• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /विश्व
  • /अमेरिकेत हिंदू मंदिरावर गोळीबाराचा कट, 19 वर्षांच्या तरुणाला शस्त्रास्त्रांसह अटक

अमेरिकेत हिंदू मंदिरावर गोळीबाराचा कट, 19 वर्षांच्या तरुणाला शस्त्रास्त्रांसह अटक

अमेरिकेतली अरोरा इथल्या हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळण्यात पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी 19 वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Oct 15, 2026, 03:47 PM IST|Updated: Oct 15, 2026, 03:50 PM IST
joinshare
अमेरिकेत हिंदू मंदिरावर गोळीबाराचा कट, 19 वर्षांच्या तरुणाला शस्त्रास्त्रांसह अटक
Image Credit: hindu temple

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

अमेरिकेतली अरोरा इथून एक भयानक घटना समोर आली आहे. एका हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करून मोठा हत्याकांड करण्याचा डाव समोर आला आहे. हा मोठा हत्याकांडाचा कट उधळण्यात पोलिसांनी यश आलं आहे. 19 वर्षांच्या तरुणाची रायफल जॅम झाल्यामुळे मोठी भयानक घटना होण्यापासून वाचली. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरुण  स्वतःला 'श्वेत वर्चस्ववादी निओ-नाझी' असा उल्लेख करत आहे. या तरुणाकडे पोलिसांना हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकांविरोधातील हिंसाचाराचे उल्लेख असलेले कागदपत्र आढळले आहेत. सध्या नवरात्रीचे दिवस असताना हा भयानक कट करण्याचा त्या तरुणाने कट रचला होता. पण रायफलमध्ये आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे. पण या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अमेरिकेतली भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव  अलेक्झांड्रोस पापोराकिस असं आहे. तो गेल्या काही दिवसांपासून अरोरा परिसरात हिंदू मंदिरांवर पाळत ठेवून होता. नवरात्रीमुळे मंदिरात सध्या हिंदू भक्तांची मोठी गर्दी पाहिला मिळत आहे. अशातच मोठ्या संख्येने हिंसक लक्ष्य करण्यासाठी हा कट रचण्यात आला होता.

त्या तरुणाचा कट अपयशस्वी ठरल्यानंतर आरोपी अलेक्झांड्रोस घटनास्थळावरून गेला होता. पण रविवारी एका फास्ट - फूड रेस्टॉरंटमधून त्याने त्याच्या एका सहकाऱ्याला मेसेज करून फोन करण्यास सांगितलं होतं. फोनवर त्याने सांगितलं की, आपण मंदिरावर गोळीबार करण्यासाठी गेलो होतो पण रायफलमध्ये तांत्रिक बिघाड आल्यामुळे आपण तिथून पळून आलो. पुढे तो हेही म्हणाला की, हिंदू आणि भारतीयांना ठार मारण्याची ही योग्य वेळ आहे आणि आता आपण थांबू शकत नाही. त्याच्या सहकाऱ्याने या संभाषणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी याबद्दल माहिती दिली. त्यानंतर सापळा रचून आरोपीला त्याच्या घराबाहेरून अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांना कोर्टात हजर केलं. तर न्यायाधीशांनी आरोपीला 30 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

 19-YEAR-OLD ARRESTED IN US OVER ALLEGED PLOT TO ATTACK HINDU TEMPLE Alexandros Paporakis (19) of Palatine, Illinois has been arrested for allegedly plotting a mass shooting targeting a Hindu place of worship in the Aurora area near Chicago. Authorities recovered a white supremacist manifesto containing references to violence against people of Indian descent. A Cook County judge ordered him detained with the next court hearing set for October 30. #US #Chicago #Aurora #HinduTemple https://t.co/Q5LSyQWbXf

— contentkikamii (@contentkikamii) October 15, 2026

 दरम्यान पोलिसांनी त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता त्यांना एक सेमी-ऑटोमॅटिक रायफल, भरलेले मॅगझिन, शेकडो जिवंत काडतुसे आणि बुलेटप्रूफ बॉडी आर्मर आढळून आलं. पोलिसांनी ते सर्व सशस्त्र जप्त केली आहेत. दरम्यान या घटनेबद्दल अमेरिकन सुरक्षा यंत्रणांनी आणि स्थानिक पोलिसांनी जी कारवाई केली आहे. त्यामुळे भारतीय दूतावासाकडून त्यांचं कौतुक करण्यात येत आहे. तर अमेरिका प्रशासनाकडून सर्व हिंदू मंदिरांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तर भारतीय समुदायालाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलंय.

 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
International News
Breaking News