SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

अमेरिकेच्या बँकिंग सेक्टरमध्ये मोठी खळबळ! JPMorgan, Bank Of America सह अमेरिकेतील सर्व मोठ्या बँकाचे नेटवर्क ठप्प

JPMorgan, Bank Of America सह अमेरिकेतील सर्व मोठ्या बँकाचे नेटवर्क ठप्प झाले आहे. अमेरिकेच्या बँकिंग सेक्टरमध्ये मोठी खळबळ माजली आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 17, 2026, 17:03 IST | Updated: Nov 17, 2026, 17:10 IST
Join

अमेरिका :  अमेरिकेच्या बँकिंग सेक्टरमध्ये मोठी खळबळ माजली आहे. बँक ऑफ अमेरिका , चेस, जेपीमॉर्गन चेस, यूएस बँक, वेल्स फार्गोसह अमेरिकेतील सर्व मोठ्या बँकांचे नेटवर्क ठप्प झाले आहे. अमेरिकेतील सर्वात मोठ्या बँकांच्या ऑनलाइन सेवा विस्कळीत झाल्या. यामुळे ग्राहकांचा गोंधळ उडाला.  अमेरिकेची पायाभूत सुविधा आणि डिजिटल प्रणाली सतत्याने मोठा व्यतत्य येत आहे. हवाई वाहतुकीतील व्यत्यय आणि मायक्रोसॉफ्टच्या सेवेतील बिघाडानंतर आता बँकिंग सेक्टरमध्येही तांत्रिक अडथळे आले आहेत. 

युनायटेड एअरलाइन्सच्या प्रणालीतील तांत्रिक बिघाड झाला. यामुळे हवाई प्रवाशांच्या अडचणी आणखी वाढल्या. तथापि, काही तासांतच एअरलाइनची प्रणाली पूर्ववत करण्यात आली. यांनतर आता 17 नोव्हेंबर रोजी  प्रमुख बँकांच्या नेटवर्तमध्ये अडथळे आले. बँकेचे कोणतेच काम ऑनलाइन होत नसल्याची  तक्रार ग्राहकांनी केली. बँक ऑफ अमेरिका , चेस, जेपीमॉर्गन चेस, यूएस बँक, वेल्स फार्गो या बँका तसेच डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म झेलेच्या वापरकर्त्यांनी अचडण येत असल्याची तक्रार केली. 

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या जेपी मॉर्गन चेसच्या अंतर्गत हार्डवेअर प्रणालीतील सॉफ्टवेअरमधील बिघाड झाला यामुळे व्यवहारांना विलंब झाला. चेससोबत व्यवहार करणाऱ्या बँक ऑफ अमेरिका आणि सिटीग्रुपसह इतर बँकांच्या ग्राहकांना देखील अशा प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला.  तांत्रिक बिघाडामुळे व्यवहार मंदावले होते. ऑनलाइन बँकिंग सेवा वापरताना अनेक ग्राहकांना 'काही सेवा उपलब्ध झाल्या नाहीत. सायबर हल्ला झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे बँकिंग सेवांमध्ये व्यत्यय आल्याचे बँकांकडून स्पष्ट करण्यात आले.

अमेरिकेच्या युनायटेड एअरलाइन्सच्या नेटवर्कमध्ये मोठा बिघाड

प्रमुख अमेरिकन विमान कंपनी युनायटेड एअरलाइन्सनेही मोठा तांत्रिक बिघाड झाला होता. कंपनीने ग्राहकांना झालेल्या गैरसोयीबद्दल सोशल मीडियावर माफी मागितली.  यामुळे अनेक विमानांचे उड्डाण खळंबले तर, हवेत उड्डाण करत असलेल्या अनेक विमानांना लँडिंगसाठी प्रतिक्षा करावी लागली.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES