सोशल मीडियावर सध्या ‘प्लास्टिकची अंडी’ असल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हे व्हिडिओ पाहून आपण खात असलेली अंडी खरंच नैसर्गिक आहेत का, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. मात्र प्रत्येक विचित्र दिसणाऱ्या किंवा जुन्या अंड्याला ‘प्लास्टिकचं अंडं’ समजणं योग्य नाही. अंडं ताजं आहे की जुनं, हे तपासण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) एक अतिशय सोपी पद्धत सांगितली आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही विशेष उपकरणाची गरज नाही. घरच्या घरी फक्त पाण्याच्या मदतीने अंड्याची ताजेपणा तपासता येतो.
एका ग्लास पाण्यात कळेल अंडं किती ताजं आहे
यामागचं कारण अंड्याच्या कवचातील अतिशय सूक्ष्म छिद्रांशी संबंधित आहे. कालांतराने अंड्यातील ओलावा या छिद्रांमधून बाहेर पडतो आणि आत हवा जमा होत जाते. त्यामुळे अंड्याच्या आतील हवेची जागा वाढते आणि त्याची घनता कमी होते. परिणामी ते पाण्यात तरंगू शकते.
जर्दी आणि पांढरा भाग मिसळला तर अंडं प्लास्टिकचं असतं का?
Seen claims about “plastic eggs” online? Don’t let food rumours influence your choices.
Watch this video to learn a simple way to check whether an egg is fresh or stale at home.
Stay informed and don’t let misinformation crack your trust.#FSSAIMythBuster #EggStories pic.twitter.com/p0pCQ0Fo7G— FSSAI (@fssaiindia) September 26, 2026
हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरलेला गैरसमज आहे. अंडं फोडल्यानंतर त्यातील पिवळा बलक आणि पांढरा भाग लगेच मिसळला, म्हणून ते अंडं प्लास्टिकचं आहे, असा निष्कर्ष काढता येत नाही. अंडं जसजसं जुनं होत जातं, तसतशी त्याची आतील रचना आणि घट्टपणा कमी होतो. त्यामुळे बलक आणि पांढरा भाग पूर्वीसारखा घट्ट राहात नाही आणि ते एकमेकांत सहज मिसळू शकतात. म्हणजेच, अंड्याचा पोत किंवा त्यातील बलक-पांढरा भाग मिसळणे हे ‘प्लास्टिकचं अंडं’ असल्याचा पुरावा नाही.
मग जुनं अंडं आतून वेगळं का दिसतं?
अंड्याचं कवच आपल्याला पूर्णपणे बंद वाटत असलं तरी त्यामध्ये असंख्य सूक्ष्म छिद्रं असतात. अंडं साठवून ठेवल्यानंतर त्यातील पाणी हळूहळू बाहेर पडतं आणि त्याची जागा हवा घेते. यामुळे अंड्याच्या आतील रचनेत बदल होतात. त्यामुळे जुनं अंडं फोडल्यानंतर त्याचा बलक कमी घट्ट वाटू शकतो आणि पांढऱ्या भागाचा पोतही बदललेला दिसू शकतो.
सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून घाबरू नका
‘प्लास्टिकची अंडी’ या नावाने व्हायरल होणाऱ्या प्रत्येक व्हिडीओवर लगेच विश्वास ठेवण्याची गरज नाही. अंडं जुनं असणं आणि ते बनावट किंवा प्लास्टिकचं असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला अंड्याच्या ताजेपणाबद्दल शंका असेल, तर पाण्याची ही सोपी चाचणी करून पाहू शकता. मात्र वॉटर टेस्ट अंडं ताजं आहे की जुनं याचा अंदाज देऊ शकते; ती अंडं ‘प्लास्टिकचं’ आहे की नाही हे सिद्ध करणारी वैज्ञानिक चाचणी नाही.