ललित मोदीबद्दल महत्त्वाची अपडेट! 16 वर्षांपासून लंडनमध्ये असल्यामुळे आता..., ऑक्सफर्ड युनियनमध्ये केली मोठी घोषणा
आयपीएलचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष ललित मोदी यांच्याबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी खुद्द ऑक्सफर्ड युनियनमध्ये मोठी घोषणा केली आहे. ललित मोदींना ब्रिटिश नागरिकत्व प्रदान केलं गेलं आहे. शनिवारी झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी सांगितलं की, 15 सप्टेंबर 2026 पासून मी अधिकृतपणे ब्रिटिश नागरिक झालो आहे.
ललित मोदींनी त्याचे सोशल मीडियावर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टला त्यांनी लिहिलंय की, अभिमानाचा क्षण. एक नवीन अध्याय.
तसंच त्यांनी लिहिलं की, आज, 14 नोव्हेंबर 2026 रोजी, मला ऑक्सफर्ड युनियनला संबोधित करण्याचा बहुमान मिळाला. जिथे मी सर्वांसमोर माझ्या आयुष्यातील एका अत्यंत विशेष आणि वैयक्तिक टप्प्याबद्दल सांगितलं.
त्यांनी या पोस्टमध्ये दोन महिन्यांपूर्वीचे फोटो शेअर करत पुढे लिहिलंय की, मला ब्रिटिश नागरिक असल्याचा अभिमान आहे. 15 सप्टेंबर 2026 रोजी, माझं कुटुंब आणि मित्र यांच्या उपस्थितीत, मी माझ्या ब्रिटिश नागरिकत्वाचा सोहळा साजरा केलाय. हा सोहळा माझ्या हृदयाच्या नेहमीच खूप जवळचा राहणार आहे.
त्यांनी पुढे लिहिलंय की, युनायटेड किंगडम अनेक वर्षांपासून माझं घर आहे. हा एक असा देश आहे ज्याचा मी मनापासून आदर करतो आणि जो मला प्रिय आहे. तिथले लोक, संस्था, परंपरा आणि मूल्ये. ब्रिटिश नागरिक बनणे हा एक विशेषाधिकार आणि जबाबदारी आहे, जी मी अभिमान, कृतज्ञता आणि आपलेपणाच्या खऱ्या भावनेने स्वीकारतो.
महत्त्वाचे म्हणजे या पोस्टच्या शेवटी त्यांनी आपलं नाव लिहिताना ललित मोदी, संस्थापक, आयपीएल असं उल्लेख केला आहे.