भाजी नव्हे, टोमॅटो-दुधी भोपळ्यापासून बनवा स्वादिष्ट 'केशरी हलवा'; पाहुणेही विचारतील रेसिपी
केशर टोमॅटो आणि दुधी भोपळ्याचे ही पुडिंग दिसायला जितकी आकर्षक आहे, तितकीच चवीलाही स्वादिष्ट आहे. आजच्या लेखामध्ये ही पुंडिंग कसे तयार करायचे, हा पदार्थ तयार करण्यासाठी मोजकेच साहित्य लागते. हा पदार्थ कसा तयार करायचा यासंदर्भात सविस्तर वाचा.
दुधीची खीर किंवा गाजरचा हलवा यासारखे पदार्थ आपण अनेकदा गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली तर बनवतो. आज या लेखामध्ये तुम्हाला एक युनिक रेसिपीबद्दल सांगणार आहोत. टोमॅटो आणि दुधी भोपळा यांचा वापर सहसा भाजीच्या पदार्थांमध्ये केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का या पदार्थापासून एक गोड पदार्थ देखील बनवता येतो. जर तुम्हाला काही तरी वेगळे गोड खायचे असेल तर मग पारंपरिक गाजर किंवा रव्याच्या पुडिंगऐवजी केशर टोमॅटो आणि दुधी भोपळ्याचे पुडिंग बनवून बघा.
केशर टोमॅटो आणि दुधी भोपळ्याचे ही पुडिंग दिसायला जितकी आकर्षक आहे, तितकीच चवीलाही स्वादिष्ट आहे. आजच्या लेखामध्ये ही पुंडिंग कसे तयार करायचे, हा पदार्थ तयार करण्यासाठी मोजकेच साहित्य लागते. हा पदार्थ कसा तयार करायचा यासंदर्भात सविस्तर वाचा.
टोमॅटो-दुधी भोपळा हलव्यासाठी लागणारे साहित्य :
टोमॅटो – 4 मोठ्या आकाराचे
दुधी भोपळा – 1/2 किलो
शुद्ध तूप – 2 मोठे चमचे
बदाम – 15-20
काजू – 15-20
वेलची पूड - 1 चिमूटभर
मावा – 1 कप
कसा बनवायचा टोमॅटो-दुधी भोपळा हलवा?
टोमॅटो-दुधी भोपळा हलवा तयार करण्यासाठी सर्वात आधी एक नॉन-स्टिक पॅन घ्या आणि त्यात दोन मोठे चमचे तूप घालून मध्यम आचेवर गरम करा.तूप चांगले गरम झाल्यावर त्यात कापलेले काजू आणि बदाम घालून ते सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा, जेणेकरून त्यांचा कुरकुरीतपणा आणि चव दोन्ही वाढेल. सुका मेवा भाजून झाल्यावर तो बाहेर काढून एका ताटलीत ठेवा आणि त्याच तुपात टोमॅटोची पेस्ट घालून मध्यम आचेवर सतत ढवळत 5-7 मिनिटे भाजून घ्या. तसेच, त्यात चिमूटभर वेलची पूड घाला. यामुळे हलव्याला अप्रतिम सुगंध येतो.
टोमॅटो पेस्ट शिजत असताना, दुधी भोपळा एका वेगळ्या भांड्यात किसून घ्या. टोमॅटो पेस्ट शिजून थोडी घट्ट झाल्यावर त्यात किसलेला मावा आणि पेडा घाला. हे मिश्रण मंद आचेवर 4-5 मिनिटे परतून घ्या. सर्व साहित्य एकत्र झाल्यावर आणि कढईतून तूप सुटू लागल्यावर गॅस बंद करा. केशराची खीर तयार आहे. त्यावर सुका मेवा घालून सजवा आणि वाढा