SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

जगातील सर्वात महागडे विवाहबाह्य संबंध!Nvidia च्या CEO ने चिनी प्रेयसीच्या नादात गमावले ₹69200 कोटी, तर पत्नीने घटस्फोट मागितल्यास ₹7000000000000...

Nvidia च्या CEO ने चिनी तरुणीसोबत विवाहबाह्य असल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर जगभरात खळबळ माजली आणि 30 मिनिटांत त्यांनी ₹69200 कोटी गमावले आहेत.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 10, 2026, 21:17 IST | Updated: Nov 13, 2026, 15:43 IST
Image Credit: Nvidia CEO
Join

जगभरात खळबळ माजली आहे. त्यांच्या या प्रेमप्रकरणामुळे जगातील सर्वात मोठी चिप उत्पादन कंपनी, एनव्हिडिया अडचणीत आली आहे. त्यांच्या या धक्कादायक विवाहबाह्य संबंधाच्या कबुलनाम्यामुळे अवघ्या काही मिनिटांत कंपनीला 24 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त पैशांचे नुकसान झाले आहे. सीईओ जेन्सन हुआंग यांचे एका चिनी महिलेसोबतचे विवाहबाह्य संबंध केवळ कंपनीसाठीच नव्हे, तर स्वतः हुआंग यांच्यासाठीही जगातील सर्वात महागडे प्रेमप्रकरण ठरणार आहे. हुआंग यांच्या या विश्वासघातामुळे त्यांच्या पत्नी लॉरी हुआंगने घटस्फोट मागितल्यास ₹7000000000000 फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. लॉरीने अद्याप अधिकृतपणे घटस्फोटाची घोषणा केली नसली तरी त्यांना एक मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

एनव्हिडियाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण!

एनव्हिडियाच्या सीईओने स्वतः चिनी महिला ॲलिस हुआंगसोबतचे आपले विवाहबाह्य संबंध असल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर त्यांनी एका मेलद्वारे आपल्या पत्नी आणि मुलांची माफी मागितली. ही बातमी बाहेर येताच एनव्हिडियाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहिला मिळाली. सोमवारी, एनव्हिडियाचे शेअर्स 5.5% नी घसरून बंद झाल्याचे पाहिला मिळाले. शेअर्समधील या घसरणीचा परिणाम कंपनीच्या बाजार भांडवलावर झाला, जे 4.5 ट्रिलियन डॉलरवरून 4.24 ट्रिलियन डॉलरवर आल्यामुळे कंपनीला मोठे नुकसान झाले आहे. एवढंच नाहीतर कंपनीच्या मूल्यासोबतच हुआंगच्या संपत्तीतही मोठी घट पाहिला मिळतेय.  

30 मिनिटांत ₹69200 कोटींचं नुकसान


शेअरच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे, एनव्हिडियाचे सीईओ जेन्सन हुआंग यांची संपत्ती अवघ्या 30 मिनिटांत 7.4 अब्ज डॉलर्स म्हणजे भारतीय चलनानुसार 6,91,46,63,60,000 चा फटका बसला आहे.  फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत ते 8 व्या स्थानावरून 10 व्या स्थानावर घसरलं.

धक्कादायक म्हणजेएका चिनी गुप्तहेरासोबतच्या प्रेम संबंधांमुळे हुआंग आता चौकशीच्या फेऱ्यात देखील अडकले आहेत. जेन्सन हुआंग यांची चिनी गर्लफ्रेन्ड ही सिंगापूरमधील 'मेगास्पीड इंटरनॅशनल' या टेक फर्ममध्ये कार्यकारी पदावर काम करते. जी अमेरिकन चिपमेकर एनव्हिडियाकडून चिप्स खरेदीचा व्यवहार करते. जून 2024 मध्ये, मेगास्पीडने एनव्हिडियाकडून 4.8 अब्ज डॉलर्सहून अधिक किमतीच्या चिप्स खरेदी केल्याचे अहवालातून समोर आलं आहे. मेगास्पीडच्या मदतीने सिंगापूरमार्गे अमेरिकन चिप्स चीनमध्ये पोहोचवण्यात आल्याचे आरोप यामुळे करण्यात येत आहे.  अशास्थितीत ज्या अमेरिकन  चिप्सच्या निर्यातीवर बंदी असूनही चीनमध्ये पोहोचल्या होत्या का, याची चौकशी कंपनीचे संचालक मंडळ, अमेरिकन तपास यंत्रणांसोबत करत आहेत.  

हा जगातील सर्वात महागडा घटस्फोट ठरणार?


जेन्सन हुआंग यांनी एका चिनी गुप्तहेरासोबतच्या आपल्या प्रेमसंबंधाबद्दल पत्नी आणि मुलांची माफी मागितली हे खरं असलं तरी, आता त्यांची पत्नी काय भूमिका घेते हे पाहावं लागणार आहे. जर हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले, तर एनव्हिडियाच्या सीईओच्या अडचणींमध्ये वाढ तर होणार आहे, शिवाय त्यांना सर्वात मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.  घटस्फोटामुळे हुआंग यांच्या संपत्तीवर मोठा परिणाम पाहिला मिळेल. हुआंग यांची संपत्ती निम्मी होण्याची दाट शक्यता आहे. कारण घटस्फोटात त्यांच्या पत्नीला 81.1 अब्ज डॉलर्स म्हणजे भारतीय चलनानुसार 75,74,63,45,70,000 रुपये मिळू शकतात.

जसं असं झालं तर हे या जगातील सर्वात महागडा घटस्फोट ठरणार आहे. कारण पोटगीच्या बाबतीत ॲमेझॉनचे जेफ बेझोस आणि बिल गेट्स यांना हा घटस्फोट नक्की मागेल टाकणार आहे. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी त्यांची पत्नी मेलिंडा फ्रेंच गेट्स यांना पोटगी म्हणून 76 अब्ज डॉलर्स तर जेफ यांनी त्यांची पत्नी मॅकेन्झी स्कॉट यांना 35 अब्ज डॉलर्सची पोटगी दिली होती.  

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES