• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /विश्व
  • /कर्ज काढून सोनं घेऊन जंगलात पुरण्याचा डेंजर ट्रेंड, बँकिंग लॉबीने दिला सावधानतेचा इशारा; ₹96.2 कोटी गायब

कर्ज काढून सोनं घेऊन जंगलात पुरण्याचा डेंजर ट्रेंड, बँकिंग लॉबीने दिला सावधानतेचा इशारा; ₹96.2 कोटी गायब

यासंदर्भात आता बँकिंग लॉबीने एक निवेदन जारी केलं असून आकडेवारीच समोर ठेवली आहे. नेमका हा सारा प्रकार आहे काय जाणून घ्या सविस्तपणे आणि लोक खरोखर असं का करत आहेत ते ही जाणून घ्या...

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 24, 2026, 01:53 PM IST|Updated: Oct 24, 2026, 02:24 PM IST
joinshare
कर्ज काढून सोनं घेऊन जंगलात पुरण्याचा डेंजर ट्रेंड, बँकिंग लॉबीने दिला सावधानतेचा इशारा; ₹96.2 कोटी गायब
Image Credit: फोटो प्रातिनिधिक एआयवरुन साभार

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

भारतात दसऱ्याच्या आठवड्यामध्ये सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर सोन्याच्या चकाकीचं आकर्षण केवळ भारतात नाही तर जगभरातील सर्वच देशांमध्ये आहे. मात्र याच चकाकत्या धातूच्या मोह दाखवून विचित्र पद्धतीने आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा प्रकार उत्तर युरोपातील एका सुंदर, समृद्ध आणि विकसित देशात समोर आला आहे. या देशातील बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी सदर घोटाळ्याप्रकरणी इशाराच जारी केला आहे.

कोणत्या देशात घडतोय हा प्रकार?

ज्या देशात हा प्रकार घडतोय त्याचं नाव आहे नॉर्वे! येथील बँकिंग क्षेत्रातील एका लॉबीने, काही भामट्यांनी देशातील नागरिकांना सोने खरेदी करायला लावून त्यांना गंडवल्याचं म्हटलं आहे. आधी सोनं खरेदी करायला लावून नंतर ते जंगलात सोडून देण्यास प्रवृत्त करण्यात आल्याचा दावा या बँकिंग लॉबीने केलाय. असा प्रकार अनेकांसोबत घडला असून हा एक गुंतवणूक फसवणुकीचा ट्रेंड असल्याच सांगण्यात आलं आहे. या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडपासून सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

सोनं उघड्यावर ठेवण्यासाठी काय सांगितलं जातं?

'फिनान्स नॉर्गे' या बँकिंग लॉबीने गुरुवारी एका निवेदन जारी केलं आहे. या निवेदनामध्ये अनेक बँक ग्राहकांनी सोने खरेदी करण्यासाठी मोठी रक्कम खर्च केल्याचं म्हटलं आहे. म्हणजेच हे लोक बँकेकडून कर्ज घेतात आणि त्यानंतर त्यामधून सोनं खरेदी करतात. पण नंतर ते सोनं जंगलात किंवा मोकळ्या निसर्गरम्य ठिकाणी सोडून देण्यास सांगितलं जातं. अनेकजण खरोखर असं करतात. "सोन्याचे मूल्य वाढत असतल्याने तुम्ही ते संभाळत बसण्यापेक्षा असं उघड्यावर ठेवलं तर इतर कोणीतरी ते सुरक्षित ठेवेल," असं या लोकांना सांगण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, ज्या ठिकाणी हे सोनं लोकांनी पुरलं, सोडलं तिथून ते सोनं चोरीला गेलं.

कोणकोणत्या शहरांमध्ये घडला असा प्रकार?

'फिनान्स नॉर्गे'च्या म्हणण्यानुसार, फसवणुकीच्या ज्या तीन प्रकारांबाबत बँका सध्या विशेष सावधगिरी बाळगण्याचा इशारा देत आहेत, त्यामध्ये या सोनं मोकळ्या जागी सोडून देण्याच्या प्रकाराचाही समावेश आहे. 'फिनान्स नॉर्गे'मधील फसवणूकविरोधी विभागाच्या संचालक, ग्राय नेरगार्ड यांनी 'ब्लुमबर्ग'शी यासंदर्भात चर्चा केली. अशा प्रकारची पहिली घटना स्प्रींग सीझन (वसंत ऋतूमध्ये) समोर आली होती, असं नेरगार्ड म्हणाल्या. ओस्लो आणि आसपासच्या शहरांमध्ये, तसेच पश्चिम किनारपट्टीवरील बर्गन शहरातही अशा घटना घडल्याचं सांगितलं.

96.2 कोटी रुपयांचं नुकसान

गेल्या वर्षी नॉर्वेमधील बँका आणि त्यांच्या ग्राहकांना आर्थिक फसवणुकीमुळे 962 दशलक्ष क्रोनर (सुमारे 100 दशलक्ष डॉलर्स) (भारतीय चलनानुसार 96.2 कोटी रुपये) इतके नुकसान सोसावे लागल्याचं 'फिनान्स नॉर्गे'चं म्हणणं आहे. त्याचवेळी, बँकांनी 3.5 अब्ज क्रोनरहून अधिक रकमेची फसवणूक होण्यापासून रोखल्याचा दावाही 'फिनान्स नॉर्गे'ने केला आहे.

'नो वे – यू वोंट फूल मी' मोहीम

'फिनान्स नॉर्गे'ने नॉर्वेमधील बँकांच्या सहकार्याने 'नो वे – यू वोंट फूल मी' नावाची एक जनजागृती मोहीम सुरू केली आहे. नॉर्वेच्या नागरिकांना आर्थिक फसवणुकीचे प्रकार ओळखण्यासाठी आणि त्यापासून सावध राहण्यासाठी जागरूक करण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
International News
Gold Price