अनेकदा तिचतीच खिचडी खाऊन आपण कंटाळलेलो असतो, त्यामुळे नवे काय बनवायचे असा अनेकदा प्रश्न असतो. तेचतेच पदार्थ खाऊन आपण कंटाळतो आज तुम्हाला या लेखामध्ये कमी साहित्यामध्ये आणि तुमच्या घरी असलेल्या साहित्यांमध्ये गुजरातच्या प्रसिद्ध खिचडी कशी बनवायची ही रेसिपी सांगणार आहोत. या गुजराती खिचडीची रेसिपीची चव इतकी अप्रतिम असेल की ती खाणारे प्रत्येकजण तुमची प्रशंसा करेल. गुजराती खिचडी ही घरी बनवल्या जाणाऱ्या सामान्य खिचडीपेक्षा खूप वेगळी असते आणि तिची चवही अतुलनीय आणि फार वेगळी असते.
गुजराती खिचडीबद्दल विशेष सांगायचे झाले तर, ती बनवायला खूप सोपी आहे, त्यामुळे जर तुम्ही एकटे राहत असाल किंवा पहिल्यांदाच स्वयंपाक करणार असाल, तर तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही. या लेखात आम्ही तुम्हाला या स्वादिष्ट खिचडीची रेसिपी सांगणार आहोत, जी वापरून तुम्ही तिच्या चवीचा आनंद घेऊ शकाल, ही रेसिपी सविस्तर नीट वाचा आणि घरी नक्की ट्राय करा.
2/3 कप तांदूळ
1/3 मूग
साडेतीन कप पाणी
1/4 चमचा हळद पावडर
लसणाच्या 4-5 पाकळ्या
1/4 टीस्पून राई
1/2 टीस्पूनजीरा
4-5 कढीपत्ता
1/2 चमचा लाल मिरची पावडर
1 टेबलस्पून तेल
चवीनुसार मीठ
गुजराती खिचडी तयार करण्यासाठी सर्वात आधी, डाळ आणि तांदूळ पाण्याने 2-3 वेळा चांगले धुवून स्वच्छ करा. आता मध्यम आचेवर प्रेशर कुकरमध्ये डाळ, तांदूळ, हळद, मीठ आणि गरजेनुसार पाणी घाला. नंतर कुकरचे झाकण बंद करा आणि चार शिट्ट्या होईपर्यंत खिचडी शिजू द्या (टिप - बऱ्याचदा कुकरमध्ये किती पाणी घातले आहे आणि कुकरनुसार देखील शिट्ट्या किती घ्याव्या याचा अंदाज स्वत:ला असतो). जेव्हा खिचडी शिजेल, तेव्हा कुकरमधील दाब नैसर्गिकरित्या कमी होऊ द्या. त्यानंतर, झाकण उघडून खिचडी एका भांड्यात काढून घ्या.
आता मध्यम आचेवर तडका पॅनमध्ये तेल गरम करा आणि त्यात मोहरी व जिरे घालून तडतडू द्या. यानंतर बारीक चिरलेला लसूण घालून हलका सोनेरी रंग येईपर्यंत परता. आता कढीपत्ता आणि लाल तिखट घालून काही सेकंद हलके परतून घ्या. तयार केलेली फोडणी खिचडीवर घालून व्यवस्थित मिसळा. अशाप्रकारे गरमागरम गुजराती खिचडी तयार होईल.