• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /विश्व
  • /₹230 कोटींचा नफा मिळून दिल्यानंतरही 'या' बँकेने एकाच वेळी 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; नोकरकपातीचं कारणही सांगितलं

₹230 कोटींचा नफा मिळून दिल्यानंतरही 'या' बँकेने एकाच वेळी 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; नोकरकपातीचं कारणही सांगितलं

कष्ट करुन कंपनीला 230 कोटी रुपयांचा नफा करुन दिल्यानंतरही कंपनीने कॉस्ट कटिंगच्या नावाखाली पाच हजार जणांना नोकरीवरुन काढून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नेमकं झालंय काय जाणून घेऊयात...

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 23, 2026, 08:33 AM IST|Updated: Oct 23, 2026, 08:48 AM IST
joinshare
₹230 कोटींचा नफा मिळून दिल्यानंतरही 'या' बँकेने एकाच वेळी 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; नोकरकपातीचं कारणही सांगितलं
Image Credit: आता बँक एआयची मदत घेणार (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य रॉयटर्सवरुन साभार)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

एआय म्हणजेच आर्टिफिशीएल इंटेलिजन्स शाप की वरदान असा प्रश्न निर्माण होण्यासारख्या बातम्या मागील काही काळात समोर येत आहेत. आधी एआयमुळे लोकांच्या नोकऱ्या जाऊ लागल्या आणि नंतर एआयच भविष्यात मानवाचा सर्वात मोठा शत्रू ठरु शकतो अशी शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. यापैकी दुसऱ्या गोष्टीला अजून वेळ असला तरी एआयमुळे नोकऱ्या जाण्याचा प्रकार आताच घडू लागला आहे. आयटी क्षेत्रामध्ये तर एआयमुळे अनेक नोकऱ्या जात असतानाच आता नोकऱ्या जाण्याचा हा ट्रेण्ड थेट बँकिंग क्षेत्रात दिसू लागला आहे. एका जगप्रसिद्ध बँकने एकाच वेळी एक, दोन नाही तर तब्बल 5 हजार कर्मचाऱ्यांना कमावरुन काढून टाकलं आहे. 

कोणती बँक आणि कर्मचारी कपात का केली?

ज्या कंपनीने 5 हजार कर्मचाऱ्यांची कपात केली आहे ती बँक ब्रिटनमधील आहे. बार्कलेज या कंपनीने ही मोठी नोकरकपात केली असून भविष्यात या कंपनीमधून अजून कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, बार्कलेज बँक यंदाच्या वर्षी आपल्या कर्मचारी संख्येपैकी अंदाजे 5 टक्के कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे. बँकेच्या दैनंदिन कामकाजावरील खर्च करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. खर्च कमी करून परतावा सुधारण्याचं लक्ष्य बँक व्यवस्थापनाने समोर ठेवलं आहे. बँकेकडून खर्च कमी करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा दावा केला जात असला तरी बँक नफ्यात असल्याचा दावा या निर्णयाला विरोध करणाऱ्यांकडून केला जातोय. मात्र कर्मचारी कपात करुन एआयच्या मदतीने दैनंदिन कामं पूर्ण करण्याचा बँक व्यवस्थापनाचा मानस आहे. म्हणजेच या 5 हजार नोकऱ्यासुद्धा एआयमुळेच गेल्या आहेत.

230 कोटी रुपयांचा नफा

बार्कलेजने यापूर्वीच सध्या नोकरकपात केलेल्या पदांपैकी एक हजार पदं कमी करत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता उर्वरित कर्मचाऱ्यांच्या कपातीसंदर्भातील तांत्रिक बाबींचं काम सुरु करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे खर्चाचं कारण दिलं जात असलं तरी बार्कलेज बँकेने तिसऱ्या तिमाहीमध्ये 2.3 अब्ज पाउंड म्हणजेच 230 कोटी रुपये नफा कमवला आहे. उच्च व्याजदरांमुळे बँकेच्या नफ्यातही वाढ झाल्याचं सांगितलं जातंय. मागील वर्षाच्या तुलनेत हा नफा अधिक असला तरी तो अपेक्षा इतका नसल्याचा दावा केला जातोय. सध्या बँकेची स्थिती पाहता अधिक नफा होईल असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात होता. फिक्स्ड-इन्कम ट्रेडिंग व्यवसायामध्ये बँकेला फटका बसला असून समाधानकारक कामगिरी करण्यात बँकेला अपयश आलं आहे. त्यामुळेच बँकेच्या खर्चासंदर्भातील गणित बिघडल्याचा दावा केला जातोय. हाच तोटा भरुन काढण्यासाठी आता कर्मचाऱ्यांवर होणारा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने कर्मचारीकपातीचा मार्ग निवडण्यात आल्याची चर्चा आहे. 

शेअर्सही पडले

'बार्कलेज'चे सीईओ सी. एस. व्यंकटकृष्णन यांनी कर्मचारी कपातीबद्दल बोलताना, या विषयाबद्दल बोलताना मला फार खंत वाटतेय. मी निराश आहे, असं नमूद केलं. तसेच बँकेच्या फिक्स्ड-इन्कम ट्रेडिंगच्या सुमार कामगिरीसंदर्भात चिंता वाटत असल्याचंही ते म्हणाले. खरं तर मागील अनेक वर्षांची आकडेवारी पाहिली तर फिक्स्ड-इन्कम ट्रेडिंग हे 'बार्कलेज'च्या यशामागील प्रमुख घटकांपैकी एक राहिलेलं आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणात नोकरकपात केल्याने बार्कलेज बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसत आहे. बँकेचे शेअर्स 14 टक्क्यांनी घसरले आहेत. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Jobs News
Banking News