SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

चिला आणि भजी खाऊन कंटाळला आहात? संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा क्रिस्पी सोयाबीन

संध्याकाळच्या नाश्ताला काय बनवायचे हा रोजचा प्रश्न असतो, अनेकदा तेचतेच पदार्थ खाऊन आपण कंटाळतो आज तुम्हाला एक खास रेसिपी या लेखामध्ये सांगणार आहोत.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Oct 23, 2026, 09:01 PM IST | Updated: Oct 23, 2026, 09:12 PM IST
Join

सायंकाळी जेव्हा चहा पिण्याच्या वेळी बऱ्याचदा अनेकांना काहीतरी चटपटीत खाण्याची सवय असते. पण अनेकदा तेचतेच पदार्थ खायला कंटाळा येतो, आज तुम्हाला या लेखामध्ये एक युनिट रेसिपी सांगणार आहोत. तिच कांदा किंवा बटाटा भजी खाऊन कंटाळला असाल तर आज तुम्हाला आम्ही साधी आणि कमी साहित्यामध्ये तयार होणारे क्रिस्पी सोयाबीन कसे बनवायचे त्याची रेसिपी सांगणार आहोत. सोयाबिनमध्ये प्रथिने देखील असतात आणि झटपट आणि लवकर तयार होणारा हा पदार्थ घरी बनवायला सोपा आहे

क्रिस्पी सोयाबीन बनवण्यासाठी लागणारे साहित्य

सोयाबीन – 1 कप
बेसन – 2 चमचे
तांदळाचे पीठ - 1 चमचा 
लाल मिरची पावडर – 1 चमचा
हळद पावडर – अर्धा चमचा
चाट मसाला – अर्धा चमचा
धणे पूड – अर्धा चमचा 
मीठ - चवीनुसार 
आले-लसूण पेस्ट – 1 चमचा
पाणी – गरजेनुसार

हे ही वाचा

रोज बोरींग खिचडी खाऊन कंटाळला आहात? घरच्या घरी बनवा पारंपरिक गुजराती खिचडी

कसे बनवायचे क्रिस्पी सोयाबीन

क्रिस्पी सोयाबीन बनवण्यासाठी सर्वात आधी एका भाड्यामध्ये पाणी घ्या आणि ते पाणी गॅसवर उकळण्यासाठी ठेवा. पाणी उकळल्यानंतर त्यात सोयाबिन घाला आणि त्याला एक मिनटे उकळून द्या. त्यानंतर, सोयाबिनमध्ये असलेले पाणी काढून टाका आणि सोयाबीन थंड होऊ द्या. उकडलेले सोयाबीन चाळणीत ओतून पूर्णपणे निथळून घ्या. त्यानंतर, स्वच्छ कापड किंवा किचन टॉवेलने ते कोरडे करा, जास्त ओलाव्यामुळे त्यांचा कुरकुरीतपणा कमी होऊ शकतो. आता, एका भांड्यात सोयाबीन घ्या. त्यामध्ये बेसन, तांदळाचे पीठ, लाल तिखट, हळद, धणेपूड, मीठ आणि आले-लसूण पेस्ट घाला. सर्व व्यवस्थित मिसळा. गरज वाटल्यास थोडे पाणी शिंपडा, जेणेकरून मसाले आणि पिठाचे मिश्रण सोयाबीनला हलकेच लागेल.

एका कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर, त्यात थोडे थोडे सोयाबीन घालून मंद आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. काढून पेपर टॉवेलवर ठेवा, म्हणजे तेल सहजपणे निथळून जाईल. आता गरम कुरकुरीत सोयाबीनवर थोडा चाट मसाला भुरभुरा. हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा. संध्याकाळच्या चहाबरोबर खाण्यासाठी हा कुरकुरीत पदार्थ एक उत्तम पर्याय आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES