SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

करोनाचा नव्या 'सायलेंट' व्हेरियंटने चिंता वाढवली, लक्षणे दिसतच नाही, WHO ने दिला अलर्ट

करोनाचा आणखी एक व्हेरियंट तयार झाला अलून जागतिक आरोग्य संघटनेने महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 10, 2026, 11:22 IST | Updated: Nov 10, 2026, 11:25 IST
Image Credit: PJ 2 1 is an emerging SARS
Join

कोविड-19 ने धुमाकुळ घातल्यानंतर गेल्या काही वर्षात करोनाचे अनेक व्हेरिएंट समोर आले होते. यातच करोनाच्या आणखी एक व्हेरिएंटने पुन्हा धडक दिली आहे. या व्हेरिएंटचे नाव PJ.2.1 असून याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने एक हादरवणारा दावा केला आहे. करोनाच्या या नव्या व्हेरिएंटची लक्षणाच्या आधारे संक्रमण कोविडचं आहे की साध्या तापाचे हे समजून घेणे अवघड आहे. त्यामुळं थोडी जरी शंका असेल तरी तपासणी करणे आवश्यक आहे.

अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेने दावा केला आहे की, या आधीच्या कोविड व्हेरियंटची काही लक्षणे सामान्य तापापेक्षा वेगळी होती. घसा खवखवणे, सर्दी, नाक गळणे आणि थकवा ही लक्षणे अनेक दिवस टिकून राहिल्यास, चाचणीशिवाय हे सांगणे आता कठीण होईल. असे वृत्त आहे की, कोविड-19 चा नवीन प्रकार, पीजे.2.1 (PJ.2.1), याची लक्षणे सामान्य सर्दी आणि फ्लूच्या लक्षणांसारखीच आहेत, परंतु चाचणीशिवाय हे ओळखता येत नाही.

कोविड 19 च्या नव्या व्हेरियंटबाबत जाणून घ्या सगळं

PJ.2.1 कोविड-19 चा नवा स्ट्रेन आहे. अलीकडेच अमेरिकाच्या या व्हेरियंटबाबतच्या प्रकरणे समोर आली आहेत. आता या व्हेरियंटबाबत जागतिक आरोग्य संघटनेने माहिती दिली आहे. PJ.2.1 या नव्या व्हेरियंटची लागण झाल्यास घसा खवखवणे आणि आजार बरा झाल्यानंतरही दीर्घकाळापर्यंत शरीरात थकवा राहणे, अशी लक्षणे जाणवतात.

दरम्यान, रशियन संसर्गजन्य रोग विशेषज्ञ आणि विषाणूशास्त्रज्ञ एलेना मॅलिनिकोव्हा यांनीही या लक्षणांचा उल्लेख केला. जागतिक आरोग्य संघटनेने दावा केला आहे की हा नवीन प्रकार धोकादायक नाही आणि त्याची बहुतेक लक्षणे फ्लू सारखी आहेत.

लक्षणांची ओळख कशी पटणार

तज्ज्ञांच्या मते, पीसीआर टेस्टमुळं शरीरात SARS-CoV-2 व्हायरसच्या संक्रमणाबाबत माहिती काढता येऊ शकते. त्याचबरोबर रॅपिड अँटीजन टेस्ट व्हायरसच्या प्रोटीनची माहिती काढता येऊ शकते. सामान्य कोविड चाचण्यांद्वारे एखादी व्यक्ती कोविड-19 च्या नवीन प्रकार, PJ.2.1 ने संक्रमित आहे की नाही हे कळू शकत नाही.

या लोकांनी सर्वाधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक

ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे, त्यांनी कोविड-19 च्या नवीन प्रकाराविरुद्ध सर्वाधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींनी या आजाराबाबत विशेषतः सतर्क राहणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, जर एखादी व्यक्ती आधीच कोणत्याही आजाराने त्रस्त असेल, तर श्वसनमार्गाच्या संसर्गाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. कोणतीही समस्या उद्भवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES