अमेरिका : अमेरिकेच्या बँकिंग सेक्टरमध्ये मोठी खळबळ माजली आहे. बँक ऑफ अमेरिका , चेस, जेपीमॉर्गन चेस, यूएस बँक, वेल्स फार्गोसह अमेरिकेतील सर्व मोठ्या बँकांचे नेटवर्क ठप्प झाले आहे. अमेरिकेतील सर्वात मोठ्या बँकांच्या ऑनलाइन सेवा विस्कळीत झाल्या. यामुळे ग्राहकांचा गोंधळ उडाला. अमेरिकेची पायाभूत सुविधा आणि डिजिटल प्रणाली सतत्याने मोठा व्यतत्य येत आहे. हवाई वाहतुकीतील व्यत्यय आणि मायक्रोसॉफ्टच्या सेवेतील बिघाडानंतर आता बँकिंग सेक्टरमध्येही तांत्रिक अडथळे आले आहेत.
युनायटेड एअरलाइन्सच्या प्रणालीतील तांत्रिक बिघाड झाला. यामुळे हवाई प्रवाशांच्या अडचणी आणखी वाढल्या. तथापि, काही तासांतच एअरलाइनची प्रणाली पूर्ववत करण्यात आली. यांनतर आता 17 नोव्हेंबर रोजी प्रमुख बँकांच्या नेटवर्तमध्ये अडथळे आले. बँकेचे कोणतेच काम ऑनलाइन होत नसल्याची तक्रार ग्राहकांनी केली. बँक ऑफ अमेरिका , चेस, जेपीमॉर्गन चेस, यूएस बँक, वेल्स फार्गो या बँका तसेच डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म झेलेच्या वापरकर्त्यांनी अचडण येत असल्याची तक्रार केली.
देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या जेपी मॉर्गन चेसच्या अंतर्गत हार्डवेअर प्रणालीतील सॉफ्टवेअरमधील बिघाड झाला यामुळे व्यवहारांना विलंब झाला. चेससोबत व्यवहार करणाऱ्या बँक ऑफ अमेरिका आणि सिटीग्रुपसह इतर बँकांच्या ग्राहकांना देखील अशा प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला. तांत्रिक बिघाडामुळे व्यवहार मंदावले होते. ऑनलाइन बँकिंग सेवा वापरताना अनेक ग्राहकांना 'काही सेवा उपलब्ध झाल्या नाहीत. सायबर हल्ला झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे बँकिंग सेवांमध्ये व्यत्यय आल्याचे बँकांकडून स्पष्ट करण्यात आले.
प्रमुख अमेरिकन विमान कंपनी युनायटेड एअरलाइन्सनेही मोठा तांत्रिक बिघाड झाला होता. कंपनीने ग्राहकांना झालेल्या गैरसोयीबद्दल सोशल मीडियावर माफी मागितली. यामुळे अनेक विमानांचे उड्डाण खळंबले तर, हवेत उड्डाण करत असलेल्या अनेक विमानांना लँडिंगसाठी प्रतिक्षा करावी लागली.