SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

मायक्रोसॉफ्ट 10 तासांपासून डाऊन, भारतासह जगभरातील कोट्यवधी यूजर्सना फटका

आउटलुक आणि मायक्रोसॉफ्ट 365 सर्व्हरमध्ये अचानक आलेल्या बिघाडामुळे भारतसह जगभरातील कोट्यवधी वापरकर्त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे नवीन ईमेल पाठवूही शकत नाहीत, स्वतःच्या खात्यात लॉग इन करू शकत नाहीत.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 13, 2026, 10:41 IST | Updated: Nov 13, 2026, 11:19 IST
Image Credit: मायक्रोसॉफ्ट 10 तासांपासून डाऊन, भारतासह जगभरातील कोट्यवधी यूजर्सना फटका
Join

Microsoft News : जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेयर कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टची ईमेल सर्विस गुरुवारी मध्यरात्रीपासून अचानक ठप्प पडल्याने जगभरातील याच्या कोट्यवधी यूजर्सना फटका बसला आहे. सर्वर ठप्प झालेल्याला 10 तासांच्या वरती वेळ झाला असून अद्याप ईमेल सर्विस पुर्वव्रत झालेली नाही. यामुळे अनेक दिग्गज कंपन्यांचं कामकाज प्रभावित झालं आहे. आउटलुक आणि मायक्रोसॉफ्ट 365 सर्व्हरमध्ये अचानक आलेल्या बिघाडामुळे भारतसह जगभरातील कोट्यवधी वापरकर्त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. लोक त्यांचा मेलबॉक्स ओपन करू शकत नसल्याने अनेक महत्त्वाचे ईमेल न वाचलेल्या स्थितीत इनबॉक्समध्ये पडून आहेत. याव्यतिरिक्त, यूजर्स नवीन ईमेल पाठवूही शकत नाहीत. थोडक्यात सांगायचे तर, यूजर्स त्यांच्या खात्यात लॉग इन करू शकत नाहीत, तसेच ते संदेश पाठवू किंवा प्राप्तही करू शकत नाहीत.

मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर डाऊन :

मायक्रोसॉफ्टचं म्हणणं आहे की काही टेक्निकल कारणांमुळे अनेक क्षेत्रांमधील कनेक्टिविटी प्रभावित झाली आहे. कंपनी याला लवकरच ठीक करण्याच्या मागे लागली असून कंपनी ही समस्या त्वरित सोडवण्यासाठी काम करत आहे. मायक्रोसॉफ्ट 365 ने त्यांच्या 'एक्स' हँडलवर एक निवेदन जारी केले आहे. नमूद केले आहे की त्यांच्या ईमेल सेवेतील तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील लाखो कार्यालयांमधील कामकाज ठप्प झाले आहे.

हेही वाचा : ट्रम्प आणि नेतन्याहूंमध्ये फोनवरच बाचाबाची, मोठमोठ्यानं एकमेकांवर ओरडले? इस्रायलमधील सत्तांतरणाआधीच वाद कशावरुन झाला?

आउटलुक आणि मायक्रोसॉफ्ट 365 नाही उघडत :

कंपनीने पुढे म्हटलं की डाउनडिटेक्टरच्या सांगण्यानुसार, आउटलुकमधील समस्यांची सुरुवात ईस्टर्न टाइमनुसार दुपारी 1 च्या सुमारास झाली. तक्रारींच्या संख्येत वेगाने वाढ झाली असून, आतापर्यंत आउटलुक बाबत 1 लाखाहून अधिक तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. याव्यतिरिक्त  हजारो वापरकर्त्यांनी मायक्रोसॉफ्ट 365 वापरतानाही अडचणी येत असल्याचे कळवले आहे. कंपनीची तांत्रिक टीम सध्या याची चौकशी करत असून, समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES