नास्त्रेदमस : 2026 वर्ष संपायला आता फक्त 2 महिने राहिले आहेत. अशातच 2027 साठी नास्त्रेदमसने वर्तवलेली भयानक भविष्यवाणी चर्चेत आली आहे. 2027 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत मोठा भूकंप येवू शकतो. 2027 मध्ये बनावट सोने-चांदीची व्यवहार होऊ शकतो अशी अनेक भाकितं नास्त्रेदमसने वर्तवली आहेत.
नास्त्रेदमस हा 16 व्या शतकात जन्मलेला फ्रेंच भविष्यवेत्ता आहे. त्याने भाकिते साध्या मजकुरात नाही तर कवितेतून अनेक भाकितं वर्तली आहेत. त्याचे शिष्य त्याची ही भाकितं डिकोड करतात. लंडनच्या महाअग्निकांडापासून ते 9/1 च्या हल्ल्यांपर्यंत इतिहासातील अनेक मोठ्या घटनांचे भाकीत नास्त्रेदमसने केली. नास्त्रेदमसने वर्तवलेली अनेक भाकिते खरी ठरली आहेत.
नास्त्रेदमसने 900 हून अधिक कविता लिहिल्या आहेत. नास्त्रेदमसच्या कोणत्याही कवितेत 2027 या वर्षाचा थेट उल्लेख नाही. मात्र, त्याच्या कवितांमधील गहन अर्थांचा उपयोग आजच्या काळाशी सुसंगत असलेल्या भविष्यवाणी समजून घेण्यासाठी केला जातो.
शतकानुशतके ओक बेटावर एक रहस्यमय खजिना दफन केलेला आहे. अनेक दंत कथांमधून देखील याबाबत सांगितले जाते. मात्र, हा खजिना शोधण्यात अद्याप कुणाला यश आलेले नाही. 2027 मध्ये हा खजिना सापडू शकतो अशी नास्त्रेदमसची भविष्यवाणी आहे. त्याच्या 'सेंचुरी' नावाच्या कवितासंग्रहाच्या पहिल्या भागात काही कुतूहलजनक शब्द आहेत. खजिना 'गिएन'च्या ओक वृक्षाखाली, जिथे वीज पडली होती तिथून थोड्याच अंतरावर लपलेला आहे. यातील 'जिएन' आणि 'लॅगिना' या नावांमध्ये असलेले साम्य केवळ एक योगायोग आहे का? शिवाय, त्याच्या कवितेत असेही म्हटले आहे की तो खजिना 'अनेक शतकांपासून' तिथे दफन केलेला आहे. दुर्दैवाने, जेव्हा तो खजिना सापडेल, तेव्हा 'एका माणसाच्या डोळ्यात स्प्रिंग किंवा एखादी टोकदार वस्तू घुसलेली असेल आणि तो मरेल.' हे त्या प्रसिद्ध शापाशी जुळते, ज्यानुसार या खजिन्याच्या शोधात सात लोकांचा मृत्यू अटळ आहे असे भाकित नास्त्रेदमसने वर्तवले आहे.
स्कायहिस्ट्रीनुसार, प्रत्येक शतकातील 27 वा श्लोक विशेषतः 2027 या वर्षाबद्दल असू शकतो असा दावा केला जातो. नास्त्रेदमसच्या श्लोकांच्या क्रमांकाचा अर्थ लावण्याचा हा एक मार्ग असू शकतो. यातून मध्यपूर्वेतील सध्याच्या अशांततेवर प्रकाश टाकला जाऊ शकतो.
इ.स. पाचव्या शतकातील 27 व्या कवितेत नास्त्रेदमसने युद्धाचे भाकित केल्याचा दावा केला जात आहे, "काळ्या समुद्राजवळ, अग्नी आणि शस्त्रांच्या दरम्यान, तो पर्शियातून येईल आणि ट्रेबिझोंड काबीज करेल." पर्शिया आणि ट्रेबिझोंड ही इराण आणि ट्राबझोन हे तुर्कस्तानच्या काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावरील एक शहर ही यांची ऐतिहासिक नावे आहेत.
इराण आणि अमेरिका यांच्यातील दीर्घकाळ चाललेला संघर्ष सोडवण्यात तुर्कस्तानची संभाव्य भूमिका असू शकते का, असा यातून संकेत मिळतो का? ट्राबझोनमध्ये एक शांतता शिखर परिषद होऊ शकते का, ज्यात इराणचा एक प्रतिनिधी (ज्याचा कवितेत 'तो' असा उल्लेख आहे उपस्थित असेल असा या भाकिताचा अर्थ काढला जात आहे.
नवव्या शतकातील 27 व्या कवितेत नास्त्रेदमस फ्रान्समध्ये सत्ता पालट होऊ शकते असे भाकित केले आहे. पुलाजवळून वारा वाहील आणि तो डॉफिन'ला धडक देईल.'डॉफिन' हे जुन्या फ्रेंच राजघराण्यातील भावी वारसाला दिले जाणारे एक पद आहे. येथे 'डॉफिन' हा शब्द सध्याचे फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या संभाव्य 'उत्तराधिकाऱ्या'ला सूचित करत असेल का? ते 2027 ची फ्रेंच अध्यक्षीय निवडणूक जिंकण्याची सर्वाधिक शक्यता असलेला उमेदवार आहेत का असा प्रश्न उपस्थित झाला असून या भविष्यवाणीने लक्ष वेधले आहे.
2027 मध्ये हवामानात भयानक बदल होऊ शकतो असे भाकित नास्त्रेदमसने केले आहे. हवामान बदलामुळे तापमानात विक्रमी पातळीवर वाढ होत आहे. भविष्यात परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. नास्त्रेदमसनेही त्याच्या अकराव्या शतकातील 27 व्या कवितेत एक चिंताजनक भविष्यवाणी केली आहे. पश्चिमेकडून आणि दक्षिणेकडून पूर्वेकडे उष्णता पसरत आहे. प्रत्येकाला वाढत्या उष्णतेचा सामना करावा लागेल.
नास्त्रेदमसच्या भविष्यवाणी नुसार 2027 मध्ये मोठा आर्थिक भूकंप होऊ शकतो. 'आठवे शतक' या काव्यातील 28 व्या कडव्यात "सोन्या-चांदीच्या बनावट प्रतींमध्ये वाढ" होण्याचा उल्लेख आहे. यानुसार मोठ्या प्रमाणात बनावट सोने-चांदीची विक्री होऊ शकते.