• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /विश्व
  • /2080 मध्ये जगणारे जगातील पहिले शहर; सर्व काही AI वर चालते, टेक्नॉलॉजी पाहून एलियनही शॉक होतील, टाईम ट्रॅव्हलचा अनुभव

2080 मध्ये जगणारे जगातील पहिले शहर; सर्व काही AI वर चालते, टेक्नॉलॉजी पाहून एलियनही शॉक होतील, टाईम ट्रॅव्हलचा अनुभव

जगात एक असं शहर आहे जे 2080 मध्ये जगत आहे. इथली टेक्नॉलॉजीपाहून लोक अचंबित होत आहेत. हे शहर पूर्णपणे AI शहर आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 18, 2026, 19:29 IST|Updated: Nov 18, 2026, 19:57 IST
joinshare
2080 मध्ये जगणारे जगातील पहिले शहर; सर्व काही AI वर चालते, टेक्नॉलॉजी पाहून एलियनही शॉक होतील, टाईम ट्रॅव्हलचा अनुभव

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल!  फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल! फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

2

नवी मुंबईतील तरुणाने एकाचवेळी खरेदी केल्या 3 महागड्या कार; एवढ्या पैशात 1 कोटीचे 50 फ्लॅट विकत घेता येतील

3

टायफॉइड झाल्यावर शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या महत्त्वाची लक्षणे

4

इमर्जिंग आशिया कप 2026 पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार? कशी असेल भारताची Playing 11

5

NBCC ने सुधारली आपली चूक, 49 फ्लॅट्सबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं केलं मान्य; आपल्या जोखमीवर लिलावात सहभागी होण्याचं आवाहन

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Shenzhen  China most futuristic city :  येत्या काही वर्षात सर्वकाही AI करेल असा दावा केला जातो.  जगात एक असं शहर जिथं सर्वकाही  AI वर चालते. इथली टेक्नॉलॉजी पाहून एलियनही शॉक होतील. या शहरातील तंत्रज्ञान पाहता हे शहर सन 2080 मध्ये जगत असल्याचे वाटते.  या शहरात फिरताान टाईम ट्रॅव्हलचा अनुभव येईल. 50 वर्षानंतर जग कसे असेल याचा अनुभव घ्यायचा असेल तर या शहरात या. हे शहर चीनमध्ये आहे.  40 वर्षांपूर्वी या शहरात लोक मासेमारी करण्यासाठी येत होते.

शेन्झेन असे या शहराचे नाव आहे.  चीनच्या दक्षिण किनारपट्टीवरील शेन्झेन शहर चर्चेत आले ते आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य (APEC) शिखर परिषदेमुळे. या परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीगाठीही होणार आहेत. शेन्झेन हे जगातील सर्वात प्रगत शहर आहे. 40 वर्षांपूर्वी हे शहर  एक मच्छीमारांचे गाव होते. ग्रामीण शहर होते. पण आज येथे ड्रोन आणि रोबोट्सचे उत्पादन होते. हे शहर एआय तंत्रज्ञानावर चालते.

एका लहान शहराचे 'एआय शहर' बनले

शेन्झेन एकेकाळी 'बाओआन' म्हणून ओळखले जायचे. येथील लोक मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करायचे. येथे ग्रामीण वस्त्या होत्या. 1979 नंतर या शहराचा पूर्णपणे कायापालट झाला. तत्कालीन नेते डेंग शाओपिंग यांनी या शहराला चीनच्या पहिल्या विशेष आर्थिक क्षेत्रांपैकी एक म्हणून घोषित केले. त्यानंतर कम्युनिस्ट पक्षाने मुक्त उद्योगाला परवानगी दिली. हे शहर झपाट्याने विकास झाले. पाहता पाहता, येथे न्यूयॉर्क शहरापेक्षाही उंच इमारती उभ्या राहिल्या. या शहराची लोकसंख्या 1.8 कोटीवर पोहचली.  जगातील पाचवी सर्वात उंच इमारत, पिंग आन फायनान्स सेंटर, देखील येथेच आहे. 

सामाजिक आणि भौगोलिक दोन्ही दृष्टिकोनातून, या बदलाची व्याप्ती, वेग आणि प्रमाण मानवी इतिहासात अभूतपूर्व आहे असं हाँगकाँग विद्यापीठाच्या स्थापत्यशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक जुआन डू यांनी एशिया सोसायटीला सांगितले.

चालकविरहित टॅक्सी, बस आणि रोबोट

शेन्झेनच्या रस्त्यांवर चालकविरहित टॅक्सी, बस, रोबोट आणि इलेक्ट्रिक वाहने धावतात. येथे ड्रोन द्वारे  जेवण, चहा, कॉफी पोहोचवले जाते.  शेन्झेन शहर 'एआयचे शहर' म्हणून ओळखले जाते. हे चीनमधील सर्वात श्रीमंत शहरांपैकी एक आहे. 2025 मध्ये या शहराचा जीडीपी 3.87 ट्रिलियन युआन होता. हा शांघाय आणि बीजिंगनंतर तिसऱ्या क्रमांकावर होता. या शहराची तुलना तुलना हाँगकाँगशी देखील केली जाते. 

अमेरिकेच्या 'सिलिकॉन व्हॅली'ला टक्कर

शेन्झेन शहराला फ्यूचर सिटी म्हंटले जाते. अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीला टक्कर देण्यासाठी चीनने हे शहर वसवल्याचे बोलले जाते. चीनच्या काही मोठ्या कंपन्यांची मुख्यालयेही येथेच आहेत. जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक असलेल्या हुआवेचे मुख्यालय शेन्झेनमध्ये आहे.  गेल्या वर्षी इलॉन मस्कच्या टेस्लाला मागे टाकून जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहन विक्रेती बनलेली इलेक्ट्रिक वाहन उत्पादक BYD कंपनी देखील शेन्झेनमध्येच स्थित आहे. सोशल मीडिया क्षेत्रातील दिग्गज टेन्सेंट आणि जगातील सर्वात मोठी ड्रोन उत्पादक कंपनी डीजेआय यांचे कार्यालय येथे आहे.  

जगातील सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक मार्केट

जगातील सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक मार्केट याच शहरात आहे. येथील दुकांनांमध्ये विविध प्रकारचे रोबोट, फ्लायींग कार असे सर्व लेटेस्ट गॅजेट मिळतात.येथे दुकांनाबाहेर सुरक्षा रक्षक म्हणून रोबोट बसलेले आहेत. येथे पोलिस नाही तर AI च्या माध्यमातून हाताळले जाणाऱ्या रोबोट कार गस्त घालतात. येथील लहान मुंल खेळणी नाही तर रोबोटसोबत खेळतात. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Technology News
International News
Maharashtra Tourism