• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /विश्व
  • /शाळेचे छत कोसळून 28 शाळकरी मुलांसह एका महिला शिक्षिकेचा मृत्यू, 40 हून अधिक जखमी

शाळेचे छत कोसळून 28 शाळकरी मुलांसह एका महिला शिक्षिकेचा मृत्यू, 40 हून अधिक जखमी

खाजगी शाळेचे छत कोसळल्यामुळे 28 शाळकरी मुलांसह एका महिला शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत मुलांचं वय साधारण 13 वर्षांचे होते. तर 40 हून अधिक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Oct 15, 2026, 02:55 PM IST|Updated: Oct 15, 2026, 02:59 PM IST
joinshare
शाळेचे छत कोसळून 28 शाळकरी मुलांसह एका महिला शिक्षिकेचा मृत्यू, 40 हून अधिक जखमी
Image Credit: Pakistan school

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

पाकिस्तानमधील पेशावर इथे हादरवणारी आणि मनं सुन्न करणारी घटना घडली आहे. दिर कॉलेज रोडवरील एका खाजगी शाळेचे छत कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. ही घटना घडली तेव्हा विद्यार्थी शाळेत होते. छत कोसळल्यामुळे अनेक जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असून मदतकार्य सुरु आहे. या भयानक दुर्घटनेत एका महिला शिक्षिकेसह  28 शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे. तर 40 हून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मृत पावलेल्या मुलांचं वय हे 13 वर्ष किंवा त्याहून कमी वयाचे होते. या अनेक मुलं जखमी झाले असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. या भयानक दुर्घटनेमुळे रुग्णालयात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

दुसरीकडे शाळेचे छत कोसळल्यानंतर लष्करी जवान बचावकार्यात सामील झाले आहेक. एवढंच नाहीतर घटना समजल्यानंतर इतर मदत संस्थांची पथकंही शाळा परिसरात मदतीसाठी पोहोचले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर रुग्णालयात मुलांच्या आईवडिलांचा एकच आक्रोश मनाला सुन्न करणारा आहे.

महत्त्वाचे म्हणजे एका अहवालानुसार , पाकिस्तानमध्ये छत किंवा इमारत कोसळणे ही नवी किंवा सामान्य बाब आहे. सुरक्षेची ऐसीतैसी आणि बांधकामांसाठी वापरण्यात येणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या सामानामुळे यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. गेल्या सहा महिन्यांमधील ही चौथी घटना आहे. जुलैमध्ये उमरकोटमध्ये शाळेची भिंत कोसळून तीन मुलींचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जुलैमध्येच लाहोर खासगी शाळेचे छत कोसळून एका मुलाचा मृत्यू, जूनमध्ये लाहोरमध्ये शिकवणी केंद्राचे छत कोसळून 14 मुलांचा मृत्यू आणि डेरा गाझी खानमध्ये शाळेचे छत कोसळून चार मुलांचा मृत्यू झाला होता.

PAKISTAN: 17 CHILDREN, TEACHER KILLED AS SCHOOL ROOF COLLAPSES IN PESHAWAR At least 17 students, all under 13, and one teacher were killed when a school roof collapsed in Peshawar, Pakistan. More than a dozen people were injured, according to a hospital spokesperson.

— Subodh Kumar (@kumarsubodh_) October 15, 2026

पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी व्यक्त केलं शोक

या घटनेनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करताना त्यांनी लिहिलंय की, या कठीण काळात त्यांना शक्ती मिळो. तसंच जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी दुर्वा करतो. त्यांनी अधिकाऱ्यांना जखमींवर सर्वोत्तम उपचार करण्याचे आणि बचावकार्य जलदगतीने करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्यपालांनी दिले चौकशीचे आदेश


खैबर पख्तुनख्वाचे राज्यपाल फैसल करीम कुंडी यांनीही अपघाताबद्दल दुःख व्यक्त करत, निष्पाप मुलांचा जीव जाणे ही एक अत्यंत दुःखद शोकांतिका आहे. दरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांकडून शाळेचे छत कोसळण्याच्या घटनेबाबत सविस्तर अहवाल मागवला असून अपघाताच्या कारणांची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
International News
Breaking News