• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /लाइफस्टाइल
  • /बटाटा नाही! कच्च्या केळ्यांपासून बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट टिक्की

बटाटा नाही! कच्च्या केळ्यांपासून बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट टिक्की

कच्च्या केळ्यांमध्ये फायबर आणि रेझिस्टंट स्टार्च असतो. आजच्या लेखामध्ये पौष्टिक आणि चमचमीत कच्च्या केळ्याची टिक्की कशी तयार करायची यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Nov 26, 2026, 14:14 IST|Updated: Nov 26, 2026, 14:30 IST
joinshare
बटाटा नाही! कच्च्या केळ्यांपासून बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट टिक्की

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
रिलायन्सच्या प्रोजेक्टसाठी 50,000 झाडांची कत्तल? भरपाई म्हणून कोकणात झाडं लावली; मनेस नेत्याचा गंभीर आरोप

रिलायन्सच्या प्रोजेक्टसाठी 50,000 झाडांची कत्तल? भरपाई म्हणून कोकणात झाडं लावली; मनेस नेत्याचा गंभीर आरोप

2

रोहित पवार यांना मोठा झटका! राष्ट्रवादी पक्षाने स्पष्ट केली भूमिका

3

शरद पवारांनी भाकरी फिरवली! रोहिणी खडसेंच्या जागी नव्या महिला नेतृत्वाला संधी; प्रदेशाध्यक्ष बदलल्या

4

'या' शहरात बनतंय MS Dhoni चं तिसरं घर, बांधकामाचं डिझाईन समोर, पाहा Video

5

सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाल्या तर शपथविधीला जाणार का? संजय राऊत यांनी एका वाक्यात उत्तर; राजकीय वर्तुळात खळबळ

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

आलु टिक्की असो किंवा बिटची टिक्की आपण ऐकली किंवा खाल्ली असेल. आज तुम्हाला या लेखामध्ये आम्ही एक युनिक रेसिपी सांगणार आाहोत. संध्याकाळच्या नाश्ताला अनेकवेळा काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा होते, अशावेळी काय स्पेशल तयार करायचे हे समजत नाही. हुतेक लोक बटाट्याच्या टिक्की, समोसे किंवा पकोडे पसंत करतात, पण तुम्हाला काही स्वादिष्ट आणि नवीन काही तरी करुन पाहायचे असेल तर तुम्ही बटाट्यांऐवजी कच्च्या केळ्याची टिक्की बनवून बघा. कच्च्या केळ्यांमध्ये फायबर आणि रेझिस्टंट स्टार्च असतो. आजच्या लेखामध्ये पौष्टिक आणि चमचमीत कच्च्या केळ्याची टिक्की कशी तयार करायची यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.

कच्च्या केळ्याची टिक्की तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

कच्चे केळे- 3 
हिरवी मिरची – 1 (बारीक चिरलेली) 
आले – 1 इंच (किसलेले) 
कोथिंबीर – 1 टेबलस्पून बारीक चिरलेली 
जिरे – अर्धा चमचा 
लाल मिरची पावडर – अर्धा चमचा 
आमचूर पावडर – अर्धा चमचा 
धणे पूड – अर्धा चमचा 
बेसन किंवा तांदळाचे पीठ – 1 मोठे चमचे 
मीठ - चवीनुसार 
तेल – 1 मोठे चमचे

कच्च्या केळ्याची टिक्की कशी बनवायची?

कच्च्या केळ्याची टिक्की तयार करण्यासाठी सर्वात आधी कच्ची केळी स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कच्ची केळी प्रेशर कुकरमध्ये थोडे पाणी घालून ते 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत उकळवा. केळी थंड झाल्यावर त्यांची साल काढा. आता, उकडलेली केळी एका मोठ्या भांड्यात घालून ती चांगली कुस्करून घ्या. त्यात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या, म्हणजे टिक्की सहज बनवता येईल. त्यानंतर मॅश केलेल्या केळ्यांमध्ये हिरव्या मिरच्या, आले, कोथिंबीर, जिरे, लाल तिखट, धणेपूड, आमचूर पूड आणि मीठ घाला आणि ते मिश्रण चांगले मिसळून घ्या.

मिश्रण चांगले मिक्स केल्यानंतर त्यामध्ये बेसन किंवा तांदळाचे पीठ घाला त्याचे कारण म्हणजेच त्याला आकार देणे सोपे जाईल. हातांना थोडे तेल लावा आणि मिश्रणाचे लहान गोल गोळे बनवा, त्यांना तळहाताने हलकेच दाबून चपटे करा. नॉनस्टिक पॅन गरम करून त्याला थोडे तेल लावा. तयार केलेल्या टिक्की पॅनवर ठेवा आणि मंद आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी व कुरकुरीत होईपर्यंत तळा. टिक्की कुरकुरीत झाल्यानंतर ती एका प्लेटमध्ये काढा त्यानंतर हिरव्या चटणीसोबत, चिंचेच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत गरमागरम सर्व्ह करा. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Lifestyle News
recipes