच खडाजंगी 'माझ्यावर मेहरबानी करतो का...'

2

5 लाख कोटी रुपये द्या आणि... हल्ले थांबवण्यासाठी बंडखोरांच्या ऑफरमध्ये दोनच अटी; नेमका हा प्रकार काय? कोणाकडे मागितले एवढे पैसे?

3

महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढणार; नोव्हेंबरमध्येच गाठला उच्चांक तापमानाचा पारा, हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

4

'तुमचा परवाना दाखवा,' दुकानात घुसून FDA अधिकाऱ्यांची दुकानदाराकडे मागणी; पण एक प्रश्न विचारताच फिरले माघारी, मोठा ट्विस्ट

5

इस्रायलमध्ये रेजिम चेंज! मोदींच्या मित्राचं सरकार पडलं; लोकशाही मार्गाने माजी लष्करप्रमुख होणार पंतप्रधान

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

शिवसेना नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरेंच्या मेहुण्याला थेट मंचावरुन झापलं आहे. खेडमध्ये आयोजित पोयनार धरणाच्या भूमिपूजन सोहळ्यात भर मंचावर चांगलाच वाद पेटला. रामदास कदम यांनी मंचावरुनच 'माझ्या खुर्चीवर बसू नकोस' अशा शब्दांत सुनावलं. इतकंच नाही तर 'थेट वरची पायरी गाठू नका' असा सज्जड दमही भरला. यानंतर दोघांमध्ये खडाजंगी झाल्याने कार्यक्रमात काही काळासाठी थोडं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

झालं असं की, शिवसेना नेते रामदास कदम भाषण करत असताना सुनील तटकरे यांचे मेहुणे अजय बिरवटकर थेट कदमांच्या राखीव खुर्चीवर जाऊन बसले. हे पाहताच कदम रामदास कदम यांनी आपलं भाषण थांबवत ''माझ्या खुर्चीवर बसू नकोस, एका एका पायरीने वर जा, थेट वरची पायरी गाठू नका'' असा सज्जड दम भरला. यावर बिरवटकरांनीही हात जोडून नाराजी व्यक्त केली.

यानंतर रामदास कदम यांनी अजय बिरवटकरांसाठी खूर्चीची व्यवस्था करण्यास सांगितलं. मात्र अजय बिरवटकर यांनी रामदास कदम यांना म्हटलं की, 'मी हात जोडून विनंती करत आहे. मी दु:खात असतानाही कार्यक्रमासाठी आलो आहे'. त्यावर रामदास कदम यांनी माझ्यावर मेहरबानी केली असं सुनावलं. तसंच मी भाषण करतोय असं सांगत थांबण्यास सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, "दु:खात मी पण आहे. माझीही आईही गेली आहे. दु:खाचं आम्हाला काय सांगत आहात. आपण लोकांसाठी, जनतेसाठी येथे जमलो आहोत आणि जनसेवा हीच ईश्वरसेवा या माध्यमातून आम्ही काम करत आहोत. जनहिताचं काम आम्ही हाती घेतलं आहे. कोयनेच्या पाण्यावरुन तुम्ही माझ्यावर टीका केली. मी त्याचं उत्तर दिलं नाही. पण मी तुम्हाला फाईल दाखवीन".

 

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर मतदारसंघातील सिंचन क्रांतीला नवी दिशा! गेली २६ वर्षे रखडलेल्या पोयनार लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या २६५.३८ कोटी रुपयांच्या पुनरुज्जीवन कामाचा भव्य भूमिपूजन सोहळा, ज्येष्ठ नेते आदरणीय रामदासभाई कदम यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला. विधानसभेत निवडून आल्यानंतर माझ्या अधिकृत लेटरपॅडवरील पहिले पत्र याच प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी होते. सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आज यश मिळाले आहे. या प्रकल्पामुळे सुमारे १,१०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून १४ गावांतील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. एकाही प्रकल्पग्रस्तावर अन्याय होऊ न देता; पुनर्वसन, मोबदला आणि नागरी सुविधांची कामे प्राधान्याने पूर्ण करून हा प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचा माझा निर्धार आहे. याप्रसंगी माजी आमदार संजयजी कदम, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिताताई केंद्रे, पंचायत समिती सभापती आफिया पालेकर, जिल्हा परिषद सदस्य अरुण (अण्णा) कदम, उपसभापती सुनील मोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, रायगड लोकसभा संपर्कप्रमुख अनिलजी नवगणे, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, माधवीताई बुटाला यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. 📍 पोयनार (ता. खेड) | ५ नोव्हेंबर २०२६ #khed #shivsena

— Yogesh Ramdas Kadam (@iYogeshRKadam) November 5, 2026

 

यानंतर कदमांनी सुनील तटकरेंवरही निशाणा साधत,''धरण भरल्यावर तटकरेंना जलपूजनाला नक्की बोलावू. ते खासदार आहेत ना, जलपूजन त्यांच्या हस्ते करु'' असा खोचक टोला लगावला. या शाब्दिक चकमकीमुळे महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.

पोयनार धरणाचा 25 वर्षांचा वनवास संपला; 265 कोटींच्या कामाचे भूमिपूजन!

कोकणातील बहुचर्चित सिंचन घोटाळ्यात रखडलेल्या खेड तालुक्यातील पोयनार धरणाचा अखेर 25 वर्षांचा वनवास संपला आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पाठपुराव्यामुळे या धरणासाठी 265 कोटी 38 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्याचा भूमिपूजन सोहळा पार पडला.

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर मतदारसंघातील सिंचन क्रांतीला नवी दिशा! - योगेश कदम

गेली 26 वर्षे रखडलेल्या पोयनार लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या 265.38कोटी रुपयांच्या पुनरुज्जीवन कामाचा भव्य भूमिपूजन सोहळा, ज्येष्ठ नेते आदरणीय रामदासभाई कदम यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला. विधानसभेत निवडून आल्यानंतर माझ्या अधिकृत लेटरपॅडवरील पहिले पत्र याच प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी होते. सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आज यश मिळाले आहे. या प्रकल्पामुळे सुमारे 1100 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून 14 गावांतील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. एकाही प्रकल्पग्रस्तावर अन्याय होऊ न देता; पुनर्वसन, मोबदला आणि नागरी सुविधांची कामे प्राधान्याने पूर्ण करून हा प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचा माझा निर्धार आहे अशी पोस्ट योगेश कदम यांनी केली आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
shiv sena
Yogesh Kadam