अमेरिकेतील ओरेगॉन राज्यात एक मोठा विमान अपघात झाला आहे. या दोन हेलिकॉप्टर आकाशात एकमेकांना धडकले ज्यात तीन जणांचा मृ्त्यू झाला आहे. दोन हेलिकॉप्टची धडक एवढी जोरदार होती की, क्षणात ते जमिनीवर कोसळली. या घटनेमुळे परिसरात गोंधळाचे वातावरण होतं. या घटनेनंतर अपघातग्रस्त परिसरातून एक महामार्ग जात असल्याने तो काही काळासाठी बंद करावा लागला होता.
या अपघातात टेक्सासमधील 22 वर्षीय फ्लाईट इन्स्ट्रक्टर मॅडी अस्बो, ओरेगॉनमधील 38 वर्षीय पायलट टायलर स्टर्डिव्हेंट आणि ब्रिटनमधील एका प्रशिक्षणार्थी पायलटचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मॅडी आसबो ही एका हेलिकॉप्टरमध्ये एका ब्रिटिश शिकाऊ वैमानिकासोबत प्रवास करत होती. तर टायलर स्टर्डिव्हेंट दुसऱ्या हेलिकॉप्टरमध्ये एकटा प्रवास करत होता. तर पोर्टलँडच्या नैऋत्येला सुमारे 40 मैल अंतरावर असलेल्या खाजगी शेतीवर हे दोन्ही हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातग्रस्त परिसरापासून जवळच मॅकमिनव्हिल म्युनिसिपल विमानतळ होतं. लाल रंगाचे असलेले हेलिकॉप्टर पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय तर दुसरे हिरव्या रंगाचे हेलिकॉप्टर उलट्या अवस्थेत कोसळलं. घटनास्थळी सर्वत्र ढिगारा विखुरलेला पाहिला मिळाला. तर अपघाताचे कारण निश्चित अद्याप समोर आलेले नाही. या अपघाताची चौकशी करण्यात येत असून लवकरच कारण समोर येणार आहे.
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात. ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.