SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

IT सेक्टरमधील सर्वात मोठे Layoff पॅकेज? 15 महिन्यांचा पगार मिळणार? कंपनीने नोकरीवरुन काढल्यावर IT इंजिनियर खूप खूश झाला

एक मोठ्या IT कंपनीने कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. नोकरीवरुन काढल्यावर 15 महिन्याचा पगार मिळणार असल्याचा दावा IT इंजिनियरने केला आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 15, 2026, 09:32 PM IST | Updated: Nov 15, 2026, 09:35 PM IST
Join

Qualcomm  Layoff : जगभरात  गुगलपासून मायक्रोसॉफ्टपर्यंत अनेक बड्या टेक कंपन्यांमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने कर्मचारी कपात सुरु आहे. IT सेक्टरमधील हजारो लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. अनेकांनी तडकाफडकी नोकरी गमावली आहे. कंपन्या कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई देत आहेत. मात्र, IT सेक्टरमधील सर्वात मोठे Layoff पॅकेज  क्वालकॉम (Qualcomm) देत असल्याची चर्चा आहे. या कंपनीत ले ऑफमध्ये नोकरी गमावणाऱ्या IT  इंजिनियरने मोठा दावा केला आहे. 15 महिन्यांचा महिन्याचा पगार  नुसकान भरपाई म्हणून  मिळणार असल्याचे या कर्मचाऱ्याचे म्हणणे आहे. 

Qualcomm कंपनीने मोठ्या कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे.कंपनी भारतातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणार आहे. यामुळे Qualcomm  कंपनीच्या भारतील कार्यालयांमधील जवळपास 1,000 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आहे.  ही कर्मचारी कपात बंगळूरुमधून सुरू झाली आहे. अनुभवी कर्मचाऱ्यांपासून ते फ्रेशर्सच्या नोकरीवर गदा येणार आहे. क्वालकॉमचे सीईओ क्रिस्टियानो अमोन यांनी ऑक्टोबरमध्ये एका अधिकृत ईमेलद्वारे कर्मचारी कपातीची घोषणा केली. कर्मचारी कपातीच्या काळात क्वालकॉम ३ महिन्यांच्या पगाराएवढे सेवा समाप्ती पॅकेज देणार आहे. 

15 महिन्याच्या पगाराएवढी रक्कम मिळू शकते

Qualcomm  कंपनीत ले ऑफमध्ये नोकरी गमावणाऱ्या IT  इंजिनियरने मोठा दावा केला आहे. कामाच्या दबामुळे मी  तणावात होतो. इथल्या वर्क कल्चरला वैतागलो होतो.  दररोज नोकरी सोडण्याचा विचार करत होता. आता, कंपनीनेच मला नोकरीवरुन काढत आहे. मला याचा खूप आनंद झाला आहे. 15 महिन्यांच्या पगाराएवढी आर्थिक सुरक्षा मिळण्याची अपेक्षा त्याने व्यक्त केली आहे. आता लगेच दुसरी नोकरी शोधण्याऐवजी, त्याने कुटुंब आणि मित्रांसोबत काही वेळ घालवणार असल्याचे या कर्मचाऱ्याने सांगितलेय सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

कंपनीने नोकरकपातीची घोषणा केल्यानंतर त्याने स्वतः मॅनेजरकडे मला नोकरीवरुन काढावे अशी विनंती केली. यानंतर नोकर कपातीच्या यादीत त्याचे नाव सामाविष्ट करण्यात आले. यादीत नाव पाहून मला खूप आनंद झाला असे त्याने पोस्टमध्ये म्हंटले आहे. 

या कर्मचाऱ्याने रेडिटवरील एका पोस्टमध्ये त्याच्या एक्झिट पॅकेजचा संपूर्ण तपशीलही शेअर केला आहे.  सेव्हरन्स म्हणून तीन महिन्यांचा पगार, कंपनीत घालवलेल्या कालावधीवर आधारित पाच महिन्यांचा अतिरिक्त पगार आणि लवकर सेपरेशन करारावर स्वाक्षरी केल्याबद्दल एका महिन्याचा अतिरिक्त पगार मिळणार आहे. सासह रिलोकेशन बोनस म्हणून अंदाजे दोन महिन्यांचा पगार मिळणार आहे. जो परत केला जाणार नाही. लीव्ह एन्कॅशमेंटची रक्कम देखील अंदाजे एक ते दोन महिन्यांच्या पगाराएवढी असू शकते.  या सर्वांची बेरीज केल्यावर अंदाजे 12 महिन्यांच्या पगाराएवढी रक्कम मिळेल. जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत नियमित पगार मिळेल असेही नमूद केले आहे. त्यामुळे 15  महिन्यांच्या पगाराएवढी Layoff पॅकेज मिळू शकते असा दावा या कर्मचाऱ्याने सोशल मिडियावर केला आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES