जर तुम्हा चमचमीत काही तरी खायचे असेल तर आज तुम्हाला या लेखामध्ये एक नवीन आणि चमचमीत रेसिपी सांगणार आहोत. पण यावेळी तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करावे लागणार आहे. अनेक शेफ अशा पाककृती शेअर करतात, ज्या केवळ आरोग्यदायीच नाहीत तर चवीलाही अप्रतिम लागतात. जसे की शेफ सलोनी कुकरेजा यांनी शेअर केलेली ही क्रीमी पनीर नूडल्सची रेसिपी. आजच्या लेखामध्ये क्रीमी पनीर नूडल्स कसे तयार करायचे यासंदर्भात जाणून घ्या.
200 ग्रॅम पनीर
2 ते 3 हिरवे कांदे
अर्धा कप दूध
पाव कप पाणी
दोन चमचे मिरचीचे तेल
लसणाच्या 6 पाकळ्या
आल्याचा एक इंचाचा तुकडा
एक चमचा साखर
एक चमचा सोया सॉस
एक चमचा धणे पूड
भाजीपाला स्टॉक
मीठ आणि मिरपूड
नूडल्स
दोन चमचे पांढरे तीळ
हिरव्या कांद्याच्या पाती
क्रीमी पनीर नूडल्स तयार करण्यासाठी सर्वात आधी 100 ग्रॅम चीज गरम पाण्यात घालून बाजूला ठेवा, म्हणजेच ते चांगले वितळेल. त्यानंतर नूडल्य तयार करण्यासाठी मोठ्या पातेल्यात नूडल्स घालून उकळा, नूडल्स गाळून घ्या आणि पाणी बाजूला ठेवा. क्रीमी सॉस बनवण्यासाठी सर्वात आधी पनीर वाटून घ्यावे लागणार आहे. पनीरचा सॅास तयार करण्यासाठी पनीरमध्ये अर्धा कप दूध आणि थोडे नूडल्सचे पाणी घालून त्याचा सॉस तयार होईपर्यंत वाटून घ्या. आता कढईत एक चमचाभर तेल घाला, उरलेले १०० ग्रॅम पनीर कुस्करून तेलात टाका. हलक्या हाताने ढवळा आणि त्यावर चिली ऑइल शिंपडा, मंद आचेवर पनीर ढवळून कुरकुरीत करा.
पनीर कुरकुरीत केल्यानंतर आता पनीर काढून बाजूला ठेवा आणि त्याच कढईत आठ ते दहा बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या घाला. तसेच बारीक चिरलेला कांदा आणि आले घालून सर्व मंद आचेवर परतून घ्या. जेव्हा कांदा आणि लसूण हलके परतले जातील, तेव्हा त्यात एक चमचा धणेपूड घाला. तसेच व्हेजिटेबल स्टॉक घालून ढवळा, त्यासोबत एक चमचा मिरचीचे तेल घाला. साखर, सोया सॉस, थोडे नूडल्सचे पाणी घालून सर्व एकत्र मिसळा. त्यासोबत तयार केलेले पनीरचे मिश्रण घाला. चवीनुसार मीठ घाला आणि सर्व एकत्र उकळू द्या, जेव्हा ते चांगले उकळून शिजेल, तेव्हा त्यात नूडल्स घालून शिजवा. क्रीमी नूडल्स तयार आहेत. ते एका प्लेटमध्ये वाढा आणि त्यावर कुरकुरीत तयार पनीरचा चुरा घाला.