हिवाळ्यात शरीर हायड्रेटेड कसं ठेवायचं? बाबा रामदेवांनी दिल्या खास टिप्स
हिवाळ्यामध्ये फक्त पाणी प्यायल्यानेच त्वचा हायड्रेटेड राहत नाही असे योगगुरु बाबा रामदेव यांचे मत आहे. आपली त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी काय करावे यासंदर्भात सविस्तर वाचा.
थोडी थोडी थंडी वाजायला लागली आहे यावेळी मग आपण कधीतरी चुकून थंड पाणी वैगरे प्यायले तर मग आपल्याला सर्दी होऊ शकते. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये आपल्याला भरपूर तहान लागते म्हणून आपण जास्त पाणी पितो. पण हिवाळ्यामध्ये लोक कमी पाणी पिऊ लागतात, त्यामुळे देखील तुम्हाला डीहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. अनेकांचा असाही विश्वास आहे की फक्त पाणी पिल्यामुळे त्यांची त्वचा हायड्रेटेड राहते पण हे कितपत खरे आहे? हिवाळ्यामध्ये फक्त पाणी प्यायल्यानेच त्वचा हायड्रेटेड राहत नाही असे योगगुरु बाबा रामदेव यांचे मत आहे. आपली त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी काय करावे यासंदर्भात सविस्तर वाचा.
योगगुरु बाबा रामदेव यांनी सांगितले आहे की, अनेकजण हे गरजेपेक्षा जास्त लोक पाणी पितात, पण एखाद्या गोष्टीचे अतिरेक सेवन करणे हे देखील वाईट आहे. आपण जर पाणी, तूप आणि दूध यांचे अतिरेक सेवन केले तर हे आपल्या शरीरासाठी हानिकारक असते. जास्त पाणी प्यायल्याने सूज आणि जळजळ होऊ शकते, तसेच शरीरात पाणी साठू शकते. त्यामुळे, जास्त पाणी पिणे टाळणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर, बरेच लोक खूप कमी पाणी पितात. खूप कमी पाणी पिणे देखील धोकादायक ठरू शकते.
हे ही वाचा
हाय कोलेस्टेरॉलची ही लक्षणं दिसताच व्हा सतर्क; दुर्लक्ष पडू शकतं महागात
हिवाळ्यामध्ये लोक कमी पामी पितात त्यामुळे रामदेव बाबांचे म्हणणे आहे की, या ऋतूतही पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. उन्हाळ्यामध्ये लोक हळद, आले , मध आणि केशर घालून पाणी पिण्याचा सल्ला रामदेव बाबा देतात त्यामुळे त्याचा फायदा शरीराला होता. तर हिवाळ्यामध्ये केवळ पाणीच पिल्याने शरीर हायड्रेटेड होते अस नाही. तर गाजराचा रस, डाळिंबाचा रस, बीटचा रस किंवा आवळ्याचा रसही प्यावा. ताकही पिऊ शकता. यामुळे शरीराला पाण्याची कमतरता भासत नाही.
शरीरामध्ये पाण्याची कमतरता आणि हीटरच्या वापरामुळे शरीरामधील त्वचा ही हिवाळ्यामध्ये कोरडी पडू शकते. त्यामुळे हिवाळ्यामध्ये बदामाचे तेल किंवा गाईचे तूप लावले तर ते फायदेशीर आहे. तूप किंवा तेल लावल्याने पाण्याची कमतरता कमी होण्यास मदत होते. त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि कोरडेपणा दूर करण्यासाठी कोरफडीचा रस सेवन केला जाऊ शकतो.
अस्वीकरण – ही बातमी केवळ सामान्य माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी, तज्ञांचा सल्ला घ्या किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.