SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

भीषण रेल्वे दुर्घटना! दोन ट्रेनची समोरासमोर धडक, 7 जण ठार तर 100 हून अधिक जखमी

इजिप्तची राजधानी कैरोच्या दक्षिणेस झालेल्या एका भीषण रेल्वे अपघातात दोन ट्रेनची एकमेकांशी धडक झाल्यामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे 100 लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 09, 2026, 08:35 IST | Updated: Nov 09, 2026, 08:39 IST
Image Credit: दोन ट्रेनची समोरासमोर धडक होऊन भीषण रेल्वे अपघात
Join

इजिप्तची राजधानी कैरोजवळ एक मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. 8 नोव्हेंबर 2026 रोजी कैरोजवळ, गिझाहून फयुमला जाणारी ट्रेन आणि कैरोहून अस्वान शहराकडे जाणारी दुसरी ट्रेन एकमेकांवर आदळली, ज्यामुळे अनेक डबे रुळावरून घसरले. या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. दरम्यान इजिप्तच्या आरोग्य मंत्रालयाच्या प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 100 लोक गंभीर जखमी झाले आहेत.

राष्ट्राध्यक्षांचे चौकशीचे आदेश

या भीषण दुर्घटनेवर दुःख व्यक्त करताना, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी ठामपणे सांगितले की, "ज्याचाही निष्काळजीपणा दिसून येईल, त्याला सोडले जाणार नाही. जबाबदार व्यक्तींना नक्कीच शिक्षा दिली जाईल."

रेल्वे प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, बचाव पथकांनी ढिगारा हटवण्यासाठी अनेक क्रेनचा वापर केला. अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. ही घटना गिझा (Giza) भागातील अल-अयात (Al-Ayyat) येथे घडल. हे असे ठिकाण आहे जिथे यापूर्वीही इजिप्तच्या इतिहासातील काही अत्यंत भीषण रेल्वे अपघात घडले आहेत.

भूतकाळातही गंभीर दुर्घटना

2002 मध्ये, कैरोच्या दक्षिणेस सुट्टीसाठी निघालेल्या प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका रेल्वेगाडीला आग लागली होती, ज्यामध्ये 370 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. 2009 मध्ये, त्याच भागात रेल्वेचे अनेक अपघात झाले, ज्यात डझनभर लोकांचा बळी गेला.

संपूर्ण आफ्रिकेतील सर्वात मोठे रेल्वे जाळे असूनही, इजिप्तमध्ये वारंवार रेल्वे अपघात होत आहेत. 11 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेला इजिप्त आपल्या रेल्वे व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. असे असूनही, अशा जीवघेण्या घटना वारंवार घडत असल्याने इजिप्तच्या रेल्वे प्रणालीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

रेल्वे आधुनिकीकरणाकडे दुर्लक्ष

गेल्या दशकात इजिप्तने आपल्या वाहतूक पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणावर अब्जावधी डॉलर्स खर्च केले आहेत. ज्यामध्ये नवीन महामार्ग आणि हाय-स्पीड रेल्वे मार्गांचा समावेश आहे. तरीही त्यांच्या जुन्या रेल्वे नेटवर्कचा मोठा भाग अजूनही सर्वसमावेशक नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ZEENEWS TRENDING STORIES