• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /विश्व
  • /52,000 कर्मचाऱ्यांना एकाचवेळी मेमो पाठवला; स्मार्टफोन चिप बनवणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या कंपनीची कर्मचारी कपातीची घोषणा

52,000 कर्मचाऱ्यांना एकाचवेळी मेमो पाठवला; स्मार्टफोन चिप बनवणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या कंपनीची कर्मचारी कपातीची घोषणा

स्मार्टफोन चिप बनवणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या कंपनीची कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. कंपनीतील 52,000 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Oct 21, 2026, 08:31 PM IST|Updated: Oct 21, 2026, 08:40 PM IST
joinshare
52,000 कर्मचाऱ्यांना एकाचवेळी मेमो पाठवला; स्मार्टफोन चिप बनवणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या कंपनीची कर्मचारी कपातीची घोषणा

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Qualcomm layoffs:  सर्वच क्षेत्रांमध्ये कर्मचारी कपात होत आहे. अशातच आता  स्मार्टफोन चिप बनवणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या कंपनी क्वालकॉमने कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. कंपनीने 52,000 कर्मचाऱ्यांना एकाचवेळी मेमो पाठवला आहे. लवकरच या कर्मचारी कपातीचे स्वरुप स्पष्ट होईल.  कंपनी किती कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे याची नेमकी आकडेवारी उघड झालेली नाही.

कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ

क्वालकॉमने कंपनीने एकाचवेळी 52,000 कर्मचाऱ्यांना मेमो पाठवल्याने खळबळ माजली आहे. अचानक मेमो आल्याने कर्तचारी गोंधळून गेले आहेत. नोकरी राहील की नाही याची चिंता कर्मचाऱ्यांना सतावत आहे. क्वालकॉम ही स्मार्टफोन चिप्स बनवणारी एक प्रमुख कंपनी आहे.कंपनीने  जगभरात नोकरकपात करण्याची तयारी सुरू केली आहे. 

कंपनीचे सीईओ क्रिस्टियानो अमोन यांनी एक मेमो पाठवून कर्मचाऱ्यांना याबद्दल माहिती दिली आहे. कर्मचाऱ्यांना नोकरी कपातीबद्दलची माहिती मिळायला सुरुवात होईल. कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार आणि कंपनीच्या गरजेनुसार घेतला जाईल असे कंपनीच्या सीईओने सांगितले. मात्र, या कर्मचारी कपातीमुळे किती कर्मचाऱ्यांवर परिणाम होईल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. 

क्वालकॉम कंपनीने कर्मचारी कपातीचा निर्णय का घेतला?

इलेक्ट्रॉनिक्स विक्रीतील घट आणि मेमरीच्या वाढत्या किमतींमुळे चिप्सच्या मागणीवरही परिणाम झाला आहे. यामुळेच कामकाजात सुधारणा करण्यासाठी कंपनीने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला असल्याचे प्राथमिक कारण सांगितले जात आहे. कंपनीत  ज्या क्षेत्रांमध्ये कामगिरी अपेक्षेनुसार होत नाही तिथे कंपनी बदल करण्याचा विचार करत असल्याचे सीईओंनी सांगितले.  

किती कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार?

नोव्हेंबर महिन्यात कंपनी सर्व कर्मचाऱ्यांना कर्मचारी कपातीची माहिती देण्यास सुरुवात करणार आहे. सप्टेंबर 2025 पर्यंत, कंपनीमध्ये जगभरात 52,000 कर्मचारी होते. नेमकी किती कर्मचाऱ्यांची कपात करणार याबाबत कंपनीने कोणताही खुलासा केलेला नाही. 

सध्या स्मार्टफोनची मागणी घटली आहे. त्यातच मेमरी चिपच्या किंमती वाढल्याने कंपनीला मोठा फटका बसत आहे.  Qualcomm ही स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि चिपसेट तयार करणारी ही कंपनी आहे. ही स्मार्टफोनसाठी महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान प्रदान करते. या चीपचा वापर फोनचे प्रोसेसिंग, गेमिंग, कॅमेरा आणि एआयसाठी होतो. उत्पन्न वाढीसाठी कंपनीने मोठ्या बदलांचा निर्णय घेतला आहे. यासाठी अनेक बदल केले जाणार आहे. कर्मचारी कपात याचाच एक भाग असल्याचे समजते.  Qualcomm कंपनी एआय डेटा सेंटर मध्ये विस्तार करत आहेत. यामुळे कंपनी येथे देखील पैसा गुंतवत आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
india